मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६० वा| श्लोक ५१ ते ५५ अध्याय ६० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५९ अध्याय ६० वा - श्लोक ५१ ते ५५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५१ ते ५५ Translation - भाषांतर उपलब्धं पतिप्रेम पातिव्रत्यं च तेऽनघे । यद्वाक्यैश्चाल्यमानाया न धीर्मय्यपकर्षिता ॥५१॥ऐसिया अनुवादेंकरून । भोगमोक्षादि वर देऊन । भीमकीतें श्रीभगवान । आनंदपूर्ण करीतसे ॥२३॥अनघे म्हणोनि संबोधिलें । म्हणे निष्पापे ऐकिलें । तुझें पातिव्रत्य भलें । त्वां जोडिलें पतिप्रेमें ॥२४॥आम्ही उपहासवाक्येंकरून । चंचल केलें तुझें मन । परी त्वां माझे ठायींहून । बुद्धिकर्षण न केलें ॥४२५॥माझिया नर्मोक्तीच्या श्रवणीं । चंचल न होतां अन्तःकरणीं । बुद्धि अन्यत्र विषयगामिनी । नव्हे म्हणोनि मी जाणें ॥२६॥इतुकें बोलोनि रुक्मिणीप्रति । सकाम तापस जे जे व्रती । त्यांतें निंदी एकान्तभक्ति । दृढ कराया कारणें ॥२७॥ये मां भजंति दांपत्ये तपसा व्रतचर्यया । कामात्मानोऽपवर्गेशं मोहिता मम मायया ॥५२॥कठोर तपें तीव्र व्रतें । करूनि सकाम भजती मातें । भजूनि कामिती सुखातें । मिथुनीभूतें दाम्पत्यें ॥२८॥दंपती म्हणजे कान्तकामिनी । त्यांसि भोगार्ह ज्या भोगश्रेणी । त्या वांछिती माझिया भजनीं । कैवल्यदानी मीं असतां ॥२९॥मी जो अपवर्गाचा पति । त्या मज दाम्पत्यसुख वांछिती । मम मायेनें घातली भ्रान्ति । यास्तव नुमगती अपवर्ग ॥४३०॥क्षीरसमुद्रीं देवोनि बुडी । जेंवि वांछिती फुटकी कवडी । कीं कल्पतरुतळवटीं बराडीं । क्षुधे कडाडी तुष सेवी ॥३१॥जाऊनि कुबेराचिये मठीं । मागती फुटकी कांचवटी । तेंवि मज भजती भोगांसाठीं । केवळ करंटीं बहिर्मुखें ॥३२॥तैसें नव्हेचि तुझें भजन । एकान्तभक्ता तुज जाणून । इहामुष्मिक कैवल्यदान । भोगनिर्वाण तुज दिधलें ॥३३॥सकाम तुझ्याचि ठायीं भजती । तरी कां नोहे भवनिवृत्ति । ऐसी आशंका धरिसी चित्तीं । तरी परिसें यदर्थीं भीमकिये ॥३४॥दुरत्यया जे मम माया । मोहावर्तें कवळी जयां । तयांची भ्रान्ति निरसावया । समर्थ नव्हती विधि हरही ॥४३५॥मामेव ये प्रपद्यंते । तेचि तरती मम मायेतें । येरां रजतमसंवलितांतें । भजतां मोहातें वरपडती ॥३६॥पंचायतनीं जे जे भजती । ते ते पावती मजचि प्रति । तरी कां माया न निस्तरती । म्हणसी सुमति तरी ऐक ॥३७॥रजोगुणीं संभवे राग । तमोगुणीं द्वेषप्रसंग । रागद्वेषरहित चांग । शुद्ध सत्त्वात्मक मम भजन ॥३८॥म्हणसी सकाम जे जे भजती । ते कैं कोणांतें द्वेषिती । रागें कोणां प्रति करिती । तेंही निगुतीं अवधारीं ॥३९॥जियेविषयीं उपजे राग । तोचि विषय कामिती चांग । जिया विषयावरी विराग । द्वेषप्रसंग ते ठायीं ॥४४०॥बाळक्रीडेच्या प्रसंगीं । अनुराग वर्ते सहोदरवर्गीं । तेचि पितृदायाच्या विभागीं । द्वेषमार्गीं प्रवर्तती ॥४१॥मातृस्तन्याचा अनुराग । तैं माताच आवडे चांग । यूनां प्रियकर युवतिलिंग । तैं मानी उबग जननीचा ॥४२॥एवं रागद्वेषोक्त मद्भजन । तेंचि भ्रमाचें मुख्य भाजन । मोहावर्तीं करी निमग्न । तें तूं संपूर्ण अवधारीं ॥४३॥मां प्राप्य मानिन्यपवर्गसंपदं वांछंति ये संपद एव तत्पतिम् ।ते मंदभाग्या निरयेऽपि ये नृणां मात्रात्मकत्वान्निरयः सुसंगमः ॥५३॥भोग मोक्ष ज्याच्या ठायीं । सहज वर्तती सर्वदाही । ऐसिया मातें भजोनि पाहीं । वांछिती विषयी संपत्ति ॥४४॥मातें भजूनि चिरकाळवरी । प्रसन्नतेचिये अवसरीं । मोक्ष न मागूनि विषयविकारीं । संपदा आसुरी वांछिती ॥४४५॥मी जो भोगमोक्षांचा पति । प्रसन्न करूनि त्या मजप्रति । मोक्ष न मागूनि भयसंपत्ति । जे वांछिती ते निरयी ॥४६॥निरयी म्हणसील कोणेपरी । तेंही भीमकिये अवधारीं । निरययातनामयशरीरीं । जे संसारीं पचताती ॥४७॥विष्ठेमाजील जे जे किडे । त्यांसी विष्ठेमाजी पचणें घडे । ऐसें नव्हे तेंचि उघडें । नरक रोकडे देहेंसी ॥४८॥विष्ठेमाजी जंतु पचती । सदयें काढून तयांप्रति । ठेविलें दुग्धीं शर्कराघृतीं । तेथ विश्रान्ति त्यां कैंची ॥४९॥तस्मात् शरीरें नरकमय । धरूनि पातकीजनसमुदाय । सदेह नरकयातनाप्राय । भोगिता होय अधगरिमा ॥४५०॥ऐशिया नरकामाजी पचती । तेथही मैथुनसुखावाप्ति । आहारनिद्राभयोन्नति । वर्ते जातिस्वभावें ॥५१॥तस्मान्नरकामाजी जे भोग । अनेक जन्में भोगिले साङ्ग । मज भजोनि तोचि प्रसंग । सकाम दुर्भग वांछिती ॥५२॥नरकापासून सोडविता । अक्षय सुखाचा दाता । त्या मज भजून कैवल्यनाथा । नरकसंपदा वांछिती ॥५३॥एवं तन्मात्रात्मक जें सुख । तोचि जाणावा उघड नरक । मजही भजूनि तें मागती मूर्ख । विषयकामुक अभाग्य ॥५४॥तैसें भजन तुवां न केलें । भवविरागें मन क्षाळिलें । निष्कामप्रेमें आधारिलें । तेंही कथिलें जातसे ॥४५५॥दिष्ट्या गृहैश्वर्यसकृन्मयि त्वया कृतानुवृत्तिर्भवमोचनी खलैः ।सुदुष्करासौ सुतरां दुराशिषो ह्यसुंभराया निकृतिंजुषः स्त्रियः ॥५४॥पट्टमहिषिये गृहेश्वरी । ऐकें विदर्भनृपकुमारी । माझ्या ठायीं अनुवृत्ति पुरी । केली निर्धारीं एकदाचि ॥५६॥ते तूं अनुवृत्ति कैसी म्हणसी । जे मोक्ष देऊनि भवातें निरसी । दिष्ट्या म्हणिजे कल्याणराशि । निश्चयेंसी तुज लब्ध ॥५७॥हेंचि महाभाग्य जाण । आकल्प जोडिलें निष्काम पुण्य । निष्काम अनुवृत्तीसी कारण । भवमोचन ज्या योगें ॥५८॥येर ज्या सकाम दुर्वृत्ता नारी । दुष्ट अभिपाय ज्यां अंतरीं । वंचनपरा सर्वांपरी । दुराचारी दुर्भाग्या ॥५९॥यास्तव प्राणतर्पणपरा । वशवर्तिनी खळविकारा । निष्काम अनुवृत्तीचा वारा । त्यांसी दुष्कर जाण पां ॥४६०॥ऐसिया बुडती भवसागरीं । विषय कामिती नानापरी । दुष्ट मनोरथ ज्यां अंतरीं । प्राणपोषणपरायणा ॥६१॥असो त्या दुर्भगांचिया गोष्टी । तुजसारिखी इये सृष्टी । धन्यतमा अन्य गोरटी । न देखें दृष्टी भीमकिये ॥६२॥न त्वादृशीं प्रणयिनीं गृहिणीं गृहेषु पश्यामि मानिनि यया स्वविवाहकाले । प्राप्तान्नृपानवगणय्य रहोहरो मे प्रस्थापितो द्विज उपश्रुतसत्कथस्य ॥५५॥ऐकान्तिकी निष्कामभक्ति । भीमकीची अनन्य प्रीति । स्वमुखें सम्मानी श्रीपति । पूर्वानुष्ठितें स्मरोनी ॥६३॥तुजसारिखी इये त्रिभुवनीं । न देखों अन्य प्रणयिनी । विनयभावें माझ्या भजनीं । कायवाड्मनीं मन्निष्ठा ॥६४॥गृहिणी म्हणीजे गृहमेधिनी । पोष्यवर्गाच्या प्रतिपालनीं । ज्येष्ठां श्रेष्ठांचिया सम्मानीं । विनयगुणीं अनुकूळ ॥४६५॥ऐसी कोठें कोणे गृहीं । तुजसारिखी दुसरी पाहीं । आम्ही कदापि देखिली नाहीं । कान्तविषयीं अनीर्ष्या ॥६६॥अवो मानिनि स्वविवाहकाळीं । विख्यात भूभुज भूमंडळीं । तिया नृपांची मंडळी । जिणें त्यागिली वमनवत् ॥६७॥कळो नेदितों मातापितरां । विप्र धाडिला द्वारकापुरा । पत्रिकालेखनें अभ्य़ंतरा । निजनिर्धारा जाणविलें ॥६८॥वैष्णव जे मत्परायण । तयांच्या मुखें मत्कथाश्रवण । होतां मन्निष्ठ अंतःकरण । जाणोनि हरण म्यां केलें ॥६९॥तैंहूनि माय माहेरींची । सोडोनि दिधली सर्वही रुचि । कदापि गोष्टी बंधुवर्गाची । ना इतरांची न काढिसी ॥४७०॥माता पिता बन्धु स्वजन । त्यांचें श्रवणीं पडतां न्यून । कळवळूनियां स्त्रियांचें मन । होवोनि उद्विग्न पतिभजनीं ॥७१॥तैसी नव्हेसि तूं रुक्मिणी । भवविरक्त जैसे ज्ञानी । ईषणात्यागें कैवल्यदानी । जाणोनि भजनीं अनुसरती ॥७२॥तैसेंचि तुझें निर्वाणभजन । माता पिता बन्धु स्वजन । सांडून जालीस मदेकशरण । तेंही संपूर्ण अवधारीं ॥७३॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP