अध्याय पांचवा - श्लोक १ ते १०

कपिल ऋषी प्राचीन भारतातील एक प्रभावशाली मुनि होऊन गेले. यांना सांख्यशास्त्र विषयातील आध्य प्रवर्तक मानतात.

प्रणम्य दंडवद्भूमौ स्तुत्वा चारुचरित्रकं ॥
अर्चित्वा पादपद्मं च पुन: प्रश्नं करोति च ॥१॥
सूत म्हणतात: - शिष्याने साष्टांग नमस्कार घालून सुंदर चरित्राची स्तुति करुन आणि पादारविंदाची पूजा करून गुरुला पुन्हां
प्रश्न केला ॥१॥
चतुर्योगस्य व्याख्यानात्कष्टात्कष्टं भवेन्महत्‍ ॥
कदाचित्पाप्यते मृत्यू: पुनर्जन्म भवेत्ध्रुवं ॥२॥
चतुर्योगावर व्याख्यान झोडित बसल्यास बराच त्रास होईल इतकेंच नव्हे तर कदाचित्‍ मरणही येईल आणि तों आल्यास
निश्चयाने पुनर्जन्म घ्यावा लालेल ॥२॥
नानायोनिगत: पश्चात्प्राप्यते नरजन्म हि ॥
नरो नारायण: साक्षात्‍ कैवल्यं ब्रम्ह शाश्वतं ॥३॥
अनेक योनींतून भटकल्यावर नरजन्म प्राप्त होतो.
नर हा प्रत्यक्ष नारायण असून, नारायण म्हणजे पुरुषार्थ करणे हेंच साक्षात्‍ कैवल्य व ब्रम्ह आहे ॥३॥
राजराजेश्वरो योग: शिवेन महता पुरा ॥
लोकोपकारहेतोर्वे पार्वतीं प्रतिबोधित: ॥४॥
हा राजराजेश्वर योग पूर्वी महादेवांनी लोकोपकारहेतूस्तव पार्वतीला सांगितला होता ॥४॥
भगवद्घोधित: पार्थस्तथा चोद्धव आत्मना ॥
एवं त्वं शाधि मां दीनं नित्यानित्यविवेकत: ॥५॥
भगवंतांनी याचा उपदेश अर्जुन आणि उद्धव यांस जसा केला त्याचप्रमाणे आपणही मज दीनाला नित्यानित्याचा विवेकपूर्वक
उपदेश करा ॥५॥
तत्पदं त्वंपदमसीत्येतच्चोक्तं तृतीयकं ॥
विस्तरेण प्रबोद्धव्यं यथार्थं ढष्टिगोचर ॥६॥
तत्पद, त्वंपद आणि असिपद अशी जी तीन पदे आहेत त्यांचा अर्थ विस्ताराने दूरगोचर होईल असा जाणणे उचित आहे ॥७॥
तदा नश्यति संतापो जन्मकोटिसहस्त्रज: ॥
निमेषोन्मेषयोर्मध्ये जीवन्मुक्तो भविष्यति ॥७॥
कारण की, त्यामुळे कोट्यवधी जन्मांत झालेला संताप नाहीसा होतो आणि तो साधक निमिषमात्रांत जीवन्मुक्त होतो ॥७॥
कपिल उवाच ।
अयं प्रश्नो महाश्रेष्ठ: श्रेष्ठस्यास्योत्तरं महत्‍ ॥
नाधिकारविहीनस्य शिष्यस्योपदिशेत्कदा ॥८॥
कपिल म्हणतात:- हा प्रश्न अति श्रेष्ठ असून त्याचे उत्तरही श्रेष्ठतरच आहे. याचा उद्देश अधिकार विहीन अशा शिष्याला कधीच
करु नये ॥८॥
ऋषिसिद्ध उवाच ।
सर्वेषामपि लोकांना को वा ज्ञानाधिकारिण: ॥
वद तल्लक्षणं सर्वं तथा संशयनाशनं ॥९॥
ऋषिसिद्ध म्हणतात :- सर्व लोकांत ज्ञानांधिक कोण ? या माझ्या संशयग्रस्त प्रश्नाचा उत्तम उलगडा होईल असे याचे वर्णन
लक्षण सांगा ॥९॥
कपिल उवाच ।
गुरुभक्तिरितो नित्यं सत्यवादी जितेंद्रिय: ॥
विप्रश्च वेदवक्ता च शास्त्रषटकस्य पारग: ॥१०॥
कपिल म्हणतात:- नित्य गुरुभक्तिमध्ये रत, सत्यवादी, जितेंद्रिय, वेदवक्ता, षट‍शास्त्रांत पारंगत. ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 01, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP