मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६० वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ६० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५९ अध्याय ६० वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर अयं हि परमो लाभो गृहेषु गृहमेधिनाम् । यन्नर्मैर्नीयते यामः प्रियमा भीरु भामिनि ॥३१॥कोपसंचार जिये शरीरीं । भामिनी म्हणिजे तिये सुंदरी । यालागीं संबोधी श्रीहरि । भामिनीनामें भीमकिये ॥१३॥गृहमेधी जो गृहस्थधर्मी । वर्तत असतां गृहस्थाश्रमीं । तो कैवल्यसुखासमान उपमीं । हाचि लाभ रतिरस जो ॥१४॥गुणलावण्या चातुर्यखाणी । शयनीं संप्रपत असतां रमणी । हास्यनर्मोक्तिभाषणीं । जो काळ क्रमिती चारुतर ॥२१५॥प्रेमकलहें वदती ललना । तद्युक्त आवेशचिह्में वदना । ऐकोनि पाहों श्रवणा नयना । लाभ यूना परम हा ॥१६॥प्रेमसंरंभीं ज्या व्यंगोक्ति । हारपोनि जाती तितुक्या सुरतीं । विशुद्धमानसें प्रिय दंपती । आनंदती परस्परें ॥१७॥नातरी पश्चादि श्वानसूसर । रमतां करिती गुरगुर क्रूर । रामभादि लत्ताप्रहार । मन्मथसमरप्रसंगीं ॥१८॥तेंवि संसारीं प्राकृत नर । मनुष्यरूपें श्वानसूकर । नेणती मन्मथक्रीडासार । करिती संसार वैरस्यें ॥१९॥यालागीं नरवर अमरांसम । जाणती रतिरसविलासक्रम । नर्मव्यंगोक्तींचें प्रेम । भाषणकाम परस्परें ॥२२०॥असो ऐसिया नर्मोत्तरीं । उपहासिलीस वो सुंदरी । तें नेणोनि अभ्य़ंतरीं । दुःखलहरी अनुभवैली ॥२१॥आतां सांदोनि मनींचा खेद । निःशंक करी प्रेमानुवाद । तेणें होईल परमानंद । म्हणे मुकुन्द भीमकिये ॥२२॥श्रीशुक उवाच - सैवं भगवता राजन्वैदर्भी परिसांत्विता । ज्ञात्वा तत्परिहासोक्तिं प्रियत्यागभयं जहौ ॥३२॥कुरुजलधिभवसुधारसा । ऐकें हरिकीर्तनलालसा । ऐशिया प्रकारीं मृगडोळसा । परमपुरुषें सान्तविली ॥२३॥मानस निवविलें प्रेमोत्तरीं । शरीर स्पर्श्नोनि शंतमकरीं । चुंबनालिङ्गनें बाह्यान्तरीं । आनन्दलहरी प्रकटिली ॥२४॥मग ते वैदर्भी निजमनीं । परिहासोक्ति भगवद्वचनीं । मद्वाक्यश्रवणाची शिराणी । ऐसें जाणोनि हरिखेली ॥२२५॥पूर्वीं व्यंग्योक्ति निष्ठुरा । ऐकोनि भयाचा भेदरा । झळंबला जो अभ्यंतरा । तो तैं बाहेरा बोळविला ॥२६॥माझिया विवाहाचिये क्षणीं । अवघीं प्रतिकूळ देखोनी । मग म्यां केली अघटित करणी । पत्र प्रेरूनि हरि वरिला ॥२७॥ऐसें ढालगजपण जें माझें । हृदयामाजी गरुडध्वजें । ठेविलें होतें तें आजि सहजें । विषम हृदयींचें उपशिलें ॥२८॥आतां शाल्वमागधचैद्या । भजें म्हणोनि वदला शब्दा । अयोग्य जाणोनियां प्रमदा । रुचला मुकुन्दा मम त्याग ॥२९॥पक्कान्नपरवडी अमृतप्राय । त्यांमाजी विष जैं भोक्ता खाय । तें दुःख हृदयांमाजी तो वाहे । मग करी उपाय त्यागार्थ ॥२३०॥वमनरेचनपाचनयोगें । निरुज होय विषाच्या त्यागें । तैसेंचि मजलागीं श्रीरंगें । परिहासप्रसंगें आदरिलें ॥३१॥भाग्यें पत्रलेखनावरी । प्रियतम वरिला श्रीमुरारि । तया आनंदें आजिवरी । होत्यें अंतरीं प्रफुल्लित ॥३२॥आजि ऐकूनि व्यंग्योत्तरें । त्यागभयाचें आले शारें । पुढती सान्तवितां श्रीधरें । प्रेमोपचारें तें हरिलें ॥३३॥ऐसें प्रियत्यागाचें भय । सांडूनि वैदर्भी निर्भय । होवोनि वल्लभा वदती होय । हे रससोय शुक वर्णी ॥३४॥बभाष ऋषभं पुंसां वीक्षंती भगवन्मुखम् । सव्रीडहासरुचिरस्निग्धापांगेन भारत ॥३३॥सांडूनि भयाचा भेदरा । चेतना प्राप्त करणनिकरा । कृष्णसान्त्वनें सुंदरा । प्रेमाधिकारा पावली ॥२३५॥कृष्णसान्त्वनोक्तीवरी । पूर्वोक्तीचें कारण चतुरीं । विवरूनि पूर्वापर अंतरीं । अभिप्राय अवगमिला ॥३६॥अयं हि परमोलाभ । ऐसें बोलिला पंकजनाभ । या वचनाचा जाणोनि गर्भ । स्मितापाङ्गें अवलोकी ॥३७॥पूर्व नर्मोक्ती स्वत्यागपर । तैं भंगलें होतें अंतर । कृष्णसान्त्वनें प्रेमादर । झाला निर्धार अभयाचा ॥३८॥माझिया मुखें स्निग्धोत्तरें । ऐकावया परमेश्वरें । बोलिल्या नर्मोक्ती आदरें । नव्हतीं निष्ठुर क्रोधवाक्यें ॥३९॥ऐसें विवरोनि पूर्वापर । जाणोनि स्वामीचें अंतर । निर्भयभावें परम सधीर । झाली सादर प्रतिवचना ॥२४०॥सलज्ज सस्मित रुचिरापाङ । कटाक्षविक्षेप भृकुटी चांग । इत्यादि लक्षणीं नाथोत्तमाङ्ग । नयनभृंगें प्राशीतसे ॥४१॥पुरुषांमाजी उत्तम पुरुष । तो श्रीकृष्ण जगदीश । अंतरीं पावोनि परमोल्लास । भाषण करीत तेणेंसी ॥४२॥रुक्मिण्युवाच - नन्वेवमेतदरविंदविलोचनाऽऽह भवान्भगवतोऽसदृशी विभूम्नः ।क्व स्वे महिम्न्यभिरतो भगवांस्त्र्यधीशः क्वाहं गुणप्रकॄतिरज्ञ गृहीतपादा ॥३४॥आपुले ठायीं दोष सोळा । घेऊनि वदला घनसांवळा । उभय दोषीं भीमकबाळा । बुद्धिमंदत्वें नोकिली ॥४३॥दोषारोपित श्रीकृष्णशब्द । करूनि तद्दोषापवाद । गुणगणमंडित स्तवनानुवाद । त्यामाजी विशद प्रतिपादी ॥४४॥म्हणे अरविंदलोचना । जें तूं वदलासि भो सर्वज्ञा । आम्हां असमां कोण्याकारणा । राजपुत्रि त्वां वरिलें ॥२४५॥तरी तें यथार्थ अन्यथा नोहे । तुझा महिमा केवढा पाहें । तेथ मज किंमात्रेची सोय । कैसेनि ये समतेसी ॥४६॥तुजसीं समान न सजे भाज । तुशीं रमतां परम लाज । यथार्थ वदले गरुडध्वज । परिहासबीज हें स्पष्ट ॥४७॥तुझा महिमा कोणीकडे । ब्रह्मादि त्रिदेवां नियमिसी दंडें । तेथ प्राकृत जड मूढ वेडें । कोण्या तोंडें सम म्हणवूं ॥४८॥तुझी स्वगत जे पूर्णश्री । गुणसाम्यप्रकृति ऐश्वर्यधात्री । जियेतें सनकादि सर्वत्रीं । त्रिविधा नरीं भजिजेत ॥४९॥बद्ध मुमुक्षु आणि मुक्त । विषयी साधक सिद्ध स्वरत । तव वल्लभा भेदरहित । जाणोनि संतत भजताती ॥२५०॥तेही समता तुजसीं न करीं । तेथ मी प्राकृता गुणविकारी । गुणमयी प्रकृति तुजसी सरी । सहसा न करीं हें सत्य ॥५१॥अज्ञ म्हणिजे मूर्ख जन । प्रपंचीं निरत विषयाभिज्ञ । ते आराधिती माझे चरण । विरक्त सर्वज्ञ उपेक्षिती ॥५२॥रात्रीदिसा समता न घडे । चैतन्यसमता न कीजे दगडें । हें सर्वांसी कळों ये उघडें । नोहे वांकुडें वदलां तें ॥५३॥पूर्वोक्तीचा वास्तव बोध । विवरूनि निरसिला अपवाद । हें ऐकोनि श्रीमुकुंद । मानी कोविद वैदर्भी ॥५४॥यावरी हरीचें द्वितीयोत्तर । दोष निरसूनि ऐश्वर्यपर । प्रतिपाद्ती झाली चतुर । बोधी मुनिवर तें राया ॥२५५॥सत्यं भवादिव गुणेभ्य उरुक्रमांतः शेते समुद्र उपलंभनमात्र आत्मा ।नित्य कदिंद्रियगणैः कृतविग्रहस्त्वं त्वत्सेवकैर्नृपपदं विधुतं तमोंऽधम् ॥३५॥हेंही सत्य हो मुरारि । भय पावलियाचे परी । शरण समुद्रा गेलों हरि । म्हणसी वैखरी हे उचित ॥५६॥तरी परिसा जी उरुक्रमा । तुम्हांसि भयाची न शिवे गरिमा । तो तूं रायांच्या पराक्रमा । भेणें धामा जळीं करिसी ॥५७॥शब्दस्पर्शादिक जे गुण । राजे राजताति हे म्हणोन । यांपासोन भय पावोन । हृदयसमुद्रीं दुर्गम तूं ॥५८॥भय पावलासि हें भासे मूढां । येर्हवीं निर्भय तूं धडफुडा । अंतरसमुद्रामाजी गूढा । गूढ होवोनि वसतोसी ॥५९॥समुद्राहूनि अगाधतर । विषय राजयां अगोचर । जेथ निश्चळ प्रकाशकर । समुद्रान्तर वसविशी ॥२६०॥उपलंभननामें मात्रा । तिहीं अनुमेय तूं स्वतंत्रा । आत्मा चैतन्यघन या विचारा । प्रतिपादिती अनुमानें ॥६१॥आणि बळिष्ठांहीं केला द्वेष । ऐसें बोलिले परमपुरुष । तेंही सत्यचि हा विशेष । सावकाश अवधारा ॥६२॥कुत्सित इंद्रियांचा जो गण । बाह्यज्ञानें बळिष्ठ पूर्ण । ते द्वेषिती तुजलागून । अप्राप्त म्हणून अप्रिय त्यां ॥६३॥अप्रिय म्हणोनि द्वेषनिष्ठ । प्रवृत्ति मानिती परम मिष्ठ । भेदें विषयीं रत पापिष्ठ । भोगिती कष्ट यास्तव ते ॥६४॥आम्ही त्यक्तनृपासन । ऐसें बोलिले जें भगवान । ऐका तयाचें निरूपण । सत्य म्हणोन प्रतिपादी ॥२६५॥तुझे सेवक जे विरक्त । विषयीं विमुख निजात्मरत । तिहें नृपासन जें त्यक्त । गाढ ध्वान्त मानूनी ॥६६॥परम दुष्कृत निरयस्थान । गाढ अन्धतम नृपासन । तें तव सेवक त्यजिती पूर्ण । मां तूं कोठून स्वीकरिसी ॥६७॥अस्पष्टमार्गगामी आम्ही । नाकळो लौकिकमार्गधर्मीं । हेंही बोलिलां सत्य स्वामी । नेणिजे अधर्मी पथ तुमचा ॥६८॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP