मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|पुरवणी अभंग| ८४०१ ते ८४१० पुरवणी अभंग ८२९१ ते ८३०० ८३०१ ते ८३१० ८३११ ते ८३२० ८३२१ ते ८३३० ८३३१ ते ८३४० ८३४१ ते ८३५० ८३५१ ते ८३६० ८३६१ ते ८३७० ८३७१ ते ८३८० ८३८१ ते ८३९० ८३९१ ते ८४०० ८४०१ ते ८४१० ८४११ ते ८४२० ८४२१ ते ८४३० ८४३१ ते ८४४१ अभंग - ८४०१ ते ८४१० तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत अभंग - ८४०१ ते ८४१० Translation - भाषांतर ॥८४०१॥ रंकाची विनंती तूंच पक्षपाती । मज दीनाप्रती पाव वेगीं ॥१॥वर्णिताति वेद शास्त्रें आणि शेष । अवतारवेष भक्तांसाठीं ॥२॥दासांचा कैवारी जाणोनी साचार । आलों मी पामर पायांपासी ॥३॥कायावाचामनें अनन्यशरण । निशिदिनी ध्यान तुझें मज ॥४॥तुका म्हणे तुज विनवितों देवा । नाहीं सुख जीवा आणिक कांहीं ॥५॥॥८४०२॥ होत जात सर्व संचिताप्रमाणें । चाखोनियां कोणें रांधियेलें ॥१॥उदंड उपाय संपत्तीकारणें । सकळ ही जन करिताती ॥२॥परी जैसी जैसी संचिताची रेखा । अचल ब्रह्मादिका पूर्व पुण्य ॥३॥तुका म्हणे कळला निर्धार । लाविलें अंतर पांडुरंगीं ॥४॥॥८४०३॥ पुंडलीकें केली विमान पंढरी । अनंत श्रीहरी नामें तुझीं ॥१॥पावे पांडुरंगा बुडतों भवसागरीं । काढी झडकरी मज आतां ॥२॥तुका म्हणे थोर होय गर्भवास । पाहतसें वास अखंडित ॥३॥॥८४०४॥ झणी मुक्ति देसी जरी पांडुरंगा । मग संत संगा पाहूं कोठें ॥१॥मग पंढरीचा आनंदसोहळा । पाहूं मग डोळां कोणाचिया ॥२॥तुका म्हणे असो तुजी कृपादृष्टी । नलगे वैकुंठीं वास आम्हा ॥३॥॥८४०५॥कोण्या तरी योगें तुझा छंद लागो । मन माझें जागो भजनीं तुझ्या ॥१॥कोण्या तरी योगें पश्चात्ताप घडो । चित्त हें मुरडे स्वरुपीं तुझ्या ॥२॥कोण्या तरी योगें घडो संतसेवा । येवो अनुभवा निज सुख ॥३॥तुका ह्मणे ऐसा योग कोण वेळ । राहेन निश्चळ तुजपासी ॥४॥॥८४०६॥जंव नव्हे सारग्राही । भारवाही पशुची ॥१॥जो तो करी यातायाती । साच चित्तीं धरीन ॥२॥खर्या देवा पाठ केली । खेटे ह्मसोबा ॥३॥देवी देव्हारा जाखाई । फुलें लावी मुंज्यासी ॥४॥कोण्या गुणें जडली भक्ती । स्वार्थ चित्तीं नेणें मी ॥५॥तुका ह्मणे देखीलें डोळा । ऐसी कळा विपरीत ॥६॥॥८४०७॥भक्ति काय ह्मणजे जनीं जनार्दन । आलंकार सोनें भिन्न नसे ॥१॥सर्व भूतीं देव आपणासकट । जाणोनी निकट भजा येणें ॥२॥ज्ञान ह्मणजे काय आपणा जाणणें । जाणुनी नेणणें विज्ञान तें ॥३॥एक पूजा करी दूजा तोंडावरी । मारीतां अंतरीं क्रोध नये ॥४॥शांतींचें हें रुप बोललों प्रकार । या गुणें निर्धार ज्ञानी ह्मणूं ॥५॥विरक्ति ते विष विषयाचा त्याग । इहामूत्र सोंग निरसणें ॥६॥सर्व भूतीं आत्मा असावी करुणा । परदु:ख प्राणा साऊं पाहे ॥७॥याहि गुणें युक्त धन्य तोचि ज्ञानी । तयांचे चरणीं लोळे तुका ॥८॥॥८४०८॥मागें झाल्या कीर्ति ऐकोनियां कानीं । तैसा का निशाणीं द्याना डंका ॥१॥अहल्या द्रौपदी तारा दमयंती । मंदोदरी सती सीता माता ॥२॥पार्वती सावित्री रुक्मिणी अनुसूया । मदालसा माया मैनावती ॥३॥देवकी यशोदा कयाधु चांगुणा । संध्यावळी जाणा जिचा डंका ॥४॥माता शुद्धमती ज्ञाती ती मिराई । जगाची मुक्ताई मुक्त झाली ॥५॥तुका ह्मणे आतां जनीतें आइका । तैशा व्हागे सत्या बाइयांनो ॥६॥॥८४०९॥हनुमंत जानकिकिंकर । चाळोनी गेला लंकेवर ॥१॥गेला अशोक वनाला । तेथें देखिली सीतेला ॥२॥फराळाचे मिषें । केला बागेचा विध्वंस ॥३॥तुका ह्मणे जंबुमाळी । रगडीला महीतळीं ॥४॥॥८४१०॥अहो अंजनीच्या पुता । नांव तया हनुमंता ॥१॥जेणें सीताशुद्धि केली । रामसीता भेटविलीं ॥२॥आणोनियां द्रोणगिरी । सौमित्र वांचविला निर्धारीं ॥३॥ऐसा परोपकारी सखा । तया शरणागत तुका ॥४॥ N/A References : N/A Last Updated : August 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP