मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मज्जवह, शुक्रवह, मलवह स्त्रोतसें|
मूर्च्छा

मज्जवहस्त्रोतस - मूर्च्छा

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


क्षीणस्य बहुदोषस्य विरुद्धाहारसेविन: ।
वेगघातादभिघाताद्धीनसत्त्वस्य वा पुन: ॥१॥
करणायतनेषूग्रा बाह्येष्वाभ्यन्तरेषु च ।
निविशन्ते यदा दोषास्तदा मूर्च्छन्ति मानवा: ॥२॥
संज्ञावहासु नाडीषु पिहितास्वनिलादिभि: ।
तमोऽभ्युपैति सहसा सुखदु:खव्यपोहकृत् ॥३॥
सुखदु:खव्यपोहाच्च नर: पतति काष्टवत् ।
मोहो मूर्च्छेति तामाहु: षड्‍विधा सा प्रकीर्तिता ॥४॥
वातादिभि: शोणितेन मद्येन च विषेण च ।
षट्‍स्वष्येतासु पित्तं तु प्रभुत्वेनावतिष्ठते ॥५॥
मा. नि. मूर्च्छा १ ते ५ पान १६०-६१.

सुख वा दु:ख या कोणत्याही भावाची जाणीव न रहाता मनुष्य मोहाने लाकडाप्रमाणे पडतो जाणीव नष्ट होते अशा स्थितीस मूर्च्छा असें म्हणतात. या मूर्च्छेलाच संज्ञोपघात, मूर्च्छाय, मूर्च्छन, कष्मल, प्रलय, व मोह अशी पर्यायवाचक नांवे आहेत. (मा. नि. मूर्च्छा ५ आ. टीका

स्वरुप -

गंभीर

मार्ग -

मध्यम.

प्रकार -

६, वातज, पित्तज, कफज, रक्तज, मद्यज व विषज मूर्च्छा, ग्रंथकारानीं संख्यासंप्राप्तीत उल्लेख केला नसला तरी प्रत्यक्ष वर्णनामधें त्रिदोषजन्य (सान्निपातिक मूर्च्छेचा स्वतंत्रपणें उल्लेख केला असल्यामुळे मूर्च्छेची संख्या संप्राप्ति ६ प्रकारची न मानतां ७ प्रकारची मानावी.

निदान --

विरुद्ध गुनांचा आहार सेवन करणें, वेगांचा अवरोध करणे, मार लागणे, व्यक्ति, हीतसत्व असणे व क्षीण झालेली असणे, या कारणांनीं पुष्कळ प्रमाणांत वृद्ध झालेले दोष मूर्च्छा हा व्याधी उत्पन्न करतात.

संप्राप्ति -

प्रकुपित झालेले उग्र स्वरुपाचे पित्तप्रधान दोष, बाह्येन्द्रिये व मन यांच्यावर आक्रमण करतात. संज्ञावहस्त्रोतसांचा रोध होतों. सत्त्व व रजोगुण लीन होतात. तमोगुणाचें प्राबल्य होते व यांचा परिणाम म्हणून मूर्च्छा उत्पन्न होते. (मूर्च्छा पित्ततमप्राया मा. नि. मूर्च्छा १९)

पूर्वरुप --

हृत्पीडा जृम्भणं ग्लानि: संज्ञादौर्बल्यमेव च ।
सर्वासां पूर्वरुपाणि, यथास्वं ता विभावयेत् ॥६॥
मा. नि. मूर्च्छा ६ सटीक पान १६२

तस्या: पूर्वरुपमाह - हृत्पीडेत्यादि । संज्ञादौर्बल्यमसम्य-
ग्ज्ञानता । सर्वासां पूर्वरुपाणीति छेद: । यथास्वं विभावये-
दिति ता मूर्च्छा वातादिभेदेन जानीयात्; व्यक्तरुपा-
वस्थायां, नतु पूर्वरुपावस्थायामिति जेज्जट: ॥६॥

हृदयामध्यें पीडा होणे, जांभया येणे, ग्लानि, संज्ञा दुर्बल होऊन ज्ञान नीट न होणें, अशी लक्षणें मूर्च्छेच्या पूर्वरुपांत असतात. हीच लक्षणे रुपावस्थेत अधिक व्यक्त होतात.

प्रकार - वातज

नीलं वा यदि वा कृष्णमाकाशमथवाऽरुणम् ।
पश्यंस्तम: प्रविशति शीघ्रं च पतिबुध्यते ॥७॥
वेपथुश्चाड्गमर्दश्च प्रपीडा हृदयस्य च ।
कार्श्यं श्यावाऽरुणा च्छाया मूर्च्छाये वातसंभवे ॥८॥
सटीक मा. नि. मूर्च्छा ७-८ पान १६२

ता एवाह (वातजमाह) नीलमित्यादि । नीलं स्निग्ध-
कृष्णं, कृष्णं रुक्षकृष्णं, अरुणमीषल्लोहितम् । तम: प्रविश-
त्यन्धकारमिव प्रविशति मूर्च्छतीत्यर्थ: । शीघ्रं च प्रति-
बुध्यत इति वायो: शीघ्रकारित्वात् । कार्श्य श्यावाऽरुणा
च्छाया, `गात्रे' इति शेष: । मूर्च्छायशब्दो मूर्च्छापर्याय: ॥७॥

वातज मूर्च्छेमध्यें डोळ्यापुढें, आकाशांत, नील, कृष्ण, अरुण असे रंग प्रथमत: दिसूं लागतात व नंतर लगेच अंधारी येऊन रुग्ण मूर्च्छित होतो. ही मूर्च्छा फार वेळ टिकत नाहीं, या मूर्च्छेमधें कंप, अंगमर्द, हृदयपीडा, कृशता, त्वचादींच्या ठिकाणी श्यावारुण वर्ण ही लक्षणें उत्पन्न होतात.

पित्तज --

रक्तं हरितवर्णं वा वियत्पीतमथापि वा ।
पश्यंस्तम: प्रविशति सस्वेदश्च प्रबुध्यते ॥९॥
संभिन्नवर्चा: पीताभो मूर्च्छाये पित्तसंभवे ॥१०॥
सटीक मा. निं. मूर्च्छा ९-१० पान १६२

पित्तज मूर्च्छेमधें प्रथमत: आकाशामध्यें तांबडा हिरवा वा पिवळा रंग दिसूं लागतों व अंधारी येऊन रोगी मूर्च्छित होतो. या मूर्च्छेमध्यें घाम येणे, तहान लागणे, शरीर तापणे, दाह, डोळे रक्तपीतवर्ण होऊन व्याकूळ होणे, द्रवमलप्रवृत्ति, त्वचादीच्या ठिकाणी नीलता वा पीतता अशीं लक्षणे दिसतात (वा. नि. अ १-३३)

कफज --

मेघसंकाशमाकाशमावृतं वा तमोघनै: ।
पश्यंस्तम: प्रविशति चिराच्च प्रतिबुध्यते ॥११॥
गुरुभि: प्रावृतैरड्गैर्ययैवार्द्रेण चर्मणा ।
सप्रसेक: सहृल्लासो मूर्च्छाये कफसंभवे ॥१२॥
मा. नि. मूर्च्छा ११-१२ पान १६२.

कफजमूर्च्छायामाह - मेघेत्यादि । तमोघनैरिति तमोभिर्घ-
नैश्च, तमोऽन्धकार:, घनोऽत्र मेघवाची ॥११॥१२॥

कफज मूर्च्छेमधे प्रथमत: आकाशामधे ढग आल्याप्रमाणे वा अंधार दाटल्यासारखे दिसते व नंतर लगेच अंधारी येऊन रोगी मूर्च्छित होतो. या मूर्च्छेतून सावध होण्यास फार वेळ लागतो. या मूर्च्छेत शरीर जड होते, अंगाला ओले कातडे गुंडाळल्याप्रमाणे वाटते, मळमळते व तोंडाला पाणी सुटते.

सान्निपातिक

``सर्वाकृति: सन्निपातादपस्मार इवागत: ।
स जन्तुं पातयत्याशु विना बीभत्सचेष्टितै: ॥
सान्निपातिकमाह - सर्वेत्यादि । ननु, सर्वाकृतिरिति
विरुद्धं, उद्देशे `षड्‍विधा सा प्रकीर्तिता' इत्यभिहितत्वात्;
सन्निपातजया च सह सप्त प्रसज्येरन् ? उच्यते, उद्देश:
सुश्रुतग्रंथेन, चरकग्रंथेन च विवरणम् । चरके ह्येकजा-
स्तिस्त्रस्त्रिदोषजा चैकेति चतस्त्र: पठयन्ते । यदुक्तमष्टो-
दरीये - `चत्वारो मूर्च्छा या इत्यपस्मारैर्व्याख्याता:'' -
(च. सू. स्था. अ. १८) इति ।

रक्तमद्यविषजानां यथादोषमेतास्वन्तर्भाव:; सुश्रुते
चैता रक्तादिजा लक्षणचिकित्साभेदख्यापनार्थं साक्षात्
पठिता:, त्रिदोषजाया दोषजास्वन्तर्भाव: इत्यभिप्रायेण भेद
आचार्ययो:, संग्रहे चात्रं सर्व तन्त्रस्वीकारादुभयमपि
लिखितमित्यदोष: । अपस्मार इवेति यथाऽपस्मारी
महताऽभिघातेन पतति चिरेण प्रतिबुध्यते । अपस्मारे
फेनवामित्वदन्तघट्टनाक्षिवैकृतादिकमधिकमिति भेद: ।
बीभत्सचेष्टितैरिति फेनवामित्वादिभिरेव ॥१३॥
मा. नि. मूर्च्छा १३ सटीक

सान्निपातज मूर्छमध्यें तीनही दोषामुळें उत्पन्न होणार्‍या मूर्च्छेची सर्व लक्षणे दिसतात. अपस्माराचा रोगी जसा झटका येंऊन एकदम मूर्च्छित होतो, त्याप्रमाणे सान्निपातिक मूर्च्छेतहि रोगी एकदम कोणत्याहि पूर्वसूचना न मिळतां रोगी मूर्च्छित होतों. अपस्माराप्रमाणे तोंडाला फेस येणे, दांत आवळणे, डोळें तारवटणे अशी बीभत्स लक्षणे या मूर्च्छेत नसतात. सुश्रुताने या त्रिदोषज मूर्च्छेचे वर्णन केलेले नाहीं.

रक्तज मूर्च्छां

`पृथिव्यापस्तमोरुपं रक्तगन्धस्तदन्वय: ।
तस्माद्रक्तस्य गन्धेन मूर्च्छन्ति भुवि मानवा: ।
द्रव्यस्वभाव इत्येके दृष्ट्वा यदभिमुह्यति ॥१४॥
मा. नि. मूर्च्छा १४ पान १६४

तम हे पृथ्वी व जल या भूतांचे बाहुल्य असलेंले असते. त्यामुळें रक्ताला व त्याच्या गंधालाहि तमोरुपता असतें. तमोगुणानें उत्कट असलेल्या रक्ताच्या गंधामुळें मनुष्याला मूर्च्छा येते. माधवाच्या मधुकोशटीकेत व सुश्रुताच्या डल्हणानें केलेल्या टीकेत या श्लोकावर बरेच व्याख्यान आढळते. त्यांतील कांहीं विधाने लक्षांत घेण्यासारखी आहेत. सर्वच गंध पार्थिव असल्यामुळें जरी तमोगुणात्मक असले तरी विशिष्ट द्रव्याच्या ठिकाणीं असलेंल्या गंधामुळेंच मूर्च्छा येते. कांहींच्यामते रक्ताच्या गंधापेक्षा रक्ताचे दर्शन हेच मूर्च्छोत्पादक आहे. हीन सत्व असलेल्या व्यक्तिवरच रक्ताच्या गंधाचा वा दर्शनाचा परिणाम होतो व त्यांनाच त्यामुळें मूर्च्छा येते,
भोजाने या रक्तज मूर्च्छेची लक्षणे पुढीलप्रमाणे दिली आहेत.

`स्तब्धाड्गदृष्टिर्भवति गूढोच्छ्‍ वासस्तथैव च ।
दर्शनादसृजस्तज्जाद्गन्धाच्चैव प्रमुह्यति ॥
मा. नि. मूर्च्छा १४ म. टीका १६४ पान.

शरीर व डोळे स्तब्ध होतात. श्वासोच्छ्‍वास खोल होऊ लागतो.

विषज व मद्यज

`गुणास्तीव्रतरत्वेन स्थितास्तु विषमद्ययो: ॥
त एव तस्मात्ताभ्यां तु मोहौ स्यातां यथेरितौ ॥
विषमद्यजै प्राह - गुणा इत्यादि । गुणा दश; यदुक्तं दृढ-
बलेन ``लघु रुक्षमाशु विशदं व्यवायि तीक्ष्णं विकाशि
सूक्ष्मं च । उष्णमनिर्देश्यरसं दशगुणमुक्तं विषं तञ्ज्ञै:''
(च. चि. स्था. अ. २३)

इति । ते तैलादौ व्यस्तास्तीव्रा: सन्ति; विषमद्ययोस्तु
तीव्रतरा:, अतस्तैलादिभिर्न मोह:, किंतु विषमद्याभ्या-
मिति । त एवेति गुणा लघुत्वादय: । यथेरिताविति विषजो
मोहो न स्वयं निवर्तते विषस्यापाकित्वात्, मद्यजस्तु
मद्यपरिणामादिव शाम्यति अयं च भेदो विषमद्ययो:
प्रभावात् । उक्तम हि तन्त्रान्तरे, ``येविषस्य गुणा: प्रोक्ता:
सान्निपातप्रकोपणा: । त एव मद्ये दृश्यन्ते विषे तु बल-
वत्तरा:'' इति ॥१५॥
मा. नि. मूर्च्छा १५ म. टीकेसह, १६५ पान.

नेहमीच्या तैल इत्यादि द्रव्यांमध्यें जे लघु रुक्षादि गुण सांगितले आहेत. तेच गुण विष व मद्य यांतहि असतात. लघु, रुक्ष, आशु विषद, व्यवायी, विकाशी, तीक्ष्ण उष्ण सूक्ष्म हे गुण इतर द्रव्यामध्यें कमी अधिक संख्येनें असतात. या गुणांना कांहीं द्रव्यामध्यें तीव्रताहि असते पण संपूर्णता असत नाही. मद्यामध्ये मात्र हे दशहि गुण विद्यमान असून त्याचे स्वरुप तीव्रतर असते. विषामधे हेच गुण तीव्रतम स्थितीत असतात. विषमद्यांच्या उपयोगामुळें मनुष्याच्या चित्तवृत्तिच्या वा संज्ञेच्या प्रसन्नतेस कारणीभूत असणारे जे ओज त्यावर परिणाम होऊन मनुष्यास मूर्च्छा येते. (विशेष स्पष्टीकरण मदात्ययाच्या प्रकरणी पहावें पान ...)

मद्यैन विलपन् शेते नष्टविभ्रांत मानस:
गात्राणि विक्षिपन् भूमौ जरां यावन्न गच्छति
वेपथु: स्वप्न तृष्णा: स्युस्तमश्च विषमूर्च्छिते
वेदितव्यं तीव्रतरं यथास्वं विषलक्षणै:
मा. नि. मूर्च्छा १७ ते १८ पान १६५ म. टीकेसह

मद्यज मूर्च्छेमधे रोगी बडबडत आडवा होतो, त्याच्या मनाचे कार्य विकृत वा नष्ट होते आणि शरीराला झटके देत तो जमीनीवर लोळत असतो. मद्याचे पचन होईपर्यंत ही लक्षणे चालूं राहतात. विषज मूर्च्छेमधें कंप, निद्रा, तृष्णा, तमप्रवेश अशी लक्षणे दिसतात. या व्यतिरिक्त त्या त्या विशिष्ट विषाची जी विषलक्षणे सांगितलेली असतींल ती ही विषजमूर्च्छेमध्यें दिसून येतात.

सुश्रुतानें माधवाच्या पाठांतील `तम' ह्या पाठाऐवजी स्तंभ असा पाठ स्वीकारला आहे. शरीर जखडल्यासारखे, स्तब्ध ताठ होते असा त्याचा अर्थ आहे विषाच्या परिणामाचा विचार करतां तद उत्पन्न मूर्च्छेमधे दोनही लक्षणें मानणे योग्य आहे. विषाचे पचन होत नसल्याने विषज मूर्च्छा ही योग्यवेळी योग्य प्रकारे केलेल्या औषधोपचाराविना नष्ट होत नाही. असे टिकाकारानें म्हटले आहे.

उपद्रव

आघातजन्य पीडा.

उदर्क

क्वचित् उन्माद, पक्षवध, स्मृतिभ्रंश.

साध्यासाध्यविवेक

वातज, कफज, रक्तज व मद्यज - साध्य, पित्तज कष्टसाध्य, सान्निपातिक व विषज कष्टसाध्य व असाध्य

रिष्ट लक्षणें

श्वास, त्वग्‍ नखश्यावता.

चिकित्सासूत्रे

``सेकावगाहौ मणय: सहारा: ।
शीता: प्रदेहा व्यजनानिलांश्च ॥
शीतानि पानानि च गन्धवन्ति
सर्वासु मूर्च्छास्वनिवारितानि ॥१४॥
सु. उ. ४६-१४ पान ७४०.

पाणी शिंपडणे, अवगाह देणे, रत्नांचे वा फुलांचे हार धारण करणे, शीत लेप घालणे, वारा घालणे, सुंगधी व शात असे पेय पिण्यास देणे, असे उपचार करावे. पुढील संन्यास व्याधीच्या चिकित्सेतील अंजन, धूम, प्रधमन नस्य, या उपचारांचाहि उपयोग करावा.

कल्प

वातविध्वंस, बृहत्वातचिंतामणि, हेमगर्भ, समीरपन्नग, सूतशेखर, लक्ष्मीविलास अभ्रकभस्म.

पथ्य

शीत, शांत व प्रसन्नस्थळीं बसावे, सुंगंधी शीत असा आहार घ्यावा. मन प्रसन्न राहील अशा गोष्टी कराव्या.

वर्ज्य

उष्णसेवा, व्यायाम, उद्वेगादि टाळाव्या.

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP