अध्याय तिसरा - श्लोक ७१ ते ८०

कपिल ऋषी प्राचीन भारतातील एक प्रभावशाली मुनि होऊन गेले. यांना सांख्यशास्त्र विषयातील आध्य प्रवर्तक मानतात.

अस्य मंत्रस्य देवेशि नैव न्यास: षडंगक: ॥
नैव ध्यानं भूतशुद्धिर्न च प्राणप्रतिष्ठिति: ॥७१॥
हे देवेशि, ह्या मंत्राच्या जपारंभापूर्वी षडंगन्यास ध्यान धारणा, भूतशुद्धि, प्राणप्रतिष्ठा, वगैरे कशाचीही जरुर लागत नाही ॥७१॥
कवचं च न च स्तोत्रं न च दिग्बंधनादिकं ॥
सिद्धसाध्यसुसिद्धारिघटितार्थं न किंचन ॥७२॥
कवच, स्तोत्र, दिग्बंधन, सिद्ध, साध्य, सुसिद्ध, अरिघटितार्थ वगैरे करण्याचे काही कारण नाही ॥७२॥
न यंत्रपूजनं चैव पद्धत्या पटलादिकं ॥
सहस्त्रनामजप्यादि स्तवराजादिकं न च ॥७३॥
एद्धतीशीर यंत्रपूजा, पटल, सहस्त्रनाम, स्तवराज ही सुद्धा नकोत ॥७३॥
न होमो न क्रिया यस्य धनर्णादि तथान हि ॥
तस्माद्‍घटितार्थमवमुक्तत्वं सर्वदा प्रिये ॥७४॥
होमहवन, क्रिया, धनऋण वगैरे कांही नाही. म्हणून प्रिये ह्या मंत्रपठनानें सर्व मुक्त होतात ॥७४॥
अत:परं निरुपणं नास्ति कदाचन ॥
संपूर्णो हि प्रिये राम आत्मरामो हि मे ह्यदि ॥७५॥
प्रिये, आतां या बाबतीत निरुपण करण्याचे काहींच राहिले नाही, खरोखरच कांही शिल्लक राहिले नाही. संपूर्ण
आत्माराम माझ्या ह्यदयांत स्थित आहे ॥ ७५ ॥
पंचाक्षरं जपेत्पूर्वं मध्ये रामपद्‍ं जीवरुपिणे ॥
अंते पंचाक्षरं जप्त्वा शिवेन समतां व्रजेत्‍ ॥७६॥
प्रथम ‘हंस: सोऽहं’ पंचाक्षरी मंत्र उच्चारून मध्ये रामपदाचे, श्रीराम’ स्मरण करावे आणि शेवटी ‘रामायणम: ’ ही पाचे अक्षरे उच्चारावी, म्हणजे करणारा शिवाच्या समतेला प्राप्त होतो ॥७६॥
तत्पदं शिवरुपाय त्वंपदं जीवरुपिणे ॥
असीत्येवत्तु रामाय त्रयस्यैक्यं न संशय: ॥७७॥
’तत्पद्‍’ शिवरुप असून ’त्वंपद’ जीवरूप आहे आणि ‘असि’ हे पद रामसंज्ञक असल्यामुळे या तिन्ही पदांचा ऐक्य असा अर्थ होतो
यांत संशय नाही ॥७७॥
एकेऽपि हेमकर्तारो जीर्ण्काय पुनर्नवं ॥
ऋद्धिं सिद्धिं प्रदावारौ ब्रम्हज्ञान न विशेषत: ॥७८॥
कित्येक किमया करतात,कित्येक नवे देह संपादन करतात, कित्येक ऋद्धिसिद्धि प्राप्त करुन घेतात पण प्राय: कोणी
ब्रम्हज्ञ होत नाही ॥७८॥
दिव्यौषधीरसरसायणधातुवादे ॥
होरावशकिरणगारुडधन्यवादे ॥
ताले च खड्गगुटिकाजलमंत्रवादे ॥
सिंध्यंति ते हरिशिवौ च च यदि प्रशतौ ॥७९॥
कोणी दिव्य औषधी मिळवितात, कोणी रसायनधातुवाद शिकतात, कोणी होरा, वशीकरण, गारुड, ताल, खड्ग,गुटिका,
जलमंत्रवाद वगैरे हरिहरांच्या प्रसन्नतेने प्राप्त करुन घेतात ॥७९॥
कलाचतुष्टये युक्तं शिवं साक्षान्न संशय: ॥
ज्ञात्वा गुरुमुखाढ्‍ब्रम्ह ब्रम्हैवाऽहं न संशय: ॥८०॥
परंतु आत्मतत्वाकडे कोणाची प्रवृत्ति होत नाही. म्हणून गुरुमुखाने या मंत्राची दीक्षा घेऊन मीच ब्रम्ह आहे यांत संशय
नाही असा निश्चय करावा ॥८०॥
येथे कपिलगीतेचा तिसरा अध्याय समाप्त झाला.

N/A

References : N/A
Last Updated : December 31, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP