अध्याय तिसरा - श्लोक २१ ते ३०

कपिल ऋषी प्राचीन भारतातील एक प्रभावशाली मुनि होऊन गेले. यांना सांख्यशास्त्र विषयातील आध्य प्रवर्तक मानतात.

कुण्डल्यं दक्षिणे भागे अर्धचन्द्रं तथोत्तरे ॥
बिन्दुरुर्ध्वदिशि प्रोक्त: प्रणवे पंच वै दिश: ॥२१॥
कुडल्य दक्षिणेकडे असून उत्तरेकडे अर्धचंन्द्र आणि बिंदु उर्ध्व दिशेला असतो. याप्रमाणे प्रणवांत पांच दिशा असतात ॥२१॥
एवं देवं हि चात्मानं विज्ञाता स विचक्षण: ॥
नैऋत्य तारकाकारमीशान्यं दण्डकस्तथा ॥२२॥
या प्रमाणे देवाला व आत्म्याला जाणणारा पुरुष फारच विचक्षण होय. नैऋत्य दिशा तारकाकारक असून
ईशान्य दिशा दंडक आहे ॥२२॥
कुण्डल्यमग्निदिक्चैव वायव्यामर्धचन्द्रकम्‍ ॥
बिन्दुश्वाधो दिशा प्रोक्ता प्रणवे पंच वै दिश: ॥२३॥
अग्नेय दिशा कुंडल्य असून वायव्य दिशा अर्धचंन्द्र आहे आणि अधरदिशा बिंदुमय आहे. याप्रमाणे प्रणवांत राहिलेल्या
पांच दिशांचा अंतर्भाव ही होतो ॥२३॥
सर्वाकारमिहोच्येत सर्वगं सर्वतोमुखमऽ ॥
तारकं सद्योजास्ताय वामदेवाय दण्डकम्‍ ॥२४॥
हा ॐकार सर्वाकार, सर्वगामी आणि सर्वतोमुख असून, तारक हेंच त्याचे समोजात मुख आणि दंडक वामदेव आहे ॥२४॥
कुण्डल्यं तत्पुरुषाय ईशानायार्धचन्द्र्कम्‍ ॥
अघोरेभ्यो बिन्दुरिति प्रणवे मुखपच्चकम्‍ ॥२५॥
कुंडल्य तत्पुरुष अर्धचंद्र ईशान आणि बिंदू हे अधोरमुख होय. याप्रमाणे प्रणवाची पांच मुखे आहेत ॥२५॥
विश्वावस्थां समाह्यत्य विश्वभोगपरायण: ॥
तारकं चैव ऋग्वेदो यजुर्वेदो हि दण्डकम्‍ ॥२६॥
विश्वावस्था व्यापून, तो सर्व भोग भोगतो. तारक हाच ऋग्वेद असून, दंडक यजुर्वेद आहे ॥२६॥
कुण्डल्यं सामवेदोऽयमर्धचन्द्रो ह्यथर्वण: ॥
बिन्दुश्व सूक्ष्मवेदाऽयं प्रणवो वेदबीजकम्‍ ॥२७॥
कुंडल्य सामवेद, अर्धचंद्र अथर्वण वेद, विंदु सुक्ष्म वेद आणि प्रणव हा वेदबीज होय ॥२७॥
क्षरं च अक्षरो देव: कूटस्थात्मा च क्षत्रवित्‍ ॥
अध: शून्यं तारकं च ऊर्ध्वशून्यं च दण्डकम्‍ ॥२८॥
ते क्षराक्षराला व्यापणारे कूटस्थ वीजच क्षेत्रज्ञ होय.खालील शून्य आहे. तारक असून वरील शून्य दंडक होय ॥२८॥
कुण्डल्यं मध्यशून्यं च सर्वश्य़ून्यार्धचन्द्रकम्‍ ॥
बिन्दुश्वैव महाशून्यं प्रणवो विश्वतोमुख: ॥२९॥
मधले शून्य कुंडल्य असून सर्वशून्य अर्धचंद्रक आहे आणि बिंदु हे महाशून्य आहे. याप्रमाणे प्रणव विश्वतोमुख आहे ॥२९॥
शून्यातीत: परात्परो अक्षरं ब्रम्ह उच्यते ॥
प्रणव: पररुपोऽपं कारणं ब्रम्हधारणम्‍ ॥३०॥
शून्यांतील प्रणवाला परात्पर व अक्षर ब्रम्ह म्हणत प्रणव पररुप असून ब्रम्हाचा साक्षात्कारच आधार आहे व
ब्रम्हरुपाने सर्वांचे कारण आहे ॥३०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 31, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP