चैत्र वद्य १२

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


कविवर्य रवींद्रांचा जन्म !

शके १७८३ च्या चैत्र व. १२ रोजीं आशियाचे कविसम्रा‍ट्‍ डाँ. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला.
वास्तविक पाहतां टागोरांचें घराणें श्रेष्ठ, विद्यासंपन्न आणि कुलीन असेंच असलें तरी तत्कालीन सनातनी लोक त्याला हलक्या जातींतील समजत असत. या घराण्यांतील पूर्वजांनीं इस्लामी कारकीर्दीत प्रधानकी बजाविली असल्यामुळें टागोरांना ‘पिरली’ असेंहि नांव प्राप्त झालें होतें. सनातनी लोकांकडून बहिष्कृत झालेलें हें घराणें मूळचें बानर्जी म्हणून प्रसिध्द होतें. रवींद्रनाथांच्या आजोबांचें नांव व्दारकानाथ टागोर. यांचे पुत्र म्हणजे प्रसिध्द महर्षि देवेंद्रनाथ टागोर. त्यांचें चारित्र्य मोठें उदात्त व उज्ज्वल असून त्यांची तपस्या श्रेष्ठ प्रकारची होती. राममोहन राँय यांनीं स्थापन केलेल्या ब्राह्मसमाजाचें वर्धन देवेन्द्रांनींच केलें. राममोहन राँय यांनीं स्थापन केलेल्या ब्राह्मसमाजाचें वर्धन देवेन्द्रांनींच केलें. त्यांच्या घरांत लक्ष्मी - सरस्वती एकत्रित नांदत होत्या. याच संपन्न घराण्यांत चैत्र व. १२ या दिवशीं रवींद्रबाबूंचा जन्म झाला. रवींद्रांचे थोरले बंधु व्दिजेंद्र नाथ हे तत्त्वज्ञानी म्हणून प्रसिध्द होते. दुसरे बंधु ज्योतिरिंद्र हे उत्कृष्ट चित्रकार होते. तिसरा भाऊ ‘सिव्हिल सर्व्हिस’ ची परीक्षा उत्तीर्ण झालेला पहिला ‘हिंदी गृहस्थ’ होता. याप्रमाणें टागोरांचें कुटुंब विद्या, शास्त्र, कला यांचें माहेरघरच होतें. रवींद्रांच्या जन्मानंतर थोडयाच दिवसांत त्यांच्या आईचा मृत्यु झाला. वडिलांचेंहि फारसें लक्ष रवींद्रांवर नसल्यानें त्यांचें पालनपोषण नोकर माणसांकडूनच झालें. त्यांच्या वडिलांना प्रवासाचा फार नाद होता; अनेक वेळीं रवींद्रांनीं त्यांच्याबरोबर प्रवास करुन सृष्टिसौंदर्याची माधुरी चाखली होती. वयाच्या पंधराव्या वर्षापासून रवींद्रनाथ गद्य व पद्य लिहूं लागले होते. विसाव्या वर्षी यांना एक गूढ असा साक्षात्कार झाला. “एका सकाळीं उगवत्या सूर्याकडे पाहत असतांना माझ्या डोळयांवरुन एक आच्छादन दूर झालें. एकावर एक येणार्‍य़ा प्रकाशकिरणांच्या लाटांनीं जग भरुन गेलें. त्यामुळें माझ्या मनातील उद्‍ विग्रता व निराशा यांचा नाश झाला, आणि मला जग पूर्ववत्‍ दिसूं लागलें” अशी त्यांची साक्ष आहे.
- ६ मे १८६१
-------------

चैत्र व. १२
मोतिलाल नेहरुंचा जन्म !

शके १७८३ च्या चैत्र व. १२ रोजीं भारतांतील प्रसिध्द राज्यघटनाशास्त्रज्ञ, कायदेपंडित,इ राजकारणी मुत्सद्दी, व वादविवादपटु पंडित मोतिलाल नेहरु यांचा जन्म झाला.
पंडितजींचें मूळचें घराणें काश्मीरकडील, परंतु अनेक पिढयांपासून त्यांचें वास्तव्य अलाहाबादेस झालें होतें. मोतिलाल नेहरुंनीं वकिली सुरूम केल्यावर त्यांची प्रसिध्दि सर्वत्र झाली. थोडयाच अवधींत महात्मा गांधींच्या राजकारणानें यांना आकर्षित केलें, व त्यानंतर त्यांच्या राजकारणाला चढाईचें रुप येऊन अमृतसर येथील राष्ट्रीय सभेचे ते अध्यक्षहि झाले. पुढें असहकारितेच्या चळवळींत सबंध घराणेंच सामील झालें. त्यांनीं स्वराज्य पक्ष काढून कायदेमंडळाकडे तोंड फिरविलें, आणि अन्तर्गत अडवणुकीचें धोरण स्वीकारलें. दिल्लीच्या मध्यवर्ती कायदेमंडळांत गेल्यानंतर त्यांच्या बुध्दिमत्तेला व ज्ञानाला योग्य तें स्थान प्राप्त झालें आणि आपल्या वादविवादकौशल्यानें सरकारला यांनीं अगदीं जेरीस आणलें. “यांनीं पायांनीं घातलेली गांठ सरकारला हातानेंहि उकलूं नये” अशी स्थिति निर्माण झाली.
“पंडित मोतिलाल नेहरु यांच्यांत एक प्रकारचें व्यक्तिमत्त्व व राजबिंडेपणा होता. जातील तेथें ते भव्य व प्रमुख व्यक्ति बनत. सौम्यता व पडतें घेणें हें त्यांच्या स्वभावांतच नव्हतें. म्यूझियममध्यें दिसून येणार्‍या रोमन बादशहाच्या पुतळयाप्रमाणें यांच्या चेहर्‍यावर एक प्रकारचा बादशाही करारीपणा दिसे.”
कायद्याच्या चौकटींत बसून मोतिलाल वादविवाद करुं लागले म्हणजे त्यांच्या वक्तृत्वाला विशेष जोर चढे. विनोद, वक्रोक्ति, कल्पना, विचार, स्वाभिमान, देशप्रेम व हजरजबाबीपणा, या गुनसमुच्चयानें त्यांचें वक्तृत्व विशेष परिणामकारक वठत असे. गांधी आणि मोतिलाल यांच्यांत मूलत: मतभेद असूनहि परस्परांचा एकमेकांवर पूर्ण विश्वास होता. स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य प्रधान जवाहरलाल नेहरु हे यांचेच पुत्र.
- ६ मे १८६१

N/A

References : N/A
Last Updated : September 08, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP