मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कपिल गीता| श्लोक ६१ ते ६६ कपिल गीता श्लोक १ ते १० श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ६० श्लोक ६१ ते ७० श्लोक ७१ ते ८० श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ६० श्लोक ६१ ते ६६ श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० अध्याय चवथा - श्लोक ६१ ते ६६ कपिल ऋषी प्राचीन भारतातील एक प्रभावशाली मुनि होऊन गेले. यांना सांख्यशास्त्र विषयातील आध्य प्रवर्तक मानतात. Tags : gitakapilकपिलगीता अध्याय चवथा - श्लोक ६१ ते ६६ Translation - भाषांतर ॐकारं पितृरुपेण गायत्रीं मातरं तथा ॥पितरौ यो न जानाति स विप्रश्चान्यवीर्यज: ॥६१॥ॐकार पितृरुप असून गायत्री मातृरुप आहे. या मातापितरांस जो ओळखित नाहे तो ब्राम्हण कुसंभव होय ॥६१॥इदं तीर्थमिदं तीर्थ भ्रमंति तामसा जना: ॥आत्मतीर्थं न जानंति कथं मोक्ष: शृणु प्रभो ॥६२॥हे तीर्थ ते तीर्थ असे म्हणत तामसी लोक इतस्तत: भ्रमण करीत असतात; परंतु ते आत्मतीर्थाला ओळखीत नसल्यामुळे त्यांनामोक्ष कसा मिळणार ? ॥६२॥ज्ञानं भागीरथी गंगा तत्र विश्राम्यतां मन: ॥प्रात:प्रभृति संध्यातं संध्यात: प्रातरंतरं ॥६३॥ज्ञान हीच भागीरथी गंगा असल्यामुळे त्यांतच प्रात:कालापासून सायंकालपर्यंत आणि सायंकालापासून प्रात:कालपर्य़ंत साधाकाने आपले मन स्थिर करावे ॥६३॥यत्करोमि जगन्नाथ तदस्तु मम पूजनं ॥६४॥हे जगन्नाथा, मी जे कांही करतो ते सर्व आत्मरुप माझेच पूजन असो ॥६४॥मनश्चित्ततुरंगाभ्यां शरीरं स्पंदनायते ॥कालचक्रेण वै याति पूर्वकर्म च सारथि: ॥६५॥मन आणि चित्त या दोन घोड्यांनी युक्त असलेले शरीर रथरूप पावते ते कालरुपी चक्रांनी चालते. त्याला त्याचे पूर्व कर्मरुप सारथी चालवितो ॥६५॥यद्दिने पतितो बिंदुर्मातृगर्भे सुनिश्चितं ॥तद्दिने लिखितें सर्वं हानिमृत्युमुखोत्तरं ॥६६॥ज्या दिवशी मातृगर्भात रेतबिंदुची स्थापना होते त्याच दिवशी त्या जन्म घेणार्या प्राण्याच्या - हानी, मृत्यु, सुखादिकांचे सर्व लिखित तयार होते ॥६६॥येथे कपिल गीतेचा राजराजेश्वरयोग नांवाचा चवथा अध्याय समाप्त झाला. N/A References : N/A Last Updated : January 01, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP