मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|पुरवणी अभंग| ८३७१ ते ८३८० पुरवणी अभंग ८२९१ ते ८३०० ८३०१ ते ८३१० ८३११ ते ८३२० ८३२१ ते ८३३० ८३३१ ते ८३४० ८३४१ ते ८३५० ८३५१ ते ८३६० ८३६१ ते ८३७० ८३७१ ते ८३८० ८३८१ ते ८३९० ८३९१ ते ८४०० ८४०१ ते ८४१० ८४११ ते ८४२० ८४२१ ते ८४३० ८४३१ ते ८४४१ अभंग - ८३७१ ते ८३८० तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत अभंग - ८३७१ ते ८३८० Translation - भाषांतर ॥८३७१॥नाभिस्थानचक्रीं विष्णुचा तो वास । मातृका तयास पूर्ण दहा ॥१॥लक्षुमीसहित मेघवर्ण ध्यान । वैकुंठभुवन तेंचि जाणा ॥२॥अशा ह्या युक्तीनें पहावें देवासी । तरीच दृष्टीसीं येईल तो ॥३॥लक्षातीत चार होतां हस्तगत । तुका ह्मणे मात काय सांगूं ॥४॥॥८३७२॥हृदयस्थानचक्रीं सांबाची ही वस्ती । सर्वकाळ करिती तेथें वास ॥१॥बारा मातृकेचा धणी तो समर्थ । पुरवी मनोरथ सकळांचे ॥२॥पार्वतीसहित श्वेत वर्ण ज्याचा । स्वामी कैलासींचा भोळानाथ ॥३॥तुका ह्मणे त्याचें देणें रावणासी । दातृत्व कोणासी येईना तें ॥४॥॥८३७३॥षोडशदळचक्रा जीव आत्मा राहतो । कौतुक पाहतो सकळांचें ॥१॥सोळा मातृकेचा आकार तयासी । स्मरतो शिवासी सर्वकाळ ॥२॥चैतन्याचा खेळ तयाचे स्वाधीन । ओघ तो तेथून सत्रावीचा ॥३॥इडा पिंगळेचा त्रिवेणीसंगम । तुका ह्मणे नेम गुरुघरिंचा ॥४॥॥८३७४॥भ्रुकुटीचक्रामाजी राहतो परमात्मा । साक्षभूत आत्मा आहे त्यासी ॥१॥दोन मातृकेची अनुहात ध्वनी । श्रवण ते ज्ञानी करिताती ॥२॥योगियाचा योग सिद्धीचा हा खेळ । सांगतों निर्मळ सर्वत्रांसी ॥३॥तुका ह्मणे माझी असे शूद्र वाणी । नका ह्मणूं कोणी खोटें यासी ॥४॥॥८३७५॥सहस्त्रदळचक्रीं राहतो श्रीगुरु । तुर्येच्या तें वरु तेंचि स्थळ ॥१॥दोन मातृकेचा लागेना तो पार । गुरुपद थोर सर्वाहूनि ॥२॥गुरुविणें प्राणी नसे त्याला गति । जातां आधोगति अध:पाता ॥३॥तुका ह्मणे मुख्य गुरु चतुष्टयीं । चिंतन हरिपायीं असों द्यावें ॥४॥॥८३७६॥एकवीस सहस्त्र आणीक सहाशें । जप होत असे निरंतर ॥१॥साक्षेपें करावें ह्मणजे त्यांचे फळ । अजपाचें मूळ ऐसें जाणा ॥२॥सत्य तेंचि सार पहावें सर्व भूतीं । हरिपायीं भक्ति असों द्यावी ॥३॥तुका म्हणे ज्याचा भावार्थ निर्मळ । त्याला त्याचें फळ प्राप्त असे ॥४॥॥८३७७॥तत्वांलागी तत्वें ग्रासकचि झालीं । ह्मणती गेलीं मेलीं तयांलागीं ॥१॥पांच आणि पंचवीस व्यालीं एक गोळ । सहज मोडी चाल आपणचि ॥२॥मायीक तुतुकीं निघोनियां गेलीं । गेलीं परी ठेलीं जैशीं तैशीं ॥३॥येणें जाणें नाहीं आत्मा अविनाश । सहजचि असे व्यापकत्वें ॥४॥जन्ममरणाचा जेथें ठाव नाहीं । तुका तया ठायीं लीन झाला ॥५॥॥८३७८॥ब्रह्म तें पाहिलें आनंदें देखिलें । अद्वय कोंदलें दृष्टिमाजि ॥१॥दृष्टिमाजि भरलें सर्व कोंदाटलें । न जाय लोटिलें दोहीं हातें ॥२॥दोहीं हातें यासी गेलों धरायासी । तंव तें अंगासी आदळलें ॥३॥आदळलें अंगीं सव्य वाम भागीं । आणि अंतरंगीं मायेपुढें ॥४॥मायेपुढें ब्रह्म अरुप अनाम । पाहतां सुगम गुरुकृपा ॥५॥गुरुकृपा ब्रह्म पाहतां निरंजनीं । वस्तुचि भरुनी राहिलासे ॥६॥राहिलासे धांव खुंटलीसे धांव । झाला स्वयमेव तुका ह्मणे ॥७॥ ॥८३७९॥विज माथां चमकली । नेत्र बाहुली हांसली ॥१॥ओघ वाहे सत्रावीचा । हिरा स्थापीला देहींचा ॥२॥सप्त पाताळा खालुता । एकविस स्वर्गाचे वरुता ॥३॥तेथें दीप उजळला । तुका ज्योतीसी मिळाला ॥४॥॥८३८०॥प्रणववाचक श्वासोश्वास । तोचि तारक उपदेश ॥१॥परि हे गुरुकृपेचें देणें । विरळा भाग्यवंत जाणे ॥२॥तार घोर आणि मंद । जाणे तीनी स्वर भेद ॥३॥अनुहाताचिया ध्वनी । जाणे नवनादाच्या खुणीं ॥४॥औट श्रीहाट गोल्हाट । भ्रमर गुंफेचें कचाट ॥५॥सोडोनियां पुढें गेला । तुका ह्मणे योगी त्याला ॥६॥ N/A References : N/A Last Updated : August 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP