मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|पुरवणी अभंग| ८४११ ते ८४२० पुरवणी अभंग ८२९१ ते ८३०० ८३०१ ते ८३१० ८३११ ते ८३२० ८३२१ ते ८३३० ८३३१ ते ८३४० ८३४१ ते ८३५० ८३५१ ते ८३६० ८३६१ ते ८३७० ८३७१ ते ८३८० ८३८१ ते ८३९० ८३९१ ते ८४०० ८४०१ ते ८४१० ८४११ ते ८४२० ८४२१ ते ८४३० ८४३१ ते ८४४१ अभंग - ८४११ ते ८४२० तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत अभंग - ८४११ ते ८४२० Translation - भाषांतर ॥८४११॥प्रेमळाची वार्ता । ती अनुवादूं पंडुसुता ॥ ती मानूं परम दैवता । पदही माथां वंदूं त्याचे ॥१॥प्रेमळ वेष दिसतो वेडा । सुंदर बाबदेचा खडा ॥जिकडे घातला तिकडे गोडा । न करी पीडा कोणासी ॥२॥मृदु नवनीताचा गोळा । आंत बाहेर कोंवळा ॥सज्जन दुर्जनाचा पाळा । समान बाळासारिखा ॥३॥आपपराची ओळखी । मोडून टाकी मेली निकी ॥सदा अंतर स्वात्मसुखी । नाम मुखीं उच्चारीं ॥४॥ऐशियाची बहु लुटार । वाचे वर्णावी ही सार ॥उद्धवा सांगे शारंगधर । कथा ही सार जुनाट ॥५॥हीं सहा चिन्हें पाही । एका कदुर्वीच्या ठायीं ॥धन्य धन्य ज्याची मायी । पर उपकार सोई अवतरली ॥६॥सद्गुरुकृपा झाली नीति । तेचि झाले सदा सुखी ॥तुका ह्मणे बोलतां सुखीं । रोमांच सुर मी उभारिले ॥७॥॥८४१२॥व्यास वाल्मिकी हे मुनी । वापी कूप भरलें पाणी । बाहेर नये प्रयत्नांवाचुनी । दोर शेंदणी केलिया ॥१॥धन्य पुंडलीक परोपकारी । केली क्षेत्राची ते दोरी ॥माता पित सेवा सेवा निरधारी । आणिला हरी सन्निध ॥२॥बैसावया सम दृष्टी । भाकेस गोण उभा पाठी ॥मौन्य कर ठेवुनियां कटी । सुख संतोषें आनंदें ॥३॥देवा सुटली चळवळ । कोणी सखे नाहीं जवळ ॥भक्त गेले हे भूपाळ । न गमे काळ सुखाचा ॥४॥हरी विचारी मानसीं । गेले बदरीकाश्रमासी ॥प्रार्थीतसे उद्धवासी । चल पंढरीसी जिवलगा ॥५॥उद्धव ह्मणे कमळापती । नको गर्भवास स्थिति ॥तुझे पाय आठउनी चित्तीं ॥ दिवस रात्रीं संतोषे ॥६॥माझे अवतार हे जनीं । तीर्थव्रताचे जे खाणी ॥विशाळी राहती पद्मसुमनीं । पुसा जाऊनी तियेसी ॥७॥हरी येऊनियां तेथें । मधुर उत्तरें प्रार्थीत ॥जगा उपकार करी त्वरित । भक्तिपंथें लावावें ॥८॥तूं तर जगत्रयजननी । तुझें नाम मुख्य जनीं ॥उद्धव नाम घोषाची खाणी । नामदेव ह्मणुनी नाम तया ॥९॥ऐसें बोलुनी तात्काळीं । तोडुनी घेतली सुमनकळी ॥मस्तकीं ठेवियली मौळी । आला तात्काळीं पंढरी ॥१०॥जैसा शिवमस्तकीं गंगाओघ । तैसी धरली पांडुरंगे ॥उद्धवा चळवळ सुटली अंगें । तो भाग न साहे रवीचा ॥११॥पांच वर्षाची गोरटी । पुढें आणिली जगजेठी ॥मागें उद्धव नामा पाठी । आला मोटी तात्काळीं ॥१२॥दामाशेटी गोणाईची भक्ति । फळा आली त्वरित गति ॥तुका ह्मणे भाक पाहिलीच होती । केली संतीं पावन ॥१३॥॥८४१३॥धन्य धन्य शिंपी नामा । धन्य धन्य ज्याच्या नेमा ॥धन्य जनी दासीचा प्रेमा । मेघ:शामा भुलविला ॥१॥उभारिला भक्ति हा झेंडा । नाम निशाण भडके तोंडा ॥संत हाटीं अपार फंडा । मूळ बीज गुंडा ब्रम्हींचा ॥२॥प्रथम घेऊं जातां भेटी । ताक कण्या भरली वाटी ॥लावी देवाजीच्या ओठीं । जेवीं जगजेठी ह्मणुनियां ॥३॥जेवीं जेवीं बा मुरारी । माता वाट पाहे घरीं ॥विलंब न लावी तरी । ग्रास करीं घेई कां ॥४॥तुझे हात गुंतले जघनीं । ह्मणोनी ग्रास घालितों वदनीं ॥खरकटें अंगावर सांडोनी । पीतांबर घाणी होतसे ॥५॥एक दोन तीन ग्रास । घालतांना होतो नाश ॥न जेवितां जगदीश । होती क्लेश जिवलगा ॥६॥सुखापासून फिरवितां ग्रास । नाहीं चाखिला म्यां रस ॥तुज काम आला रोष । काय दोष आचरलों ॥७॥लोटिल्या पक्वान्नाच्या राशी । दांतीं कण्या मागोनी खासी ॥आतां काय थोरपण आलें कुसी । हृषीकेशी अनंता ॥८॥गेलों विदुराच्या घरीं । जेवलों भाज्या आणि भाकरी ॥भाक दिलीस माझे करीं । निज निर्धारीं चालवीन ॥९॥मी तों होतों निर्विकारी । कारण माझें पंढरी ॥ओढिली प्रेमसूत्राची दोरी । ह्मणोनी पोरी आली येथें ॥१०॥माझी जिवलग ही जनी । पुढें ओढली व्यसनीं ॥ह्मणुनियां स्थानीं । चक्रपाणी आलों मी ॥११॥लहान ह्मणोनी जेवीनास । घातली निश्चयाची कांस ॥परतोनी न जाय घरास । करीन नाश देहाचा ॥१२॥मागें सरोनियां करीं । धडक मारी पायांवरी ॥चळवळ कांपत असे हरी । मस्तक करीं धरियलें ॥१३॥लावोनियां नेत्रपात । कंठीं बाष्प तैं दाटत ॥देह कोरडे करों पाहत । अंगीं रोमांच उभारिले ॥१४॥गजबजला जगजेठी । कवळून धरियेला पोटीं ॥जिवलगा नको पाहों तुटी । देई भेटी सत्वरी ॥१५॥नामा लक्षी येरे साठीं । दहा अवतार धरिले नेटीं ॥हिंडतसें तुझे पाठीं । नको तुटी पाहूं कीं ॥१६॥नामा मौनें राहत । देवा आले अश्रुपात ॥ हरी सांगे रुक्मिणीतें । समजावी यातें जिवलगे ॥१७॥रुक्मिणी ह्मणे चक्रपाणी । कण्या खाव्या ह्या चाटोनी ॥आडवा वोसंगा घेऊनी । जगत्रयजननी कुरवाळी ॥१८॥आडवा घेउनी भक्तराणा । मुखीं घालितसे स्तना ॥पाजितसे प्रेमपान्हा । आवडे मना आनंदें ॥१९॥सावध करुनी प्रेमप्रीति । तिघें बैसोनी कण्या खाती ॥कोणी वर्णावी ही ख्याती । प्रेमळाची ॥२०॥जें न कळे ब्रह्मासी । प्राप्त नाहीं प्रद्युम्नासी ॥तें पाजिलें नाम्यासी । प्रेमरसें आनंदें ॥२१॥तें तें भरलें पोटीं । ह्मणोनी संकल्प शत कोटी ॥तुका ह्मणे पूर्णता नेटीं । शेष शेवटीं आली येथें ॥२२॥॥८४१४॥नाम नाहीं मुखीं नाइके श्रवणीं । तया कां जननी प्रसवली ॥१॥प्रसवली परी झाला भूमीभार । तया दंड थोर कुंभपाक ॥२॥असिपत्रावरी तयासी टाकिती । पायीं चालविती तप्त भुमी ॥३॥चौर्यासी योनी नर्क महा घोर । टाकिती भीतर अभक्तांसी ॥४॥तुका ह्मणे कांहीं करा सोडवण । आठवा चरण गोविंदाचे ॥५॥॥८४१५॥मुखीं ब्राह्मण जन्मले । बाहुपासून राजे झाले ॥१॥उरी वैशवर्ण पाहीं । शूद्र चरणाचे ठायीं ॥२॥गुडघ्यापासून ब्रह्मचारी । गृहस्थ पायीं अवधारी ॥३॥सन्यासी तो झाला माथां । वक्षस्थळ वानप्रस्था ॥४॥तुका ह्मणे भेद । ऐसें बोलियला वेद ॥५॥॥८४१६॥गुरु करावा पाहुनी । दया क्षमा ज्याचे मनीं ॥१॥तो हा ज्ञानाचा पुतळा । पाय वंदूं वेळोवेळां ॥२॥सम दृष्टी सर्वावरी । पुण्यशील ब्रह्मचारी ॥३॥तुका ह्मणे मुक्ताफळ । फुगा नव्हे तो केवळ ॥४॥॥८४१७॥राम जप करी सांव । आरोग्य झालें सर्व अंग ॥१॥नाम जप करी ब्रह्मा । तो तंव अनुसरला कर्मा ॥२॥नाम जप करी वेद । तो मौन्यें झाला स्तब्ध ॥३॥तुका ह्मणे नाम जपतां । मौन न रहावें सर्वथा ॥४॥॥८४१८॥ज्याचे मुखीं राम नाम । त्याचें सांगा मजला काम ॥१॥ज्याचें घरीं पारायण । त्याची मजुरी करीन ॥२॥ज्यासी पंढरीची वारी । त्याची सांगा मज चाकरी ॥३॥तुह्मी अवघे जन चला । त्याचे हातीं द्या हो मला ॥४॥तुका ह्मणे घाला भीड । त्याला जगाची आवड ॥५॥॥८४१९॥दर्कदार ह्क्कदार । संतांमाजी सौदागर ॥१॥सनद शिक्याचें पत्र । गर्जताती अहोरात्र ॥२॥दामशेटी देशमुख । प्रत्यक्ष श्रीहरीचें मुख । नामा शिरकारी शिक्का शोभे । जनाईपाठीं शुद्ध मोर्तब ॥४॥निवृत्तीराज श्रेष्ठ शुद्ध । मजपाशीं सकळ आद ॥५॥देशपांडया ज्ञानराज । त्याचे रुमालीं निज बीज ॥६॥काकु मडका पाटील भला । जाट धनाजी चौगुला ॥७॥चांगदेव कुळकर्णी । वर्षे चौदाशांची धणी ॥८॥मुक्ताई करी तपासणी । खरें खोटें निवडा दोन्ही ॥९॥सरकार दत्त जनार्दन । एकनाथ दिवाण ॥१०॥कबीर खंबीर हवलदार । रामनामाची ताकीद थोर ॥चोखा महार वेसकर । फांटा मारी वाकीवर ॥१२॥नरहरी सोनार पोतदार । एक पारखीचा निर्धार ॥१३॥तुका तेथील नाईक वाणी । मोडी भद्राईच्या खोडी ॥१४॥॥८४२०॥नमस्कार कीर्तन रंगा । संत श्रोते भाविक लिंगा ॥प्रेम चढो माझिया अंगा । देह नि:संगा होवोनियां ॥१॥आरंभीं नमितों दैवता । कुळीचें कुळस्वामिणी आतां ॥मुख्य सद्गुरु तो दाता । चरणीं माथां जयाच्या ॥२॥चंडी विनायक मारुती । बहिरी हरीहराच्या मुर्ती ॥ब्रह्मरुप ब्रह्मींच्या मुर्ती । आदि शक्ती आदि माया ॥३॥चोखोबा माझा गणपती । राधाई झारीण सरस्वती ॥गोरोबा बलभीम मारुती । अगाध कीर्ति जयाची ॥४॥सांवता माझा काळबहिरी । उदर चिरोनियां करीं ॥५॥पोटीं सांठविला हरी । निज निश्चयें ॥५॥आदिनाथ निवृत्तीनाथ । ज्ञानराज महा विष्णुची ज्योत ॥सोपान ब्रह्मरुप मूर्त । आदि शक्ति मुक्ताई ॥६॥नवविध भक्ति नवविध रत्न । आरंभीं करितों स्तवन ॥तुका ह्मणे आलो शरण । करितों नमन सेवेसी ॥७॥ N/A References : N/A Last Updated : August 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP