मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६० वा| श्लोक ५६ ते ५९ अध्याय ६० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५९ अध्याय ६० वा - श्लोक ५६ ते ५९ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५६ ते ५९ Translation - भाषांतर भ्रातु र्विरूपकरणं युधि निर्जितस्य प्रोद्वाहपर्वणि च तद्वधमक्षगोष्ठ्यम् ।दुःखं समुथमसहोऽस्मदयोगभीत्या नैवाऽब्रवीः किमपि तेन वयं जितास्ते ॥५६॥तुझिया विवाहप्रसंगीं । राजे भंगिले म्यां समरंगीं । तुझा अग्रज रुक्मी वेगीं । पाठीलागीं पावला ॥७४॥सांडूनि यादवांचा दळभार । माझा रोधिला रहंवर । युद्ध केलें परम क्रूर । अस्त्रें निष्ठुर वर्षला ॥४७५॥तैं त्या मारितां गदाप्रहारें । त्वां प्रार्थिलें करुणोत्तरें । मग त्या विरूप करूनि त्वरें । सजीव शरीरें सोडिला ॥७६॥तें तूं अद्यापि कोणे काळीं । वदली नाहींस कोणाजवळी । दुःख न धरूनि हृदयकमळीं । प्रेमकल्लोळीं मज भजसी ॥७७॥याहीहूनि विशेष दुःख । तवाग्रजें पौत्रीस्वयंवरीं देख । द्यूतक्रीडेमाजी सम्यक । बळभद्र मुख्य हेळिला ॥७८॥तेणें सकोप परिघप्रहारें । रुक्मि मारिला असतां निकरें । तैं त्वां आमुच्या स्नेहादरें । सशोक उत्तरें नाठविलीं ॥७९॥अद्यापि कोठें कोणाजवळीं । वदली नाहींस वेल्हाळी । शल्य धरूनि हृदयकमळीं । सर्व काळीं मज भजसी ॥४८०॥बन्धुस्नेहें विषमोत्तरें । ऐकतां स्वामीच्या अंतरें । क्षोभें ओसंडिजेल अव्हेरें । चित्त घाबरें या योगें ॥८१॥याचिया भवास्तव दुःसह दुःख । तुवां गिळिलें समपीयूष । हें मी जाणें अंतरसाक्ष । जिंकिलें नावेक त्वां आम्हां ॥८२॥जीं अंतरशत्रु जिणिले । सर्वभूतात्मका मज भजले । अभेदबोधें जे उमजले । आम्ही अंकिले पैं त्यांचे ॥८३॥आणखी अनन्य सप्रेमभावें । आम्हां जिंकिलें तुवां देवें । कैसें म्हणसी तें आघवें । कथितों स्वभावें तव चरित ॥८४॥दूतस्त्वयाऽऽत्मलभनें सुविविक्तमंत्र प्रस्थापितो मयि चिरायति शून्यमेतत् ।मत्या जिहास इदमंगमनन्ययोग्यं तिष्ठेत तत्त्वयि वयं प्रतिनंदयामः ॥५७॥अखिलान्तर्गत जो मी आत्मा । त्या मत्प्राप्तीचिया प्रयत्नकामा । पत्रीं लिहूनि धाडिलें नेमा । ते चातुर्यगरिमा मी जाणें ॥४८५॥उदयिक दिन लंघूनि परवां । मम विवाहीं नृपां सर्वां । जिंकावया सहयादवां । त्वरित यावें मम हरणा ॥८६॥अंग या कोमलामंत्रणें। संबोधूनियां मजकारणें । पत्रीं केलें निश्चयसूचने । तें मी जाणें भीमकिये ॥८७॥कदाचित्समयीं तूं न पवसी । मी न लाहें तव चरणांसी । तैं शून्यता त्रैलोक्यासी । झाली ऐसी मी मानीं ॥८८॥अंतर्यामीं तूं अनन्य । अनन्ययोग्य हें ममाङ्ग जाण । झणें प्राकृत स्पर्शती आन । यास्तव त्यागीन प्रयत्नें ॥८९॥तुझी पत्रिकेमाजील उक्ति । ते मज अद्यापि स्मरती चित्तीं । अंबुजाक्षा तव प्रसादप्राप्ति । न होतां निश्चिती तनु न राखें ॥४९०॥प्राण सोडीन तेचि घडी । जन्मान्तरीं व्रतकडाडी । जन्मशतां सुकृतपौढी । तव पद आवडी वरीन ॥९१॥तवानुग्रह न होतां देह । सोडी ऐसा दृढ निश्चय । हा जाणोनि अभिप्राय । माझें हृदय कळवळिलें ॥९२॥ऐसी सप्रेम निष्ठा तुझी । देखोनि चित्तवृत्ति माझी । वेधली जैसा भ्रमर कंजीं । लंपट रुंजी रसलोभें ॥९३॥हे तव निष्ठा तुजचि साजे । हर ब्रह्मेन्द्रां दुर्लभ सहजें । एवं उत्तीर्णतेचें ओझें । उतरूनि भजें प्रेमाचें ॥९४॥तुझिया प्रेमा मी उत्तीर्ण । होऊं न शकें सत्य जाण । विनोदवचनीं तुझें मन । आनंदपूर्ण करीतसें ॥४९५॥प्रेमसंरंभनर्मोक्ति । याचें कारण हेंचि सुमति । तव मनातें आनंदप्राप्ति । करणें निश्चिती भीमकिये ॥९६॥ऐसीं कृष्णमुखींचीं वचनें । निरोपूनियां व्यासनंदनें । पुढें परीक्षितीकारणें । करी कथन तें अवधारा ॥९७॥श्रीशुक उवाच - एवं सौरतसंलापैर्भगवान्देवकीसुतः । स्वरतो रमया रेमे नरलोक विडंबयन् ॥५८॥एवं म्हणिजे ऐशिया परी । राया देवकीतनय जो हरि । सुरतक्रीडेच्या अवसरीं । मानवाकारीं रमतसे ॥९८॥स्वरत म्हणिजे आत्मरत । तोही रमेसह ऐसा रमत । नरलोकाची अवगणीभूत । निज आचरित प्रकाशी ॥९९॥षड्गुणैश्वर्यपरिपूर्ण । योगमायाप्रभावेंकरून । अभेदीं भेदांचें रोचन । करी सर्वज्ञ सविलासें ॥५००॥एवं सुरतक्रीडावसरीं । प्रेमसंरंभनर्मोत्तरीं । कृष्ण रुक्मिणी निज मंदिरीं । परस्परें वदलीं जें ॥१॥तो कृष्णरुक्मिणीप्रेमकलह । सुरतसंरंभकथारोह । कथिल्यावरी कमलानाहो । करी नवलाव तो ऐका ॥२॥तथाऽऽन्यासामपि विभुर्गृहेषु गृहवानित । आस्थितो गृहमेधीयान्धर्मांल्लोकगुरुर्हरिः ॥५९॥जैसा रुक्मिणीचिये मंदिरीं । परमानंदें क्रीडे हरि । सशतषोडशसहस्रां घरीं । त्याच प्रकारें गृहधर्मीं ॥३॥शता आगळीं सहस्रें सोळा । आणि या वेगळ्या अष्ट अबळा । तितुकीं रूपें एकी कमळा । रुक्मिणीदेवी जाणावी ॥४॥तैसाच तितुक्या सदनीं पृथक । गृहस्थधर्मीं गृहस्थलोक । वर्तती तैसा यदुनायक । गृहवंतासम वर्ततसे ॥५०५॥सर्व लोकांचा गुरु विधाता । त्या विधातयाचाही जो जनिता । तोही नरचर्या अनुसरता । झाला तत्त्वतां कुरुवर्या ॥६॥इतुकी कथा व्याससुतें । निरूपिली परीक्षितीतें । मुनिचक्रें सह शौनकातें । सूतपुत्रें निरूपिली ॥७॥तें हें भागवत सविस्तर । व्यासप्रणीत अठरा सहस्र । परमहंसाचें पीयूषपात्र । शुककुरुवरसंवाद ॥८॥त्यामाजील दशम स्कंध । कृष्णरुक्मिणीनर्मानुवाद । दयार्णववदनें भाषा विशद । व्याख्यान शुद्ध हरिवरद ॥९॥एवं पष्टितमेऽध्यायीं । इतुकी कथा कथिली पाहीं । एकषष्टाव्यामाजी कायी । शेषशायी करी लीला ॥५१०॥साष्ट सशत सहस्त्रें सोळा । कृष्णें वरिल्या ज्या नृपबाळा । तत्संततिवृद्धिसोहळा । आणि विवाह संततीचे ॥११॥हें निरूपण सविस्तर । पुढिले अध्यायीं कुरुवर । परिसेल तेथ पंक्तिकार । श्रोतीं सादर होइजे ॥१२॥दयार्नवाची इतुकी विनति । रुक्मिणीऐसी सप्रेम भक्ति । लाहोनि भजिजे रुक्मिणीपति । भवनिवृत्ति तद्योगें ॥१३॥श्रीएकनाथ प्रतिष्ठानीं । चिदानंदाच्या सिंहासनीं । विराजमान स्वानंदभुवनीं । सर्वग गोगणीं गोविंद ॥१४॥तत्पादोदकप्रवाहिनी । निरत गौतम गौतमीपानीं । पिपीलिकानिवासस्थानीं । दयार्णवदनें हरि वदला ॥५१५॥इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां कृष्णरुक्मिणीप्रेमसंरंभकथनं नाम षष्टितमोऽध्यायः ॥६०॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥५९॥ ओवी - संख्या ॥५१५॥ एवं संख्या ॥५७४॥ ( साठावा अध्याय मिळून ओवीसंख्या २८८५४ ) अध्याय साठावा समाप्त. N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP