मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कपिल गीता| श्लोक २१ ते ३० कपिल गीता श्लोक १ ते १० श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ६० श्लोक ६१ ते ७० श्लोक ७१ ते ८० श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ६० श्लोक ६१ ते ६६ श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० अध्याय चवथा - श्लोक २१ ते ३० कपिल ऋषी प्राचीन भारतातील एक प्रभावशाली मुनि होऊन गेले. यांना सांख्यशास्त्र विषयातील आध्य प्रवर्तक मानतात. Tags : gitakapilकपिलगीता अध्याय चवथा - श्लोक २१ ते ३० Translation - भाषांतर शाश्वतानन्दत्त्वं पूर्णरुपस्वरुपकं ॥तुष्टत्वं चाचलत्वं च षडैश्चर्यादि प्राप्यते ॥२१॥अढळ आनंद, शाश्चत शांति, अखंड सत्ता, पूर्ण आत्मस्वरूप, तुष्टि व अचलत्व ही षडैश्वर्य प्राप्ति साधकाला ज्ञानाच्याचयोगाने प्राप्त होते ॥२१॥ऋषिसिद्ध उवाच ।जलस्नानाब्दहि:शुद्धिरंत:शुद्धि: कथं भवेत् ॥योगिनां च कुत: स्नानं कृपालो कपिलोच्यताम् ॥२२॥ऋषिसिद्ध म्हणतात:- हे कृपाळु कपिल मुने, जलस्नानाने शरीराची बाह्य शुद्धि होते परंतु अंत:शुद्धि कशी होईल ? योग्यांना स्नान कसे घडते ते सांगा ॥२२॥वामनासापुटे हीडा पुटे दक्षे च पिंगला ॥गांधारी वामकर्णे च हस्तिनी दक्षिणे तथा ॥२३॥कपिल म्हणतात:- डाव्या नाकपुडित ईडा, उजवीत पिंगला, डाव्या कानांत गांधारी, उजव्यांत हस्तिनी ॥२३॥सुषुम्ना चांगदा प्रोक्ता जिव्हाग्रे च सरस्वती ॥वामनेत्रे चक्षुषा तु दक्षिणेऽलंबुषा मता ॥२४॥अंगदा सुषुम्नलाच म्हणतात, जिव्हाग्रावर सरस्वती, डाव्या डोळ्यांत चक्षुषा व उजव्यांत अलंबुषा अशी ही नाड्यांची स्थाने आहेत ॥२४॥कुडूर्गुदस्था संप्रोक्ता शंखिनी लिंगसस्थिता ॥मूत्रद्वारे वारूणी स्यात् सर्वांगे च पयस्विनी ॥२५॥गुदांत कुडु, लिंगात शंखिनी, मूत्रद्वारात वारुणी आणि सर्व देहांत पयस्विनी याप्रमाणे नाड्यांची स्थाने आहेत ॥२५॥नाड्यो द्वादश संप्रोक्ता शरीरे सुव्ययस्थिता: ॥व्यापोनुवंति दशद्वारं चराचरनियामक: ॥२६॥ह्या वर सांगितलेल्या बारा नाड्या शरीरात फिरत असतात आणि चाराचरांचे नियम करितात ॥२६॥इडा भागीरथी गंगा पिंगला यमुना नदी ॥सुषुम्ना गंडकी प्रोक्ता कृष्णवेण्यौ सरस्वती ॥२७॥इडा ही भागीरथी गंगा, पिंगला ही यमुना, सुषुम्ना ही गंडकी आणि कृष्णवेणी ही सरस्वती असे म्हटले आहे ॥२७॥ कुहूश्च नर्मदा ज्ञेया तापी स्याच्छंखिनी तथा ॥गांधारी चापि कावेरी वारुणी गौतमी तथा ॥२८॥कुहु हीच नर्मदा, शंखीनी हीच तापी,गांधारी हीच कावेरी, वारूणी हीच गौतमी ॥२८॥ताम्रपर्णी सुबानाडी सिंधुर्ज्ञेया च हस्तिनी ॥गोमत्यतंबुषा चैव पूर्णा पूर्णपयस्विनी ॥२९॥चक्षुषा हीच तम्रपर्णी, सिंधु हीच हस्तीनी आणि पूर्णपयस्विनी हीच गोमत्यलंबुषा जाणावी ॥२९॥इति नाडी नदी प्रोक्ता शरीरे वर्तते सदा ॥पवनं च तुरीयं च सर्वत: स्नानमुच्यते ॥३०॥एणें प्रमाणे नाड्यांच्या ठिकाणी नद्यांची कल्पना करावी आणि त्या नद्या आपल्या शरीरांत आहेत असे समजावे. योगमार्गाने जाऊ लागले असतां आत्म्याचे तुर्य-साक्षिस्वरूप होते आणि सर्व तीर्थांचे स्नान घडते ॥३०॥ N/A References : N/A Last Updated : January 01, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP