मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मज्जवह, शुक्रवह, मलवह स्त्रोतसें|
मद

मज्जवहस्त्रोतस - मद

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


यदा तु रक्तवासिनी रससंज्ञावहानि च ।
पृथक् पृथक् समस्ता वा स्त्रोतांसि कुपिता मला: ॥२५॥
मलिनाहारशीलस्य रजोमोहोवृतात्मन: ।
प्रतिहत्याश्च तिष्ठन्ते जायन्ते व्याधयस्तदा ॥२६॥
मदमूर्च्छाय संन्यासास्तेषां विद्याद्विचक्षण: ।
यथोत्तरं बलाधिक्यं हेतुलिड्गोपशान्तिषु ॥२७॥
दुर्बलं चेतस: स्थानं यदा वायु: प्रपद्यते ।
मनो विक्षोभयञ्जन्तो: संज्ञां संमोहयेत्तदा ॥२८॥
पित्तमेवं कफश्चैवं मनो विक्षोभयन्नृणाम् ।
संज्ञां नयत्याकुलतां विशेषश्चात्र वक्ष्यते ॥२९॥
च. सू. २४ आ. २७-२९. पान २६३

संप्रति रक्तवाहिधमनीदुष्टवा ये व्याधयो भवन्ति तानाह
यदा त्वित्यादि । संज्ञावहानीति संज्ञाहेतुमनोवहानि,
मनसस्तु केवलमेव शरीरमयनीभूतं यदुत्तं ``तत्त्वादीनां
पुन: केवलं शरीरमयनीभूतम्'' इत्यादि; किंवा रससंज्ञं
धातुमावहन्तीति रससंज्ञवहानि । रसवहधमनीनां तु
हृदयं स्थानं, तदुपघाताच्च मोह उपपन्न एव । मला इति
द्ष्टदोषसंज्ञा: यदुक्तं - ``मलिनीकरणान्मला:'' इति ।
यथोत्तरं लिड्गाधिक्यं मदमूर्च्छायसंन्यासेषु मोहरुपं ज्ञेयं;
मदेऽपि हि स्तोको मोहोऽस्ति, उत्तरयोस्तु व्यक्त एव
मोह: ।
मेदोऽत्र दोषै: सर्वैश्च रक्तमद्यविषरैपि ॥२६॥
वा. नि. ६ आ. २६ पान ४८८

मद, मूर्च्छा, व संन्यास हे व्याधी एकाच जातीचे असून त्यांचे स्वरुप उत्तरोत्तर अधिकाधिक गंभीर असते. मोह म्हणजे योग्य प्रकारानें जाणीव व होणें हे लक्षण तीनही व्याधींत अधिकाधिक स्पष्ट स्वरुपांत असते, मद या व्याधींत मोहाचे प्रमाण अल्प असते.

मार्ग -

मध्यम

प्रकार -

मदाचे कारणानुरुप ७ प्रका होतात. वातज मद, पित्तज मद, कफज मद, सान्निपातज मद, रक्तज मद. मद्यज मद, विषज मद.

निदान

मलिन व अहितकर असा आहार व रजोगुण व संज्ञावह स्त्रोतसामध्ये शिरुन दुर्बल झालेल्या चेतना स्थानावर (मस्तिष्क) आक्रमण करतात, मनाचा क्षोभ करतात आणि संज्ञेस मोहित करुन मद व्याधी उत्पन्न करतात.

पूर्वरुप

शून्य दृष्टी, मौन, विकृत चेष्टा, तंद्रा ही पुढें रुपामध्ये व्यक्त होणारी लक्षणेंच अल्प प्रमाणांत पूर्वरुपामध्यें असतात.  

रुपें

वर पूर्वरुपांत उल्लेखलेली लक्षणेंच अधिक स्पष्ट होतात. जाणीव अत्यल्प उरते (मोह असतो)

सक्तानल्पद्रुताभाषं चलस्खलितचेष्टितम् ।
विद्याद्वातमदाविष्टं रुक्षश्यावारुणाकृतिम् ॥३०॥
सक्रोधपरुषाभाषं संप्रहारकलिप्रियम् ।
विद्यात् पित्तमदाविष्टं रक्तपीतासिताकृतिम् ॥३१॥
स्वप्नासंबद्धवचनं तन्द्रालस्यसमन्वितम् ।
विद्यात् कफमदाविष्टं पाण्डु प्रध्यानतत्पंरम् ॥३२॥
सर्वाण्येतानि रुपाणि सन्निपातकृते मदे ।
च. सू. २४-३० तें ३३ पान २६३

वातज मदामध्ये बडबड, अडखळत बोलणें, घाईनें बोलणे, हालचाली वेगानें पण अडखळत होणे, शरीर रुक्ष होणे व नखनेत्रादींच्या ठिकाणी श्यावारुण वर्ण दिसणे अशी लक्षणे होतात. पिंत्तज मदामध्ये रागावणे, कठोर बोलणे, मारावयास धावणे, भांडणें (भांडण करणे) अशी लक्षणे असतात. त्वचा, नेत्रादींच्या ठिकाणीं रक्त, पीत, कृष्ण असें वर्ण दिसतात

कफज मदामध्ये: - अल्प व असंबद्ध भाषण, तंद्रा, आलस्य, ध्यान अशी लक्षणें असतात. त्वचादीच्या ठिकाणी पांडुता दिसते. सान्निपातज मदामध्यें सर्व दोषाची लक्षणें दिसतात.

जायते शाम्यति क्षिप्रं मदो मद्यमदाकृति: ॥३३॥
यश्च मद्यकृत: प्रोक्तो विषजो रौधिरश्च य: ।
सर्व एते मदा नर्ते वातपित्तकफत्रयात् ॥३४॥
च. सू. २४. ३३-३४ पान २६३

रक्तास्तब्धाड्गदृष्टिता ॥२८॥
मद्येन विकृतेहास्वराड्गता ।
विषे कम्पोऽतिनिद्रा च सर्वेभ्योऽभ्यधिकस्तु स: ॥
वा. नि. ६-२८-२९ पान ४८८

रक्तस्त्राव पाहिल्यामुळे उत्पन्न झालेल्या मदांत शरीर व दृष्टी स्तब्ध होते पित्तजमदांतील लक्षणे दिसतात. तोडरानें ``स्तब्धांग दृष्टिता'' या शब्दाचा अर्थ शरीर व नेत्र शोथयुक्त होंणे असा केला आहे. (वा. नि. ६-२८) तळटीप) मद्यज मदामध्यें इच्छा, हालचाली, स्वर व शरीर यांचे स्वरुप विकृत होते.

विषज मदामध्ये - कंप, अतिनिद्रा, ही लक्षणें असतात. विषज मदाचे स्वरुप इतर प्रकारच्या मदापेक्षा अधिक गंभीर असते.  

उपद्रव -

मूर्च्छा -

साध्यासाध्य विवेक

एकदोषज ३, रक्तज व मद्यज मद साध्य असतो सान्निपातिक व विषोत्पन्न मद कष्टसाध्य व असाध्य होतो.

चिकित्सा -

मूच्छप्रमाण करावी.

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP