मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मज्जवह, शुक्रवह, मलवह स्त्रोतसें|
गृघ्रसी

मज्जवहस्त्रोतस - गृघ्रसी

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


स्फिक्पूर्वा कटिपृष्ठोरुजानुजड्धापदं क्रमात् । गृध्रसी स्तम्भ-
रुक्तोदैर्गृह्णाति स्पन्दते मुहु: ॥५६॥
वाताद्वातकफात्तन्द्रागौरवारोचकान्विता ।
खल्ली तु पादजड्घोरुकरमूलावमोटनी ॥५७॥
स्फिक्पूर्वेत्यादि । प्रथमं स्फिचं स्तम्भरुक्तोदैर्गृह्वाति,
पश्चातु कटिपृष्ठोरुजानुजड्घा पदं गृह्वाति सा गृधसी वातात्';
वातकफात्तु सा पूर्वोक्तलक्षणा सती तन्द्राद्यन्विता भवति;
एवं गृध्रसी द्वयं ``द्वे गृघ्रस्यौ वाताद्‍ वातकफाच्च''
(सू. अ. ३१-१९) इत्यनेनोक्तं विवृतं भवति ॥५६-५७॥
च. चि. -- २८-५६-५७ पान १४५२

``पार्ष्णिप्रत्यड्गुलीनां तु कण्डरा याऽनिलार्दिता । सक्थन:
क्षेपं निगृह्वीयादृसीति हि सास्मृता ॥
सु. नि. १-७३ पान २६८

वात प्रकोपामुळें कटिभाग ते पार्ष्णी भागापर्यन्तच्या वातवह धमनी दुष्ट होऊन स्फिग्‍भागापासून वेदना सुरु होतात व त्या क्रमाक्रमानें कटि, पृष्ठ, उरु, जानु जंघा व पद या अवयवांमध्यें उतरत जातात. तोद, शूल, हीं लक्षणें अधिक असतात. पाय जखडल्यासारखा होतो. विशेषत: पाय सरळ लांब करतां येत नाहीं. पायांमध्यें स्पंदन होतें, चालणें, हालचाल करणें, उठणें, बसणें, या क्रिया करतांना तीव्र स्वरुपाच्या वेदना होतात. स्नायूंचा स्पर्श कठिण लागतो. सुश्रुताच्या श्लोकावरुन या वेदनांचें स्वरुप प्रतिलोमही असावें असें दिसतें. त्यानें पार्ष्णी (टांच, खोट, पायांचीं बोटें), टांचेपासून मांडीकडे जाणार्‍या (खालून वरती) कंडरेमध्यें वेदना होतात असें सांगितलें आहे. गृध्रसीचे केवळ वातज व वातकफज असे दोन प्रकार आहेत.

वातजायां भवेत्तोदो देहस्यापि प्रवक्रता ।
जानुकायुरुसंधीनां स्फुरणं स्तब्धता भृशम् ॥५५॥
वातश्लेष्मोद्भवायां तु निमित्तं वन्हिमार्दवम् ।
तन्द्रा मुख प्रसेकश्च भक्तद्वेषस्तथैव च
मा. नि. वातव्याधी ५५-५६ पान २०६, २०७

वातज गृध्रसीमध्यें तोद, शरीराची वक्रता (ताठ उभें रहाता न येणें) जानु, कटि, मांडया, सांधे यांमध्यें स्फुरण व स्तंभ अशीं लक्षणें असतात. तीव्र स्वरुपाच्या टोंचल्यासारख्या वेदना होतात. वात-कफज गृध्रसीमध्यें अग्निमांद्य, तंद्रा, गौरव, प्रसेक, अरोचक, अशीं लक्षणें असतात.

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP