मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६० वा| श्लोक ११ ते १५ अध्याय ६० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५९ अध्याय ६० वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर तान्प्राप्तानर्थिनो हित्वा चैद्यादीन्स्मरदुर्मदान् । दत्ता भ्रात्रा स्वपित्रा च कस्मान्नो ववृषेऽसमान् ॥११॥रुक्मी तुझा अग्रज बंधु । तेणें लक्षूनि स्नेहवादु । वर निर्धारें नेमिला चैद्यु । ऐश्वर्यसिंदु जाणोनी ॥३॥तदनुकूल मातापितरें । सम्मत पुरोहित सोयरे । वाड्निश्चयें कृतनिर्धारें । गणकविचारें घटितार्थ ॥४॥एवं अनुकूल सर्वां परी । शाल्बमागध सहपरिवारीं । आले असतां विवाहगजरीं । त्यां त्वां सुन्दरी उपेक्षिलें ॥१०५॥आर्तभूत नोवरीकाम । नगरा आले नृपोत्तम । त्यांतें सांडोनि आम्ही असम । करोनि श्रम कां वरिले ॥६॥परस्परें समान श्रुत । परस्परें समान वित्त । परस्परें तुल्य पुरुषार्थ । मैत्रसुहृदार्थ त्यांमाजी ॥७॥आम्ही असाम्य सर्वांपरी । कैसे म्हणसी जरी तूं सुंदरी । तेंही कथितों तूं अवधारीं । बरवें अंतरीं विवरोनी ॥८॥राजभ्यो बिभ्यतः सुभ्रूः समुद्रं शरणं गतान् । बलवद्भि कृतद्वेषान्प्रायस्त्यक्तनृपासनान् ॥१२॥जरासंधसमाराङ्गणीं । बहळभूपाळांपासोनी । भय पावलों अंतःकरणीं । सांडूनि अवनीं पळालों ॥९॥समुद्रातें गेलों शरण । बलिष्ठांचें द्वेषभाजन । विशेषें त्यक्तनृपासन । केंवि त्यां समान तूं गणिसी ॥११०॥अस्पष्टवर्त्मनां पुंसामलोकपथमोयुषाम् । आस्थिताः पदवीं सुभ्रूः प्रायः सीदंति योषितः ॥१३॥ज्यांचा आचार न कळे प्रकट । लौकिकरहित ज्यांची वाट । त्यांच्या मार्गा झालिया विनट । पावती कष्ट कुलस्त्रिया ॥११॥लौकिकरहित पद्धति कैसी । तेही कथितों तूं परियेसीं । सूचनामात्रें सर्वज्ञांसी । नुमजे मूर्खांसी बहु कथितां ॥१२॥निष्किंचना वयं शश्वन्निष्किंचनजनप्रियाह । तस्मात्प्रायेण न ह्याढ्या मां भजंति सुमध्यमे ॥१४॥लोक सकिंचनास्पदीभूत । आम्ही निष्किंचन संतत । निष्किंचन जन जे आम्हां भजत । आम्ही बहुत प्रियतम त्यां ॥१३॥तस्मात् आम्ही आढ्य न हों । आढ्यां आम्हां न घडे स्नेहो । यालागीं असाम्य सुहृद्भावो । रायां आम्हां नृपतनये ॥१४॥जीच्या मध्यासी सिंह उपमा । तियेसि म्हणिजे सुमध्यमा । म्हणोनि संबोधी परमात्मा । सुमध्यमें या संबोधनें ॥११५॥म्हणसी समता कोणेपरी । शास्त्रनिर्दिष्टग्रंथान्तरीं । तेंही कथिजेल तूं अवधारीं । अभ्यंतरीं विवरूनी ॥१६॥ययोरात्मसमं वित्तं जन्मैश्वर्याकृतिर्भवः । तयोर्विवाहो मैत्री च नोत्तमाधमयोः क्वचित् ॥१५॥परस्परें समान वित्त । समान ज्यांचें श्रुताधीत । जन्म कर्म वय समस्त । समान वृत्त जयांचें ॥१७॥वृत्ति व्यवहार कुळाचार । ऐश्वर्य आकृति संसार । गोत्रनिर्णय परात्पर । सुहृदाचार सम उभयां ॥१८॥ऐशियांमाजी परस्परें । विवाह मैत्री परमादरें । चाले आणि स्नेहसुभरें । परस्परें उपकरती ॥१९॥अधमोत्तमांमाजि मैत्री । कोठें न घदे वो राजपुत्री । घडल्या अनादर उभयत्रीं । वैराधारीं प्रवर्तती ॥१२०॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP