मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|पुरवणी अभंग| ८३९१ ते ८४०० पुरवणी अभंग ८२९१ ते ८३०० ८३०१ ते ८३१० ८३११ ते ८३२० ८३२१ ते ८३३० ८३३१ ते ८३४० ८३४१ ते ८३५० ८३५१ ते ८३६० ८३६१ ते ८३७० ८३७१ ते ८३८० ८३८१ ते ८३९० ८३९१ ते ८४०० ८४०१ ते ८४१० ८४११ ते ८४२० ८४२१ ते ८४३० ८४३१ ते ८४४१ अभंग - ८३९१ ते ८४०० तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत अभंग - ८३९१ ते ८४०० Translation - भाषांतर ॥८३९१॥अंधारानें दीपा आणियेली शोभा । माणिकासी प्रभा कोंदणाची ॥१॥रोगियानें वैद्य आणिला उजेडा । नाहीं तरी द्वाडा कोण पुसे ॥२॥कल्पतरुची कीर्ति कैसेनि वाढती । कल्पना नसती वाचकासी ॥३॥परिसाचा महिमा वाढतो कशानें । लोह निरमाण नसतें जरी ॥४॥तुका ह्मणे आह्मी असोनियां जन । तुज देवपण आणियेलें ॥५॥॥८३९२॥देह देवपाट हृदयसंपुष्ट । आंत कृष्ण मूर्त बैसविली ॥१॥प्रेमाचें हें पाणी प्रक्षाळीन तूज । आत्मा सखा निज पांडुरंग ॥२॥भाव करुनी गंध भक्तीच्या अक्षता । लाविल्या अनंता निढळासी ॥३॥मन केलें मोगरा चित्त केलें शेवंतीं । सत्वाच्या तुळसी अर्पियेल्या ॥४॥जळो क्रोध धूप उजळो ज्ञानदीप । ओंवाळूं स्वरुप पांडुरंग ॥५॥षड्रस पक्वान्नें केलीं कृष्णार्पण । इच्छिलें भोजन समर्पिलें ॥६॥तुका ह्मणे पूजा केली मनभावें । पंच प्राणासंवें समर्पिली ॥७॥॥८३९३॥आपुल्या हातीं तुह्मी कापा माझी मान । जगांत अपमान करुं नका ॥१॥वैर्याहातीं वर्म नका देवूं देवा । अभिमान केशवा राखी माझा ॥२॥तुजविण कवणा यावें काकुळती । कोण कामा येती अंत काळीं ॥३॥तुका ह्मणे झालों लहानाहुनी लहान । पायींचा मी दीन दास तुझा ॥४॥॥८३९४॥सेतीं बिज नेतां थोडें । मोठे आणिताती गोड ॥१॥एक्या नामें हरि जोडे । फिटे जन्माचे सांकडें ॥२॥बाळे भोळे जन । सर्व तरती कीर्तनें ॥३॥तुका ह्मणे तेणें मुढें । नाम स्मरावें साबडें ॥४॥॥८३९५॥जासी तरी जाई संतांचिये गांवा । होईल विसांवा मना तेथें ॥१॥करिसी तरी करी संतांची संगत । आणिकांची मात नको मना ॥२॥बैससी तरी बैस संतांचिये मधीं । आणिकांची बुद्धि नको मना ॥३॥तुका ह्मणे संत कृपेचे सागर । मना निरंतर घ्यावी धणी ॥४॥॥८३९६॥ कलियुगीं साधन नामाविण नाहीं । यासाठीं लवलाही नाम घ्यावें ॥१॥नामस्मरणी कांहीं न करावा अळस । कैलासीं महेश नाम घ्यावेंपाताळीच्या शेषा नामाचा आधार । नामेंचि समुद्र शिळा तारी ॥३॥तुका म्हणे नाम साधनाचें सार । विष हें अमर नामें झालें ॥४॥॥८३९७॥निरंजनभवनीं देखियेली गाय । तीन तिसी पाय चार मुखें ॥१॥सहस्त्र शोभती डोळे नौ तिसी कान । सत्रावीचें स्थान संग एक ॥२॥ऐसी कामधेनु व्यासांनीं पाळिली । शुकांनीं वळिली जनकाघरीं ॥३॥तुका ह्मणे गाय भाग्यें नरा भेटे । अभाग्य करंटे वांया गेले ॥४॥॥८३९८॥सत्वाचें शरीर भवाचें कीर्तन । प्रेम जनार्दन उभा तेथें ॥१॥अहिंसा मृदंग अद्वैताची टाळी । प्रेमाची आरोळी हरिनाम ॥२॥सप्रेमाचा विणा नि:संगाच्या तारा । आणिला दरारा पातकांसी ॥३॥जगत्रयजीवन योगियांचा राणा । ध्यानीं मनीं आणा तुका ह्मणे ॥४॥॥८३९९॥ मनुष्य संसारीं उदंड अन्यायी । ह्मणोनियां नाहीं भेटी देवा ॥१॥ऐसें जरी मनीं धरिसील कांहीं । मग सर्वथा ही नव्हे भेटी ॥२॥वायां दवडूं नको आवड भेटीची । सई आनाथाची न विसरें ॥३॥तुका म्हणे दिली नामाची आवडी । तैसी घाली उडी भेटावया ॥४॥॥८४००॥ पहिलाच जरी असतों अज्ञान । तरी कांहीं सीण न वाटता ॥१॥नामाचें चिंतन दिलें दारीं घरीं । चित्त भेटीवरी रात्रंदिस ॥२॥अगा जरी मन कठीण कराल । बहुत होतील कष्ट मज ॥३॥तुका म्हणे आतां देऊं नको सीण । पहिलें वचन दिलें आहे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : August 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP