मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|पुरवणी अभंग| ८३६१ ते ८३७० पुरवणी अभंग ८२९१ ते ८३०० ८३०१ ते ८३१० ८३११ ते ८३२० ८३२१ ते ८३३० ८३३१ ते ८३४० ८३४१ ते ८३५० ८३५१ ते ८३६० ८३६१ ते ८३७० ८३७१ ते ८३८० ८३८१ ते ८३९० ८३९१ ते ८४०० ८४०१ ते ८४१० ८४११ ते ८४२० ८४२१ ते ८४३० ८४३१ ते ८४४१ अभंग - ८३६१ ते ८३७० तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत अभंग - ८३६१ ते ८३७० Translation - भाषांतर ॥८३६१॥ज्ञानियांचे घरीं चोजवितां देव । तेथें अहंभाव पाठी लागे ॥१॥ह्मणोनियां ऐसें सांडिले उपाय । धरियेले पाय दृढ तुझे ॥२॥वेदपरायण पंडित वाचक । न मिळती एक एकामधीं ॥३॥पाहों गेलों भाव कैसी आत्मनिष्ठा । तेथें देखे चेष्टा विपरीत ॥४॥आपुलिया नाहीं निवाले जे अंगें । योगी करिती रागें गुरगुर ॥५॥तुका ह्मणे कोणाचा पांगिला । नको बा विठ्ठला करुं आतां ॥६॥॥८३६२॥नमो नमो तुज माझें हें कारण । काय झालें उणें करितां स्नान ॥१॥संतांचा मारग चालतो झाडूनि । हो कां लाभ हानि कांहीं तरी ॥२॥न करिसी तरी हेंचि कोडें मज । भक्ति गोड काज आणिक नाहीं ॥३॥करीं सेवा कथा नाचेन रंगणी । प्रेम सुख धणी पुरेल तों ॥४॥महाद्वारीं सुख वैष्णवांचे मेळीं । वैकुंठ जवळी वसे तेथें ॥५॥तुका ह्मणे नाहीं मुक्तिसवें चाड । हेंचि मन्म गोड घेतां मज ॥६॥॥८३६३॥दैन्य दु:ख आह्मां न येती जवळी । दहन हे होळी होती दोष ॥१॥सर्व सुखें येती माने लोटांगणीं । कोण यांसीं आणी दृष्टीपुढें ॥२॥आमुची आवडी संतसमागम । आणीक त्या नाम विठोबाचें ॥३॥आमचें मागणें मागों त्याची सेवा । मोक्षाची निर्दैवा कोणा चाड ॥४॥तुका ह्मणे पोटीं सांठविला देव । न्यून तो हा भाव कोण आह्मां ॥५॥॥८३६४॥आह्मी देतों हाका । कांरे झालासी तूं मुका ॥१॥न बोलसी नारायणा । कळलासी क्रियाहीना ॥२॥आधीं करुं चौघाचार । मग सांडूं भीडभार ॥३॥तुका ह्मणे सेवटीं । तुह्मा आह्मां घालूं तुटी ॥४॥॥८३६५॥शेवटली पाळी तेव्हां मनुष्यजन्म । चुकलीया वर्म पडे फेरा ॥१॥याचि देहीं येथें वळखा आत्माराम । संसार सुगम लेखूं नका ॥२॥संसारीं असावें असोनि नसावें । भजन करावें वेळो वेळा ॥३॥तुका ह्मणे पडे शुद्धस्वरुपीं गांठीं । मग आटाआटी करणें नलगे ॥४॥॥८३६६॥संग्रामाचे अंतीं जुंझावया जाती । मागें पुढें घेती जीवा भ्यानें ॥१॥तरवारीच्या वेळे वोहळाकडे पळे । बोलतो सबळ मैदानांत ॥२॥मनाचा करार पाहिजे निर्धार । जैसा दीपावर पतंग नीट ॥३॥तुका ह्मणे शूर कैचे घरोघरीं । अवघे फजितखोरी पोटासाठीं ॥४॥॥८३६७॥नाम ह्मणतां मोक्ष नाहीं । ऐसा उपदेश करिती कांहीं ॥बधिर व्हावें त्याचे ठायीं । दुष्ट वचन वाक्यतें ॥१॥जयाचे राहिलें मानसीं । तेचि पावले तयासी ॥चांचपडतां मेलीं पिसीं । भलतैसीं वाचाळें ॥२॥नवविधीचा निषेध । जेणें मुखें करिती वाद ॥जन्मा आले निंद्य । शूकर याती संसारा ॥३॥काय सांगों वेळोवेळां । आठव नाहीं चांडाळा ॥नामासाठीं बाळा । क्षीरसागरीं कोंडिलें ॥४॥आपुलिया नामासाठीं । लागे शंखासुरापाठीं ॥फोडोनियां पोटीं । वेद चारी काढीले ॥५॥जगीं प्रसिद्ध हे बोली । नामें गणिका तारिली ॥आणिकें हीं उद्धरिलीं । पातकी महादोषी ॥६॥जे हे पवाडे गर्जती । नाम प्रल्हादाच्या चित्तीं ॥जळतां बुडतां घातीं । राखे हातीं विषाचे ॥७॥काय सांगो ऐशीं किती । तुका ह्मणे नामख्याती । नरक्राप्रती जाती । निषेधिती ती एकें ॥८॥ ॥८३६८॥ सत्यचक्रस्थानीं राहतो गणपती । चतुर्दल आहेती तयालागीं ॥१॥मातृकाहि चार ययालागीं असती । दुसर्याची गति नसे तेथें ॥२॥मुख्य अधिपत्य मेरुचें तें मूळ । निर्गुणाचें फळ जाणतसे ॥३॥तुका ह्मणे आहे थोडकीच कळा । जाणे तो वेगळा योगीराज ॥४॥॥८३६९॥ आधारचक्रस्थानीं राहतो गणपती । चतुर्दल आहेती तयालागीं॥१॥मातृकाहि चार ययालागीं असती । दुसर्याची गति नसे तेथें ॥२॥मुख्य अधिपत्य मेरुचें तें मूळ । निर्गुणाचें फळ जाणतसे ॥३॥तुका ह्मणे आहे थोडकीच कळा । जाणे तो वेगळा योगीराज॥४॥॥८३७०॥स्वाधिष्ठान चक्रीं असे ब्रह्मदेव । तोचि जाणा ठाव सत्य लोक ॥१॥सहा मातृकांअचा असे अधिकारी । प्रजा झाली सारी तेथूनियां ॥२॥स्वामी तो विश्वाचा सावित्रीसहित । जाणतां सहित होय तेणें ॥३॥तुका ह्मणे गुरुघरची आहे कळा । अंजन हें डोळां घाला तुह्मी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : August 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP