मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|पुरवणी अभंग| ८४३१ ते ८४४१ पुरवणी अभंग ८२९१ ते ८३०० ८३०१ ते ८३१० ८३११ ते ८३२० ८३२१ ते ८३३० ८३३१ ते ८३४० ८३४१ ते ८३५० ८३५१ ते ८३६० ८३६१ ते ८३७० ८३७१ ते ८३८० ८३८१ ते ८३९० ८३९१ ते ८४०० ८४०१ ते ८४१० ८४११ ते ८४२० ८४२१ ते ८४३० ८४३१ ते ८४४१ अभंग - ८४३१ ते ८४४१ तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत अभंग - ८४३१ ते ८४४१ Translation - भाषांतर ॥८४२१॥देवालय बांधिलें सुंदर । कळाकुशलीं चित्राकार ॥१॥मुख्य पहावा तो कळस । पिका आला ब्रह्मरस ॥२॥ध्यावें सर्वाचें तें सार । बहु सिंधु जेणें पार ॥३॥मुख्य पहावा० ॥४॥ॐ नमो भगवते वासुदेवाय । अक्षर द्वादश मुख्य पाहे ॥५॥सद्गुरुघरचा निज बीज कळस । पिका आला ॥६॥गीता भागवत ज्ञानेश्वरी । रामायण विवेकीसिंधुची आत्मलहरी ॥७॥पहावा अवघ्याचा कळस । पिका आला०॥८॥योग क्षेम चालवी तत्क्षणीं । ही तों श्रीमुखेंची वाणी ॥९॥अवघ्या गीतेचा कळस । पिका आला० ॥१०॥मुक्तिवरील गुरुभक्ति । उद्धवें मागितली प्रेमप्रीति ॥११॥आज भागवताचा कळस । पिका आला०॥१२॥माळीयें जेवूतें नेलें । तेवूतें उगेंचि निवांत गेलें ॥१३॥हा तों ज्ञानेश्वरीचा कळस । पिका आला०॥१४॥अहं तत्वं सोहं श्रीरामरामाय । हा विश्वनामाचा जय पाहे ॥१५॥मुख्य रामायणाचा कळस । पिला आला०॥१६॥याचि देहीं याचि डोळां । पाहे मुक्तिचा सोहळा ॥१७॥नको जाऊं मनाचे मागें । मुनी जयत्पाळा सांगे ॥१८॥हाच ज्ञानाचा कळस । पिका आला०॥१९॥अंबरीष प्रल्हाद अंगद । उद्धव नामया नामाचा बोध ॥२०॥हाच भक्तीचा कळस । पिका आला०॥२१॥संकल्प शतकोटी केलासे । तुका ह्मणे लाभले शेष ॥२२॥झाला अवतारांचा कळस । पिका आला०॥२३॥॥८४२२॥अविनाश दिगंबरु । सोय लाविली हरीहरु ॥मंत्र सांगेन बीजाकारु । पर उपकारु लोक तिन्ही ॥१॥सांबापासून चारी योग । सांबापासुन चारी जोग ॥सांबापासून चारी मार्ग । प्रेमरंग सद्गुरुचा ॥२॥एक गंगा मस्तकीं होती । तेथें गोदा भागिरथी ॥माध्यांकिनी स्वर्गाप्रती । भोगावती शेषाची ॥३॥एकाचे कैवाडें । जगमीं बहुताचें कोडें ॥एक एकाचे आवडे । प्रेमरस जोडे आनंदें ॥४॥नायकांत चैतन्य नंद । चौघां सारखाचि बोध ॥आपले आवडे प्रेमानंद । प्रेमधुंद प्रेमातें ॥५॥शक्ति उपदेशासाठीं । गेला सिंधुचिया भेटी ॥कल्पद्रुमाचिया तळवटी । साध्य गोष्टी साधली ॥६॥विष्णु मत्स्याचे उदरी । शुक ब्रह्म पक्षावरी ॥शक्ति रस घेऊनि मांडीवरी । बीज निर्विकारी सांगत ॥७॥समाधी लागली भवानी । शुकें पाहिली लोचनीं ।किल्कारी देऊन परी जागी । क्रोध मनीं सांबाचा ॥८॥खाकरा टाकुनी त्वरीत । सुत निर्मिला जालींद्रकांत ॥पार्वती कानींचा मळ काढीत । कानीफा तेथें निर्मिलें ॥९॥कानीफा करी जालींद्रसेवा । चारा विसरला रावा ॥त्रिशूळ टोंचुनियां देवा । भुमी ठावा पाडिला ॥१०॥हें देखोनी विपरीत । शक्ति मागें मुख फिरवित ॥ब्रह्मवेत्त्या गुरुपुत्राचा घात । हत्या त्वरित पडियेली ॥११॥सांब विचारितसे मनीं । ह्मणे विपरीत झाली करणी ॥शोणित वाजवा पुसोनी । सावध तत्क्षणीं तो केला ॥१२॥कृपा द्रवला आदिनाथ । नांव नंद त्या ठेवित ॥मत्स्य अवलोकुनियां तेथ । मत्सेंद्रनाथ काढिला ॥१३॥कृपा द्रवला सद्गुरुराय । एकचि निश्चय काढिला भाव ॥चौघां ठेवियलीं चार नांवें । नायकांत चैतन्य नंद ॥१४॥द्वादश अक्षरांचा मंत्र । एक एका सांगितला सार ॥मूळ बीज एकचि थोर । नांवें चार ठेवियलीं ॥१५॥हेचि चार जोग । हेचि चार सद्गुरुमार्ग ॥तुका ह्मणे प्रेमरंग । अवचित ओघ उपटला ॥१६॥॥८४२३॥होतों निर्गुण निर्विकार । मज नव्हता आकार ॥भक्तांसाठीं हे विकार । येवढा पसारा ॥१॥साधु माझें दैवत । भक्त माझे हे तात ॥काय बोलूं त्यांची मात । नाहीं जात तयांला ॥२॥भक्तांसाठीं साहाकार । भक्तांसाठीं हा विस्तार ॥भक्तांसाठीं क्षीरसागर । वेदउच्चार भक्तांसाठीं ॥३॥भक्तांसाठीं केलें वैकुंठ । भक्तांसाठीं क्षेत्रपीठ ॥भक्तांसाठीं झाले जळचर । भक्तांसाठी वनचर ॥भक्तांसाठीं राज्यधर । पाळक पोर गवळियांचा ॥५॥भक्तांसाठीं निर्विकारी । भक्तांसाठीं ब्रह्मचारी तरी । भक्तांसाठीं तरी । दंड करीं घेऊन उभा ॥६॥भक्तांसाठीं लेतो लेणीं । भक्तांसाठीं कौस्तुभमणी ॥भक्तांसाठीं कमळा कामिनी । घरस्वामिणी रमा केली ॥७॥भक्तांसाठीं गदा चक्र । भक्तांसाठीं चाप शर ॥भक्तांसाठीं आयोध्ये भार । करावया संहार दुष्टांचा ॥८॥भक्त निश्चय निधडे । भक्त ब्रहाचे हे कुडे ॥भक्त सुधारसाहुन गोडे । पुरविती कोडे चित्ताचे ॥९॥भक्त नामाचे भांडारी । भक्त तारक नौका तरी ॥तुका ह्मणे आले विश्वंभरा घरीं । खोळंबेल वारी पंढरीची ॥१०॥॥८४२४॥ धन्य भंडार्या डोंगर । धन्य संताचें माहेर ॥देवें दिधलें निज घर । कीर्तनगजर करावया ॥१॥अंगीं येऊनियां अनंत । गरुड लक्ष्मीसमवेत ॥गेले बल्लाळाच्या वनांत । वस्ती केली रहावया ॥२॥अंगीं घेऊनियां हरी । जागा नेमिलिया करीं ॥समस्त सुरवरीं । सनकादिकीं येऊनि ॥३॥सिद्ध टेंकडी सिद्ध विनायक । आपण साक्षीभूत देख ॥सुरवर सनकादिकीं येऊनि । सिद्ध टेंकडी सिद्ध विनायक ।आपण साक्षीभूत देख ॥ सुरवर सनकादिक । वृक्षपाषाणरुपें रहाती ॥४॥जन्मभूमी वसता ठाव । कीर्तनीं न धरती भाव ॥ह्मणोनी त्यागुनियां गांव । दूर देशीं कीर्तन ॥५॥जुना कोट देहू गांव । अलकावती पुण्य ठाव ॥किर्तनाला भाव । दिला ठाव नेमूनियां ॥६॥पर्वकाळ हरिदिनी । कीर्तन किजे समरंगणीं ॥तुका ह्मणे सांगितलें कानीं । देवें वाणी आपुलिये ॥७॥॥८४२५॥निर्धूत व्हावे निर्विकारी । अंतर बाहेर ब्रह्मचारी ॥तेणें राहावें अलकापुरीं । ज्ञानेश्वरीपारायण ॥१॥द्रव्यदारांच्या खटपटा । समूळ मोडावया तो तंटा ॥तेणें राहावें जगद्रुरुमठा । ब्रह्मनिष्ठा ब्रह्मव्रत ॥२॥आत्मबोध भरावा पोटीं । तेणें जावें पैठणा भेटी ॥नाथाच्या सदनीं राहावें मठीं । होईल भेटी भाविका ॥३॥आत्मज्योत उजळावी ज्योति । तेणें न्हावें चक्रतीर्थी ॥सिद्ध जेठा देऊनी वसती । अखंड वस्ती सुखी राहावें ॥४॥द्वादश धनुष्य आकृत । चार राते पांच हात ॥चौघी रहा भुमीका पवित्र । वैकुंठपीठ ते स्थळ ॥५॥तें तळ तर पाताळ ही पुरी । हेटकेश्वराची नगरी ॥विष्णुला चक्र लाधलें करीं । निज निर्धारी तें स्थळ ॥६॥तेथें राहावें पवित्र नेम । मनीं चिंतूं नये काम ॥किंचित होतां ना भ्रम । वज्रलेप पातक तें ॥७॥गंगा भागिरथी ओघ दोन । त्रिवेणीसंगमीं करी स्नान ॥अश्वत्थाखालीं कीर्तनमान । पवित्र स्थान अजानंत ॥८॥पंढरी क्षेत्रा जाती जाण । वारी चालवावी मान्य ॥कर्मा धर्मा त्यागाचा शिण । व्हावें लीन संतपदीं ॥९॥पंढरी क्षेत्र द्वारावती जाण । अलंकापुरीं प्रतिष्ठान ॥तुका ह्मणे ऐकवी मन । पवित्र स्थान मोक्षाचें ॥१०॥॥८४२६॥नायक विश्वाचा ब्रह्मांड गोसांवी । तो केला पांडवीं ह्मणियागत ॥१॥भावाचा लंपट भक्तीच्या आधीन । न सोडी अभिमान अनाथांचा ॥२॥भाजीचेनि पानें तृप्त झाला हरी । जयाच्या उदरीं भुवनें चवदा ॥३॥जनक शुकदेव धरिय्ले करीं । दोघांचिया घरीं घेतो पूजा ॥४॥पुंडलीकें दिली बैसावया विट । तेथें भुवैकुंठ वसतें केलें ॥५॥तुका म्हणे शरण रिघतां एक्या भावें । कैवल्य भोगावें नाममात्रें ॥७॥॥८४२७॥एका तरुच्या शाखा चार । पृथक ह्मणूं नये सत्वर ॥जें मोक्षाचें निज घर । पवित्र सार सकळांचें ॥१॥होतें सांबाचिया पोटीं । तें निज बीज केली वृष्टि ॥त्रिजग तारावया सृष्टि । कृपा धुर्जटी वर्षाव ॥२॥ॐ नमो भगवते वासुदेवाय । हें निजबीज चैतन्या देय ॥जप करोनियां तोयें । भगवंतें सोय लाविली ॥३॥अहं तत्व सोहं श्रीरामरामाय । हे तंव नाथालागीं देय ॥मत्सेंद्रा लाविली सोय । जप तो हे करीतसे ॥४॥दत्त दत्तात्रय निरंजनो दत्त । हे तंव कांतालागीं देत ॥जप करी जालींद्रकांत । उपदेशित कानीफा ॥५॥श्रीराम जयराम जय जय राम । नंदा उपदेशिला सप्रेम ॥निज बीज अंतरीचें ब्रह्म । नाशियले श्रम विषदोषा ॥६॥ऐसे पुत्र हे चार । निज बीज सांबाचें तें सार ॥भिन्न भाविक जे काम नर । गाढव खर जाणावे ॥७॥आतां येऊं कोण्या रागें । उपटला ओघ फिरेना मागें ॥आलों परोपकारा लागें । घडला संग सद्गुरुचा ॥८॥चाळीस अक्षरांची टीका । बयाजवा रंगें ऐका ॥स्मरण करितांना मुखा । येरे सखा जिवलग ॥९॥काशीक्षेत्र वाराणशी स्थान । दत्त निरंजन साहेबराम ॥गंगा तुलसी शालिग्राम । आणिक जिव्हा न करी काम ॥१०॥ही चाळीस ते अठेचाळीस । अठयायशींचा ब्रह्मरस ॥अठयायशीं सहस्त्र ऋशी करिती घोष । पापदोष जाळिती ॥११॥याजमध्यें आहे सार । येणेंचि तिन्ही लोक पार ॥यज्ञ होमाचें जें सार । निर्विकार नि:संग ॥१२॥सहा दर्शनीं प्रबंध । नव सोळा सिद्ध ॥ चराचर खाणी वाणी जंगम । स्थावर स्थितिवेद गोविंद ॥१३॥ऐसा सद्गुरुचा महिमा । काय वर्णवे त्याचा महिमा ॥तुका ह्मणे जपतां नेमा । हरील श्रमा जन्मदु:ख ॥१५॥॥८४२८॥संकल्प ही सेवा पूर्ण झाली देवा । निरोप मज द्यावा केशवराज ॥१॥कोणी केला लेख ह्मणाल गणीत । गजवदनीं मात जागविली ॥२॥पांच देहीं पोटीं एकतीस लक्ष । बाकी एकतीस साक्ष पहिलेचि ॥३॥सात कोटी अभंग येथें झाले जाण । मौन्यें लिहिले गणपतीने ॥४॥साडे सहा कोटी लंबोदराची लेंखणी । साताचे पूर्णपणीं मनु आले ॥५॥एकुणहत्तर लक्ष एक कोटी आगळा । अभंग वरती सोला अधिक झाले ॥६॥सोळाचा तो झाडा सांगतों निवाडा । ब्रह्मरस कोडा आइकावा ॥७॥आलोंसे परतोन कान्होबाचे भेटी । अभंग टाळापाठीं तीन केले ॥८॥गंगाबाई कुमारी लेंकरुं अज्ञान । दोन अभंगांनीं समाधान केलें तिचें ॥९॥भागिरथीतटीं विमान उतरत । अभंग केले सात क्रिया क्रमा ॥१०॥झालें गयावर्जन फिटलें पितृॠण । केलें समाधान सकळांचें ॥११॥चारही अभंग तेलिया मुठमाती । देऊन आह्मी रात्रीं गेलों तेव्हां ॥१२॥तुका ह्मणे ऐसे अभंग हे सोळा । सत्रावी जीवनकळा सत्रावा हा ॥१३॥॥८४२९॥मज नाहीं मोह माया । नाहीं काया नाहीं देहा ॥लक्ष सद्गुरुच्या पायां । जातों ठाया अजिरावर ॥१॥सारें साधन आपलें साधा । पांचां दिवसांचा वायदा ॥परतून भेटी नोहे कदा । जातों पदा आपुलिया ॥२॥नाहीं वृत्तीचा हा गांव । नाहीं समाधीस ठाव ॥अवघा माझा पंढरीराव । भरला डोह गंगेचा ॥३॥मनानें कांहो केली जलदी । मागें सांगितली नाहीं कधीं ॥रात्रीं कळली ही शुद्धि । ह्मणून बुद्धि पालटली ॥४॥पर्वकाळ एकादशी निर्धारी । कीर्तन होतें महाद्वारीं ॥आली योगीराजाची फेरी । नवलपरी सांगूं पाहे ॥५॥काय बोलूं आतां बोली । कीर्तनीं कांता आवली आली ॥ब्रह्मरुप होऊन गेली । चढली मोली कौसल्ये ॥६॥॥८४३०॥मेळ गडियांचा नारायणें केला । डाव तो मांडिला चेंडुफळी ॥१॥बळीरामयुक्त ह्मणती श्रीहरी । डाव तुजवरी आला बापा ॥२॥माग चेंडु तेणें पायीं लाथाळीला । जाऊनी गुंतला कळंबावरी ॥३॥तुका ह्मणे देव धांवोनियां जाय । अवघडा पाहे ठाव तेथें ॥४॥ N/A References : N/A Last Updated : August 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP