संशयरत्नमाला - श्लोक ५ ते ८

मोरोपन्त (मोरेश्वर रामजी पराडकर, १७२९–१७९४) यांच्या संशयरत्नमाला काव्याचा मुकुन्द गणेश मिरजकर यांनी संस्कृतानुवाद केला.


अथवा येतां झाला
तन्मय शिवतांडवांत कैलासी ।
केला असेल गरुडें
गर्व पुन्हा काय त्याच बैलासी ॥५॥
बहुधा बळिचे ब्दार
क्षणभरही सोडितां न ये देवा ।
न चुकावी छलपाप-
प्रायश्चित्तार्थ साधुची सेवा ॥६॥
प्राय: सुमुहूर्ताचा
शोध करायासि लागला वेळ ।
होय महत्कार्य परि
प्रभुचा तो नित्य सहज हा खेळ ॥७॥
की मी भागवतांचा
भाग असे आणिलें मनीं स्वामी ।
हे सत्यचि परि कैचा
हा भेद प्रभुवरा तुझ्या धामी ॥८॥


अथवा‍ऽऽगमनोत्सुकोऽपि किं
शिवशैले निरतोऽसि ताण्डवे ।
गरुडेन मदेन कोपित:
किमु भूय: स च नन्दिकेश्वर: ॥५॥
न निमेषमपि स्वतन्त्रता
भवतो व्दारि बलेर्नु तिष्ठत: ।
छ्लनिष्कृतये महात्मनां
परिचर्याविरतिर्न ते भवेत ॥६॥
बहुधा भवता विलम्बितं
शुभकालस्य खलु प्रतिक्षणे ।
मम कार्यमिदं महत्परं
तव नित्यं सुकरं विनोदनम् ॥७॥
अथवा मनुषे जगत्पते
सुतरां भक्तवशोऽस्मि केवलम् ।
अयि सत्यमिदं परं कथं
ह्र्दये स्यात्तव भेद ईदृश: ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP