मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मज्जवह, शुक्रवह, मलवह स्त्रोतसें|
वातव्याधी

मज्जवहस्त्रोतस - वातव्याधी

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


व्याख्या

न तु, वातव्याधिरिति कोऽर्थ: ? किं वात एव व्याधि-
र्वातव्याधि: उत वातेन जनितो व्याधिर्वातव्याधि: ?
आद्ये स्वस्थेष्वपि प्रसड्ग:, द्वितीये ज्वरादिषु ।
उच्यते, व्याधिपदसमानाधिकरण्याद्विकृतो दु:खकारी
वातो वातव्याधि: । उक्तं हि सुश्रुते -
`पक्वाशयस्थोऽन्त्रकूजं शूलाटोपौ करोति च'' सु. नि. स्था. अ. १

इति -- वातजनितोऽसाधारण व्याधिर्वातव्याधिरिति-
विशेषणीयं, तेनोभयत्रासप्रसड्ग: । यच्चोक्तं - `कफपि-
त्तान्वितो वायुर्वायुरेव च केवल: । कुर्यादाक्षेपकम्''
इत्यादि; तत्रारम्भको वायुरेव, पित्तकफौ त्वनुबन्धाविति
न विरोध: स्यात् । चरके ही द्विविधा व्याधय उक्ता:
सामन्यजा नानात्मजाश्चेति, तत्र सामन्यजा वातादिभि:
समस्तैर्व्यस्तैर्बा जन्यन्ते, यथा ज्वरादय:
नानात्मजा ये नियतैकदोषजन्या: यथा - आक्षेप-
कादयो ये वातेनैव जन्यन्ते, न स्वतन्त्रेण पित्तेन कफेन
वा; तथौषचोषादय: पित्तेनैव, न वातेन कफेन च, तथा
तृप्त्यादय: कफेनैव, न वातेन, न पित्तेन; एवं व्यवस्थिते
वातव्याधिवत् पित्तकफव्याधी कस्मान्नोक्तौ ?
उच्यते - वायोरति बलत्वेनाशुकारित्वेन च गरीयस्त्वात्त-
द्विकाराणां द:साध्यत्वादाश्वेवात्ययकरत्वाद्विशिष्ट चिकि-
त्सात्वाद्वातव्याध्यभिधानं, नतु कफपित्तव्याध्यिभिधानम् ।
अत एव चरकासुश्रुतादिष्वपि वातरोगाध्याय एव
निर्दिष्टो, नतु पित्तकफरोगाध्याय: । चन्द्रिकारस्त्वाह;
पित्तकफयो रुपरसादियोगादूष्य विशेषयोगाद्वा हरि
द्राचूर्णसंयोगवदत्यन्तविसदृशा रसादिमन्तो विकारा:
पृथड्नामानो जायन्ते, वायोस्तु रुपरसाद्यभावा दूष्यान्तर-
पेक्षा आक्षेपकादयो वातानतिभिन्नरुपा नानात्मजा:, तेन
वातविकारा: पृथगुच्यते, न तु पित्तकफविकारा इति ।
एतत्तु बकुलकरप्रभृतयो नानुमन्यते, चरकविरोधात् ।
चरके हि पित्तकफयोरपि नानात्मजा उक्ता: यथा -
अशीतिर्वाताविकारा: चत्वारिंशत् पित्तविकारा:,
विंशति: श्लेष्मविकारा:'' च. सू. स्था. अ. २०) इति ।
सुश्रुतेन तु शल्याध्यायिना पित्तकफ नानात्मजा न
दर्शिता:, अल्पधिकारेषु न विस्तरोक्तिरित्यभि प्रायेणेति
मा. नि. वातव्याधी म. टीका पान १९३

वातव्याधी या शब्दाचे वातानें उत्पन्न होणारा व्याधी व वात हाच व्याधी असे दोन प्रकारचे विग्रह संभवतात. यावर दोन आक्षेप येतात. वात हाच व्याधी म्हटल्यास प्रकृत स्थितीतीलही वाताचें अस्तित्व व्याधीरुप मानावें लागेल आणि वातानें उत्पन्न होणारा व्याधी असा विग्रह केल्यास ज्वर, अतिसार इत्यादि विकारांचाही वातव्याधींत समावेश करावा लागेल. या शंकेचें समाधान टीकाकारानें मार्मिकपणें केलेलें आहे. तो म्हणतो, वाताबरोबर व्याधी हें पद जोडलें गेलें यांतच वाताची प्रकृतस्थिति येथें अभिप्रेत नाहीं हें स्पष्ट होतें. विकृत, दु:खदायक, असा वात म्हणजे वातव्याधी असा शब्दाचा अर्थ केल्यास शंका रहात नाहीं. वातजनित असाधारण (कोणत्याही इतरांमुळें उत्पन्न न होणारा) असा विकार म्हणजे वातव्याधी. या म्हणण्यांत वर उल्लेखलेल्या दोन्हीही आक्षेपांचें खंडण होतें. जरी केवल वात किंवा कफपित्तान्वितवात आक्षेपकादि विकार उत्पन्न करतो असें म्हटलें असलें तरी आक्षेपकादि व्याधीच्या उत्पत्तीमध्यें वायु हाच आरंभक दोष असून, पित्त कफ हे कधींतरी अनुबंध रुपानें असूं शकतात एवढेंच तेथें सुचवायचे असल्यामुळें वातव्याधीच्या असाधारणतेस बाध येत नाहीं. चरकादि ग्रंथकारांनीं व्याधीचें सामान्यज व नानात्मज असे दोन प्रकार केलेले आहेत. जे व्याधी वातादि तीन दोषांपैकीं कोणाही एकामुळें व त्यांच्या संसर्ग सान्निपातामुळें उत्पन्न होतात, त्यास सामान्यज व्याधी असें म्हणतात. (सामान्यज व्याधीच्या लक्षण-समुच्चयामध्यें वा सामान्य संप्राप्तीमध्यें उत्पत्तीस कारणीभूत होणार्‍या दोषापेक्षां वेगळे दोष किंवा तदुत्पन्न लक्षणें बहुधा असतातच.) ज्वर, अतिसार, राजयक्ष्मा यांसारखे व्याधी हे सामान्यज व्याधी होत.

नानात्मज व्याधी हें नियमानें एकाच दोषामुळें उत्पन्न होतात. त्या स्वरुपाचा विकार इतर दोन दोषांमुळें स्वतंत्रपणें कधीहीं उत्पन्न होत नाहीं. कंप, आक्षेपक, पक्षवध हे विकार वातानेंच उत्पन्न व्यावयाचे. स्वतंत्रपणें, पित्तामुळें वा कफामुळें ते कधींही उत्पन्न होणार नाहींत. ओष, चोष हे विकार पित्तानेंच व्हावयाचे. वातकफाने होणार नाहींत. तृप्ती, गुरुगात्रता, या विकारांना कारण म्हणून कफच असावयाचा. वात, पित्त त्यांना निर्माण करुं शकणार नाहींत. अशा विकारांना नानात्मज असें नांव दिलेलें आहे. व्याधीच्या उभयविधवर्गीकरणाची ही व्यवस्था असतांना नानात्मज असे वातव्याधी तेवढे स्वतंत्र प्रकरणानें सविस्तर वर्णन केले जावेत आणि पित्तकफज अशा नानात्मज व्याधींचा उल्लेख केवळ यादीच्याच स्वरुपाचा असावा असें कां ? या शंकेवर उत्तर देतांना मधुकोश टीकाकारानें निरनिराळीं मतें दिलेलीं आहेत.

वायु हा अत्यंत बलवान, आशुकारी असा असल्यामुळें त्याच्यामुळें उत्पन्न होणारे विकात तसेंच बलवान, कृष्टसाध्य, आणि त्वरित घात करणारे असतात. त्यांच्या चिकित्सेचें एक स्वतंत्र वैशिष्टय आहे. पित्तकफ विकाराचें असें स्वतंत्र वैशिष्टय नसून वमनविरेचनादि सामान्य चिकित्सापैक्रमच त्यासाठीं विहित आहेत.
(च. चि. २८-२ टीका)

हें एक मत. दुसरें मत असें कीं, पित्तककाला मूर्तत्व असून त्यांना विशिष्ट असें रुपरसादि गुण आहेत त्यामुळें त्यांच्या संयोगानें विकृत झालेल्या रसादि दूष्यांच्या ठिकाणीं हरिद्राचूर्ण संयोगाप्रमाणें कांहीं वेगळेच भाव उत्पन्न होतात. व या विशिष्ट विकारांना वेंगवेगळीं नांवेंही दिलीं जातात. वायूला स्वत:चे रुप, रस नाहींत. तो अमूर्त आहे. त्यामुळें दूष्यांच्या ठिकाणीं उत्पन्न होणारीं लक्षणें वातसापेक्ष अशींच रहातात त्यांना अगदीं भिन्न असें स्वरुप प्राप्त होत नाहीं. या वैशिष्टयामुळें वाताचे व्याधीं वेगळे सांगितले आहेत. चंद्रिकाकाराच्या या विधानावर बकुळकारानें आक्षेप घेतल्याचे मधुकोशकार सांगतो. मात्र विशिष्ट स्वरुपांत वात व्याधींचेच तेवढे वर्णन कां आहे या शंकेस त्यामध्यें योग्य उत्तर मिळत नाहीं. प्रश्नाचा मूळ हेतु बकुळकराच्या आक्षेपामध्यें डावलला गेला आहे असें आम्हांस वाटतें. चंद्रिकाकाराचें म्हणनें विचार करण्यासारखें आहे. वायूचें महत्त्व व श्रेष्ठत्व चरकानें वातकलाकलीय (च. सू. १२) अध्यायामध्यें पुष्कळच विस्तारानें वर्णन केलें असलें तरी वाग्भटानें दिलेला सारांश आपल्या दृष्टीनें येथें पुरेसा आहे.

`स विश्वकर्मा विश्वात्मा विश्वरुप: प्रजापति: । स्त्रष्टा
धाता विभुर्विष्णु: संहर्ता मृत्युरन्तक: ॥१॥
तददुष्टौ प्रयत्नेन यतितव्यमत: सदा ।
यतोऽसौ वायुविश्वकर्मा, विश्वानिशरीरजनन-
वर्धनधारणभञ्जनशोषणादीन्यर्थानर्थकरणानि,
कर्माणि यस्य स विश्वकर्मा । कस्माद्विश्वकर्मा ?
इत्याह - विश्वात्मा, विश्वेषां - शुभाशुभानां, आत्मा-
हेतु: । हेत्वर्थोऽत्रात्मशब्द: । ननु, विश्वात्मेति कथं
जायते ? इत्याह - विश्वरुप इति । यतो विश्वरुपं-
बाह्याध्यात्मिकाख्यं, यस्य स एवम् । तथा, प्रजापति:
प्रजानां पालक: । तथा, स्त्रष्टा - प्रकृतत्वाद्विश्वस्य ।
तथा धाता - विश्वस्य धारक:, तथा हि - बाह्यो
लोको वायुमण्डलेन धार्यते, सत्यलोकोऽपि प्राणा-
पानादिभि: कस्माद्विश्वरुप: ? यस्माद्विभु:' अतस्त
दर्थानर्थकरणे प्रभुरिवेत्यर्थ: । कस्मात्प्रजापति:? यस्मा-
``विष्लृ - व्याप्तौ'' इत्यस्यौणार्दिकेनुप्रत्यये विष्णु
शब्द: । संहर्ता बाह्याध्यात्मिकसर्गसंहरणात् । मृत्यु:
यमरुप: तत्कार्यकारणात् तथा, अन्तको यमभहारक एव
साक्षात् । यतश्चैव मतस्तददुष्टौ - तस्याप्रकोपे, सदा
- सर्वकालं, यतितव्यम् ।
वा. नि. अ. १५-२

वायु हा शरीराची उत्पत्ति, वाढ, धारण, विनाश, शोषण या कर्मास कारणीभूत होतो. सर्व शरीराला तो व्यापून आहे. तो उत्पादक, रक्षक व मारकही आहे, यासाठीं त्याच्या प्रकृतस्थितीचें प्रयत्नपूर्वक रक्षण करावें. वायु विकृत होतांच अनेक प्रकारानें अनर्थ ओढवतात हें वर्णन शरीरस्थ वायूच्या स्वरुपाचेंच आहे. अर्थात भारतीय विचारसरणीप्रमाणें व्यापक दृष्टीनेंही तें सत्य आहे. वायूचे ५ प्रकार वर्णिलेले आहेत. त्यंपैकी व्यान व अपान यांचीं तेवढीं स्थानें व कर्मे येथें सांगावयाचीं आहेत. इतरांची प्रकरणवशांत पूर्वी येऊन गेलेली आहेत.

देहं व्याप्नोति सर्वं तु व्यान: शीघ्रगतिर्नृणाम् ।
गति प्रसारणाक्षेपनिमेषादिक्रिय: सदा ॥९॥
वृषणौ बस्तिभेदं च नाभ्यरू वंक्षणौ गुदम् ।
अपानस्थानमन्नस्थ: शुक्रमूत्रशकृन्ति च ॥१०॥
सृजत्यार्तवगर्भौ च युक्त: स्थानस्थिताश्च ते ।
स्वकर्म कुर्वते देहो धार्यते तैरनामय: ॥११॥
च. चि. २८-९ तें ११ पान १४४५.

व्यान हा वायु सर्व शरीर व्यापून रहातो व सर्वदा शीघ्रगति असतो. (हृदयाच्या आश्रयानें रसविक्षेपणाचें कार्य व्यानामुळेंच होतें.) आकुंचन, प्रसारण, आक्षेप, निमेष, उन्मेष, गति या सर्व क्रिया व शरीरांतील इतरही विविध कार्ये व्यानामुळेंच घडतात. अपान हा वृषण, बस्ती, मेदू (योनी), नाभी, उरु, वंक्षण, गुद, आंत्र या ठिकाणीं राहून मल, मूत्रविसर्जन, शुक्रार्तव, रज:प्रवृत्ति, गर्भनिष्क्रमण हें कर्म करतो. पांचही प्रकारचे वायु स्वस्थानस्थित आणि प्रकृत असतांना शरीराचे धारण करतात व शरीराला निरोगी राखतात.

स्वभाव

वातव्याधीचा स्वभाव दारुण आहे.

मार्ग

मध्यम (क्वचित् बाह्य अभ्यंतरसुद्धां)

प्रकार अवयव भेदानें - स्थान भेदानें विविध.

निदान

रुक्षशीताल्पलध्वन्नव्यवायाति प्रजागरै: ।
विषमादुपराच्च दोषासृक् स्त्रवणादपि ॥१॥
लड्घन प्लवनात्यध्वव्यायामादि विचेष्टितै: ।
धातूनां संक्षयाच्चिन्ताशोकरोगातिकर्षणात् ॥२॥
वेगसंधारणादामादभिघातदभोजनात् ।
मर्माबाधाभ्द्गजोष्ट्राश्वशीघ्रयानापतंसनात् ॥३॥
मा. नि. वातव्याधी पान १९३

रुक्ष, शीत, अल्प, लघु, तिक्त, कटुकषाय रसात्मक असें अन्न सेवन करणें, अतिमैथुन, जागरण, उपचारवैषम्य, दोषशोधन, रक्तमोक्ष, उडया मारणें, पोहणें, फार चालणें, व्यायाम, श्रम, धातुक्षय, चिंता, शोक,अ रोग यामुळें कृशता येणें, वेग धारण, आमोत्पत्ती, मार लागणें, उपवास, मर्मावर आघात होणें, उंचावरुन वा शीघ्रगतीच्या वाहनांतून पडणें  या कारणांनीं वाताचा प्रकोप होतो.

संप्राप्ती

देहे स्त्रोतांसि रिक्तानि पूरयित्वाऽनिलो बली ।
करोति विविधान् रोगान् सर्वाड्गै काड्गसंश्रयान् ॥४॥
मा. नि. वातव्याधी पान १९३

``वायोर्धातुक्षयात् कोपो मार्गस्यावरणेन च (वा)
वातपित्तकफा देहे सर्वस्त्रोतोऽनुसारिण: ॥५९॥
वायुरेव हि सूक्ष्मत्वाव्द्दयोस्तत्राप्युदीरण: ।
कुपितस्तौ समद्धूय तत्र तत्र क्षिपन् गदान् ॥
करोत्यावृतमार्गत्वाद्रसादीश्चोपशोषयेत् ॥६०॥
च. चि. २८, ५९-६७

वात प्रकोपाच्या दोन पद्धति शरीरामध्यें आहेत. वात हा धातूंना क्षीणता आल्यामुळें प्रकुपित होतो. त्याप्रमाणेंच मार्गाच्या अवरोधामुळेंही प्रकुपित होतो. वायु हा सूक्ष्म असल्यामुळें कफपित्ताचेंही उदीरण करुन, त्यांच्यासह शरीरामध्यें संचार करीत निरनिराळे व्याधी उत्पन्न करतो. धातुक्षयामुळें, धातूंना आलेल्या शैथिल्यामुळें वायूला त्यांच्यामध्यें संचार करणें सोपें जातें व त्या त्या स्त्रोतसामध्यें वायूमुळे विविध-विकार उत्पन्न होतात. मज्जवह स्त्रोतस, मज्ज धातु, धमनी, वातवाहिनी, मस्तीष्क यांची विकृतिही दुष्याच्या दृष्टीनें वातव्याधीमध्यें अत्यंत महत्त्वाची घटना आहे. पोषणादींच्या अभावामुळें, अग्नीच्या विकृतीमुळें, वा अभिघातामुळें मज्जधातूमध्यें क्षीणता उत्पन्न होऊन वाताला त्या ठिकाणीं स्थानसंश्रय करता येतो. वातव्याधी मध्यें इंद्रियांचीं जीं कर्मे आहेत त्यांच्यामध्यें वैकल्य उत्पन्न होतें. या वैकल्यास प्राणवायूची विकृतिही विशेष कारण असते. कारण इंद्रियधारण हें प्राणाचें कर्म असल्याचें आपण मागें पाहिलेंच आहे. स्थानसंश्रयानुरुप वातव्याधीचे अनेक प्रकार उत्पन्न होत असले तरी मज्जविकृति व प्राणवायूची विकृति हीं त्या सर्व प्रकारांत असते.

पूर्वरुप

`अव्यक्तं लक्षणं तेषां पूर्वरुपमिति स्मृतम् ॥
आत्मरुपं तु तव्द्यक्तमपायो लघुता पुन: ॥
च. चि. २८-१९

वातव्याधीचीं प्रकानारुप जीं निरनिराळीं लक्षणें सांगितलेलीं आहेत तींच अस्पष्ट स्थितींत वा अल्प प्रमाणांत असतांना त्यांना वातव्याधीची पूर्वरुपें असें म्हणतात.

रुपें

`संकोच: पर्वणां स्तम्भो भड्गोऽस्थ्नां पर्वणामपि ।
रोमहर्ष: प्रलापश्च पाणिपृष्ठशिरोग्रह: ॥६॥
खंजपाड्गुल्यकुब्जत्वं शोथोऽड्गानामनिद्रता ।
गर्भशुक्ररजोनाश: स्पंदनं गात्रसुप्तता ॥७॥
शिरोनासाक्षिजत्रूणां ग्रीवायाश्चापि हुण्डनम् ।
भेदस्तीदोऽर्तिराक्षेपो मुहुश्चायास एव च ॥८॥
करोति विविधान् व्याधिनिति यदुक्तं तद्‍व्याकरोति -
संकोच इत्यादि । स्तम्भ: पर्वणामेव । पाड्गुल्य
पड्गुता । शोथोऽड्गानामिति बाहुमुखादीनाम् । अनि-
द्रतेत्यनेनाल्पनिद्रतेत्याहु: । गर्भशुक्ररजोनाश इति
गर्भशय्याया वाताधिष्ठितत्वेन गर्भाग्रहणमिति जेज्जट
गर्भादि विकृतिरष्यस्य द्रष्टव्या । स्पदनं कम्पनम् ।
हुण्डनंशिर: प्रभृतीनामन्त:प्रवेशो वक्रत्वं वा, धातूनामने-
कार्यत्वात् । अन्ये त्वाहु: - शिरो हुण्डनं केशभूमि
स्फुटनं शड्खललाटभेदश्च, नासा हुण्डनं घ्राणनाश: अक्षि
हुण्डनमक्षिव्युदास: जत्रुहुण्डनं वक्षौपरोध: ग्रीवा
हुण्डनं ग्रीवास्तम्भ: । भेद इति ओष्ठ दन्त श्रोण्यादी-
नाम् । तोद: शूलम् अर्ति: पीडा, सा च पादपार्श्व
श्रोत्राक्षिवक्षसामिति जेज्जट: । आक्षेपश्च आक्षेपका-
दिषु वक्ष्यमाण: । आयस: श्रम: ॥६-८॥

शरीरावयांचा संकोच होणें, सांधे ताठणें, हाडांमध्यें वा संधीमध्यें फुटल्याप्रमाणें वेदना होणें. अंगावर रोमांच उभे रहाणे. बडबडणें, हात (पाय), पाठ, डोकें, जखडल्यासारखे वाटणें, लंगडेपणा पांगळेपणा येणें, कुबड निघणें, अंगावर सूज येणें (अवयव सुकणें), निद्रानाश, गर्भनाश (स्त्राव वा पात वंध्यत्व), शुक्रनाश रजोनाश, अवयवांच्यामध्यें स्पंदन, (फुरफुरणें, कांपणें), स्पर्शज्ञान न होणें, डोकें, नाक, डोळे, गळ्याजवळचीं हाडें (जत्रु),मान हें अवयव आंत गेल्यासारखे, आंत घुसल्यासारखें होणें किंवा डोक्यावरील त्वचा स्फुटित होऊन केंस विरळ होणें, छाती आवळली जाणें, मान ताठणें, कपाळ व शंखस्थळ या ठिकाणीं फुटल्यासारखी वेदणा होणें, नाक बसणें वा गंधज्ञान नष्ट होंणें, ओठ, दांत, श्रोणि, पाय, पार्श्व, कान, डोळे, वक्षस्थळ अशा अवयवांच्यामध्यें फुटल्यासारखी वेदना होणें, झटके येणें, थकवा वाटणें (वरचेवर) अशीं लक्षणें वातव्याधीमध्यें सामान्य लक्षणें म्हणून होतात.

एवं विधानि रुपाणि करोति कुपितोऽनिल: ॥
हेतुस्थान विशेषाच्च भवेद्रोगविशेषकृत् ।
च. चि. २८/२३ पान १४४७.

वातव्याधिविशेषोत्पादे हेतुमाह - हेतुस्थान
विशेषादित्यादि । हेतु विशेष: पित्तावरणादि:, स्थान-
विशेष कोष्ठादि:, किंवा हेतुकृत: स्थानविशेष:; उक्तं
हि ``प्रकुपितास्तु प्रकोपण विशेषाद्‍ दूष्यविशेषान्
दूषयन्त :'' (वि.अ.६) इत्यादि । केचित्तु `देहे
स्थान विशेषाच्च' इति पठन्ति ॥२०-२३॥

वर हीं जीं वाताचीं संकोचादि लक्षणें सांगितलीं आहेत त्यांतील लक्षणांचेच वेगवेगळें लक्षणसमुदाय वा गट निर्माण होऊन, वातव्याधींना वेगवेगळीं नांवें प्राप्त होतात. हे जे लक्षणांचे भिन्न भिन्न गट होतात त्यांस हेतूंची व स्थानांची भिन्नभिन्नता कारणीभूत असते. हेतुभिन्नतेनें अपथ्यामधील वैशिष्टय गृहीत धरलें जातें. त्याप्रमाणेंच सम्प्राप्तीला प्रेरक होणारीं, विविध प्रकारचीं आवरणेंही यांतच समाविष्ट केलीं जातात. स्थानभेदानें उत्पन्न होणारी भिन्नता स्पष्ट आहे. उदा० गृध्रसी व विश्वांचींहीं नांवें पाय व हात या अवयव-विशेषामुळें पडलेलीं आहेत. अवयव भेदाव्यतिरिक्त या दोन्ही व्याधींत पुष्कळच साम्य आहे. हेतुस्थान विशेष असें एक पद घेऊन त्याचा अर्थ-विशिष्ट हेतूमुळें वायु विशिष्ट स्थानीं प्रकुपित होतो, असा केला जातो. कांहीं वेळा या पद्धतीनें वातविकार उत्पन्न होतात.

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP