मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कपिल गीता| श्लोक १ ते १० कपिल गीता श्लोक १ ते १० श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ६० श्लोक ६१ ते ७० श्लोक ७१ ते ८० श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ६० श्लोक ६१ ते ६६ श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० अध्याय तिसरा - श्लोक १ ते १० कपिल ऋषी प्राचीन भारतातील एक प्रभावशाली मुनि होऊन गेले. यांना सांख्यशास्त्र विषयातील आध्य प्रवर्तक मानतात. Tags : gitakapilकपिलगीता अध्याय तिसरा - श्लोक १ ते १० Translation - भाषांतर पार्वत्युवाच ।मृत्यूकाले जगन्नाथ काशीपुर्यां हि प्राणिनाम् ॥उपदेश: कथं तेषां तन्मे ब्रूहि महेश्वर ॥१॥पार्वती म्हणते :- काशीपुरीत मृत्युसमयी हे जगन्नाथा तू प्राण्यांना उपदेश करितोस, पण त्यामुळे ते मुक्त कसे होतात ? ॥१॥ ईश्वर उवाच ।ॐकारं बिंदुसंयुक्त नित्यं ध्यायन्ति योगिन: ॥अस्मिन्मध्ये स्थितं तत्वं गुरवो दर्शयन्ति तत् ॥२॥ईश्वर म्हणतात:- ज्या बिंदुयुक्त ॐकाराचे ध्यान योगीजन सदोदित करतात त्यांतच ते तत्व राहिलेले आहे. त्याचे दर्शन गुरु करवितात ॥२॥ओमित्येव परं ब्रम्ह सर्व तत्वानुग्राहकम् ॥आब्रम्हस्तत्रपर्यंन्तं सर्वानुग्रहकारणम् ॥३॥ॐ हेंच परब्रम्ह आहे. तेच सर्व तत्वांवर अनुग्रह करणारें आहे. तेंच आब्रम्हस्तंबपर्यंत जेवढ्या म्हणून वस्तुआहेत त्या सर्वांवर अनुग्रह करतें ॥३॥प्रथमं तारकं ब्रम्ह द्वितीयं दण्डब्रमकम् ॥तृतीयं कुण्डलं ब्रम्ह चतुर्थं ब्रम्ह चन्द्रकम् ॥४॥पहिले ब्रम्हतारक, दुसरे दंडब्रम्ह, तिसरे कुंडलब्रम्ह आणि चवथे चंद्रकब्रम्ह होय ॥४॥पंचमं बिंदुब्रम्हाथ प्रणवे ब्रम्ह पंचकम् ॥वेदगर्भसमुद्धुतं तदेव यन्निरंजनम् ॥५॥पांचही बिंदुब्रम्ह ही पाच तत्वे प्रणवात स्थिर असून जे निरंजन ब्रम्ह ते वेदगर्भापासून उत्पन्न झाले आहे ॥५॥तारकं च भवेब्रम्हा दण्डकं विष्णुरुच्यते ॥कुंडल्यं हि तथा रुद्रो अर्धचन्द्र: स ईश्वर: ॥ ६॥तारकब्रम्ह ब्रम्हा, दंडकब्रम्ह विष्णु, कुंडलब्रम्ह, रुद्र आणि अर्धचंद्रब्रम्ह ईश्वर होय ॥६॥बिंदु: सदाशिव: साक्षात् प्रणवे पंच देवता: ॥निरज्जनस्तदातीत उत्पत्तिस्थितिकारणम् ॥७॥ॐकारावरील बिंदु हा साक्षात् सदाशिव असून याप्रमाणे प्रणवांत देवपंचायतन आहे. सृष्टीची-उप्तत्ति स्थिती करणारा जो निरंजन परमात्मा तो या पांच देवतांहून व त्यांच्या अगदी निराळा व विलक्षण आहे ॥७॥ब्रम्हा त्रिकूटस्थानस्थो ह्यकाराक्षरसंज्ञित: ॥वाग्वैखरी ह्यवस्था तु जागृति: स्थूलदेहकम् ॥८॥ब्रम्हा त्रिकूटस्थ असून अकाराक्षर हे त्यांचे नाव आहे. त्याची वाणी वैखरी असून अवस्था जागृति आणि देह स्थूल आहे ॥८॥र्हस्वमात्रा हि ऋग्वेदो रजोगुण: प्रकिर्तित: ॥एवत्तारकं विज्ञेयं रक्तपंकजमध्यगम् ॥९॥त्याची र्हस्व मात्रा ऋग्वेद असून रजोगुण म्हणून वर्णन केलेले आहे. तारक ब्रम्ह (उदरस्थ) रक्तकमलाच्य मध्यभागी असते ॥९॥विष्णोस्तु श्रीहटस्थानमुकाराक्षरसंज्ञितम् ॥दीर्घमात्रा मध्यमा च लिंगदेहस्तथैव च ॥१०॥विष्णुंचे स्थान श्रीहट हें असून त्याची उकाराक्षर संज्ञा आहे. याची मात्रा दीर्घ असून वाणी मध्यमा व लिंगदेह आहे ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : December 31, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP