संशयरत्नमाला - श्लोक १७ ते २०

मोरोपन्त (मोरेश्वर रामजी पराडकर, १७२९–१७९४) यांच्या संशयरत्नमाला काव्याचा मुकुन्द गणेश मिरजकर यांनी संस्कृतानुवाद केला.


अथवा स्वस्थचि अससी
की घेतो नाम रक्षणी शूर ।
हे सत्य परि प्रबळहि
बळ दुर्बळ जरि रणीं धणी दूर ॥१७॥
की भीतो भ्रांत वृथा
मृगजलामग्नासि काय तारावे ।
म्हणतां असे कसे शिशु-
भय जाया बागुलासि मारावे ॥१८॥
की काही व्रतनियमी
बोलो चालों नये असे झाले ।
तरि दीनरक्षणाहूनि
अधिकफ़ल व्रत कधी मना आले ॥१९॥
की न श्रवणी गेली
ही माझी हाक हा कसा तर्क ।
कशि गुरुजनी सतीची
शिवला ज्या कुमुदिनीस असदर्क ॥२०॥


दुरितप्रशेम जपत्ययं
पटु नामेति सुखं स्थितोऽसि वा ।
प्रबलं बलमप्यहो परं
न रणे स्थास्यति नास्ति चेन्नृप: ॥१७॥
भयमस्य वृथा , समुध्दरेद्
विनिमग्नं नु मरीचिकासु क: ।
इति चेच्छिशुभीतिवारणे
कृतकं कूर्चधरं प्रताडयेत ॥१८॥
नियमव्रतदीक्षयाऽथवा
गमनं चाऽलपनं निषिध्यते ।
अधिकं वद दीनरक्षणाद्
व्रतमासीत्तव संमतं कदा ॥१९॥
करुणस्वन एष मामक:
श्रुतिमापन्न तवेति चेत्कथम् ।
अशृणो: खलधर्षिता सति
ह्रदि यत्वां सदयं समाह्रयत् ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP