मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मज्जवह, शुक्रवह, मलवह स्त्रोतसें|
पुरीषशूल

पुरीषवह स्त्रोतस - पुरीषशूल

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


वायु: प्रकुपितो यस्य रुक्षाहारस्य देहिन:
मलं रुणद्धि कोष्ठस्थं मन्दीकृत्य तु पावकम् ॥१३६॥
शूलं संजनयंस्तीव्रं स्त्रोतांस्यावृत्य तस्य हि ।
दक्षिणं यदि वा वामं कुक्षिमादाय जायते ॥१३७॥
सर्वत्र वर्धते क्षिप्रं भ्रमन्नथ सघोषवान् ।
पिपासा वर्धते तीव्रा भ्रमो मूर्च्छा च जायतै ॥१३८॥
उच्चारितो मूत्रितश्च न शान्तिमधिगच्छति ।
विट्‍शूलमेतज्ज्ञानीयाद्भिषकं परमदारुणम् ॥१३९॥
सु. उ. १३६-१३९ पान ७२५

रुक्ष अशा आहारामुळें वायु प्रकुपित होऊन अग्निमांद्य करतो आणि कोष्टामध्यें (पक्वाशयांत) मलाचा अवरोध होत जातो. मलावरोधामुळें वायु अधिकच दुष्ट होऊन स्त्रोतसांचें आवरण करतो आणि तीव्र असा शूल उत्पन्न करतो. वायूचा संचार कधीं डाव्या बाजूस तर कधीं उजव्या बाजूस सर्व उदरभर होत रहातो. पोटामध्यें निरनिराळे आवाज उत्पन्न होतात. तहान फार लागते. चक्कर येते. रोगी मूर्च्छित होतो. मलमूत्र प्रवृत्ती झाली तरी बरें वाटत नाहीं. व्याधी अतिशय पीडाकर व दारुण आहे.

चिकित्सा

क्षिप्रं दोषहरं कार्यं भिषजा साधु जानता ।
स्वेदनं शमनं चैव निरुहा: स्नेहबस्तय: ॥१४०॥
पूर्वोद्दिष्टान् पाययेत् योगान् कोष्ठविशोधनान् ।   
उदावर्तहराश्चास्य क्रिया: सर्वा: सुखावहा: ॥१४१॥
सु. उ. १४०-१४१ पान ७२६

पुरीषज उदावर्ताप्रमाणें चिकित्सा करावी. कोष्टच्या शुद्धीकडे विशेष लक्ष द्यावें.

N/A

References : N/A
Last Updated : August 08, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP