मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६० वा| श्लोक २६ ते ३० अध्याय ६० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५९ अध्याय ६० वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर पर्यकादवरुह्याशु तामुत्थाप्य चतुर्भुजः । केशान्समुह्य तद्वक्त्रं प्रामृजत्पद्मपाणिना ॥२६॥रुक्मिण्यवस्थेचा प्रकार । देखोनियां अभ्यंतर । द्रवलें तेणें अतिसत्वर । मंचकावरूनि उतरूनी ॥७७॥द्विभुज सर्वत्र मुरारि । वर्तत असतां यादवभारीं । रुक्मिणीवैकल्य देखूनि नेत्रीं । बाहु चार्ही प्रकटिले ॥७८॥चहूं भुजीं केलें काय । तो परियेसीं अभिप्राय । एक्या हस्तें रुक्मिणीकाय । सांवरूनियां बैसविला ॥७९॥दुजिया हस्तें पुसिलें वदन । तिजेनें केशकलापरचन । चतुर्थहस्तें आलिंगन । देऊनि वदन चुंबिलें ॥१८०॥जेंवि प्रियेच्या रतिरंगणीं । उद्योगवंत विलसती पाणि । त्याच पद्महस्तें रुक्मिणी । हृदयीं कवळूनि आलिङ्गिली ॥८१॥प्रमृज्याश्रुकले नेत्रें स्तनौ चोपहतौ शुचा । आश्लिष्य बाहुना राजन्ननन्यविढयां सतीम् ॥२७॥अश्रुकलायुक्त नयन । शंतम करें परिमार्जन । शोकें संतप्त हृदय स्तन । तेही स्पर्शोन निवविले ॥८२॥आन विषय नेणे स्वप्नीं । आपणावांचोनि जे रुक्मिणी । हें जाणोनि चक्रपाणि । बाहु परसोनि आलिङ्गी ॥८३॥जिच्यासतीपणाची सीमा । सन्मय व्रतें श्रीपरमात्मा । सेवी म्हणोनि अनन्य प्रेमा । परस्परें अनिवड ॥८४॥विषमोत्तरीं भंगलें हृदय । जाणोनि कृपेनें द्रवला सदय । सान्त्वनाचा अभिप्राय । विवरी काय तो ऐका ॥१८५॥सांत्वयामास सांत्वज्ञः कृपया कृपणां प्रभुः । हास्यप्रौढीभ्रमच्चित्तामतदर्हा सतां गतिः ॥२८॥हास्यप्रौढीचीं उत्तरें । स्पर्शिलीं असतां अंभ्यंतरें । भ्रमनचक्रीं चित्त फिरे । धृति शरीरें सांडूनी ॥८६॥हास्यप्रौढीच्या विलासा । योग्य रुक्मिणी नोहे सहसा । जाणोनि स्वजनाचा कुवासा । पुन्हा संतोषा उपजवी ॥८७॥सान्त्वनकोविद असती जे जे । तयांच्या मुकुटीं जो विराजे । तया सान्त्वनज्ञें यादवराजें । रुक्मिणी ओजें सान्तविली ॥८८॥सज्जनाचें प्राप्तिस्थान । सताङ्गति तो भगवान । प्रभु म्हणिजे समर्थ पूर्ण । अनुनयवचन बोलतसे ॥८९॥श्रीभगवानुवाच - मा मा वैदर्भ्यसूयेथा जाने त्वां मत्परायणाम् । त्वद्वचः श्रोतुकामेन क्ष्वेल्याचरितमंगने ॥२९॥अवो वैदर्भि गुणैकराशि । झणें मत्पर ईर्ष्या धरिसी । झणें माझी असूया करिसी । अभिप्रायासी नेणोनी ॥१९०॥तूतें जाणें मी अनन्य । मन्निरता मत्परायण । उपहासमिषें तुझें वचन । करावें श्रवण हे इच्छा ॥९१॥तुझिये मुखींचीं मधुर वचनें । स्मितापाङ्गें विलासपूर्णें । पीयूषप्राय घेतां श्रवणें । रसाळपणें सुख करिती ॥९२॥तुझ्या वचनाचा श्रवणकाम । धरूनि विनोदें जें सम विषम । बोलिलों तें नेणोनि वर्म । तूं भय श्रम भजलीस ॥९३॥विनोदें बोलिलों ज्या व्यंगोक्ती । त्या सत्यत्वें मानूनि चित्तीं । मूर्च्छा पावलीस अवचिती । हें मजप्रति जाणवलें ॥९४॥जीं बोलिलों विषम वचनें । उपहासप्रौढीपरी तीं जाणें । सत्य न मनीं अंतःकरणें । चतुरे सुजाणे ममाङ्गने ॥१९५॥तत्त्वता ऐसींच जरी तीं असतीं । तैं कें घडती सप्रेम रति । अनन्यप्रियतमा तुजपरौती । कोण ते चित्तीं विवरीं पां ॥९६॥तुज न विसंबें मी क्षणभरी । तुजवेगळा न वचें दुरी । तुजवीण द्वैताची अवसरी । मज संसारीं सर्वस्वें ॥९७॥मत्प्रेमसुखाचें दर्पण । तें एक तुझेंचि अंतःकरण । एर्हवीं अवघा मी परिपूर्ण । द्वैतविहीन एकात्मा ॥९८॥तुज पहावया मी डोळस । तव प्रेमास्तव रूपस । तव जाणावया मानस । एर्हवीं निःशेष हृच्छून्य ॥९९॥तव गुणश्रवणीं मी सश्रवण । तव रसार्थ रसनावान । तव सौरभ्या मी सघ्राण । तवालिङ्गना त्वग्वंत ॥२००॥तूं मज अनन्य सर्वांपरी । मी तुज तैसाचि बाह्यान्तरीं । हें विसरोनि नर्मोत्तरीं । मूर्च्छा शरीरीं अनुभविली ॥१॥आतां जाणोनि सप्रेमभावो । नर्मोक्तींचा न धरीं भेवो । ऐसें बोलतां यादवरावो । परतला जीव भीमकीचा ॥२॥मग परिमार्जूनि सर्वावयव । हनुवटी धरूनियां स्वयमेव । वदन चुंबूनि वासुदेव । नर्मोक्तिभाव प्रकाशी ॥३॥अवो सुंदरि नर्मोक्तिवचना । बोलोनि निरखितां दयितावदना । तये काळींच्या पाहोनि चिह्ना । आनंद नयनां रमणाच्या ॥४॥प्रेमसंरंभीं चिह्नें कोण । जिहेंकरूनि मंडित वदन । तें मी कथितों तुजलागून । परिसें लावण्यरससरिते ॥२०५॥मुखं च प्रेमसंरंभस्फुरिताधरमीक्षितुम् । कटाक्षेपारुणापांगं सुंदरभ्रृकुटीतटम् ॥३०॥रमण करितां प्रेमोपहास । तेणें रमणीचें मानस । क्षोभें धरी ईर्ष्यावेश । चिह्नें उदास तैं येती ॥६॥प्रेमसंरंभयुक्त मुख । प्रेमसंरंभ उक्ति देख । पहावयाकारणें मिष । नर्मोक्तीचें जाणिजे ॥७॥मानसक्षोभें स्फुरिताधर । कटाक्षविक्षेप अपाङ्गरुचिर । सग्रंथि भ्रुकुटी किंचिद्वक्र । वदन सुंदर या चिह्नीं ॥८॥इत्यादि चिह्नीं मंडित वदना । निरखावया नर्मोक्तिवचना । कामुक वदती ऐसी सूचना । रतिसंपन्ना विदित असे ॥९॥जरी तूं म्हणसी विदर्भदुहिते । मंचकीं कान्ताप्रियतमचित्तें । रंगलीं असतां कलह तेथें । केंवि सुखातें उपपादी ॥२१०॥तरी तूं ऐकें वो मम रमणी । दंपती मीनल्या रतिरंगणीं । लिंगसाङ्घट्यें अर्धक्षणीं । शुक्रस्खलनीं वैरस्य ॥११॥मग घालूनि कंठीं हात । स्वपती दंपती तें निवांत । यालागीं कामशास्त्रनिर्णीत । प्रेमसंरंभ उपहासें ॥१२॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP