मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६० वा| श्लोक ४६ ते ५० अध्याय ६० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५९ अध्याय ६० वा - श्लोक ४६ ते ५० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४६ ते ५० Translation - भाषांतर अस्त्वंबुजाक्ष मम ते चरणानुराग आत्मन्नतस्य मयि चानतिरिक्तदृष्टेः ।यर्ह्यस्य वृद्धय उपात्तरजोऽतिमात्रो मामीक्षसे तदु ह नः परमाऽनुकंपा ॥४६॥तरी तेंही सुखें असो स्वामी । औदासीन्य तुमचे तुम्ही । मिरवत असतां सर्व धर्मीं । आम्हां हृत्पद्मीं तें न वसो ॥८३॥निरपेक्षत्वें तुमची प्रीति । कोठें न गुंतो श्रीपति । आम्हां तव पदकंजरति । असो निश्चिती अनुरागें ॥८४॥माझ्या ठायीं बाह्यविषयें । म्हणाल माझी प्रीति नाहीं । आत्मनिरत सर्वदाही । वरिल्या कायी फळलाभ ॥३८५॥तरी तव चरणींचा अनुराग । हें अनंतजन्मींचें सुकृतभाग्य । उत्कृष्ट लाभ हाचि चांग । याहूनि भाग्य नापेक्षूं ॥८६॥जरी तूं विश्ववृद्धीकारणें । अल्प वेंठसी रजोगुणें । तैं या त्रिजगा सुखपारणें । अल्प कारुण्यें औत्कंठ्यें ॥८७॥तैसा होत्साता जरी मातें । अवलोकिसी आपाङ्गपातें । याहूनि वरिष्ठ सुख कोणतें । माझे चित्तें न मनिजे ॥८८॥तेचि तुझी परमानुकंपा । अत्युत्कृष्ट अनुग्रहरूपा । या वेगळें मम संकल्पा । मन्मथबापा न रुचों दे ॥८९॥जरी तूं निरपेक्ष उदासीन । तथापि तव पदीं मम मन लेन । सप्रेम रंगें रंगो पूर्ण । इतुकें वरदान पुरे आम्हां ॥३९०॥तूं सर्वदा आत्मनिरत । माझें तव पदीं मानस रत । असो अनन्य भ्रमरवत । अनुरागवंत जगदीशा ॥९१॥ऐसीं भगवंताचीं वचनें । भगवंताच्या प्रेमसंमानें । वाखाणिलीं रुक्मिणीनें । तत्तोप श्रवणें उपजाव्या ॥९२॥यानंतरें प्रसन्नचित्ता । संमत हरीच्या मनोगता । होवोनि वदली विदर्भदुहिता । तें कुरुनाथा अवधारीं ॥९३॥नैवालीकमहं मन्ये वचस्ते मधुसूदन । अम्बाया इव हि प्रायः कन्यायाः स्याद्रतिः क्वचित् ॥४७॥स्वामे बोलिले जियेपरी । लटकी नोहे ते वैखरी । कन्या असतां जनका घरीं । भूपा अंतरीं कामिती ॥९४॥अंबा अंबिका अंबालिका । तिघी काशीस्वराच्या कन्यका । त्यांमाजी शाल्वाच्या अभिलाखा । अंबा करिती जाहले ॥३९५॥तिये अंबेचिये परी । कन्या असंस्कृता जनकाघरीं । वर वांछी ते स्वयंवरीं । अभ्यंतरीं अनुरूप ॥९६॥क्कचित् कोठें कोठें ऐसी । कन्या असंस्कृता जनकाघरीं । वर वांछी ते स्वयंवरीं । अभ्यंतरीं अनुरूप ॥९७॥भगवद्वचना देऊनि मान । इतुकें केलें उपपादन । याहूनि कांहीं बोलिली आन । तें सर्वज्ञ परिस तूं ॥९८॥व्यूढायाश्चापि पुंश्चल्या मनोऽभ्येति नवं नवम् । बुधोऽसतीं न बिभृयात्तां बिभ्रदुभयच्युत ॥४८॥म्हणे स्वामी अद्यापिवरी । चैद्यमागधप्रमुखां वरीं । हेही स्वामींची वैखरी । जनव्यवहारीं वर्ततसे ॥९९॥एकें पर्णून आणिली घरा । जे पुंश्चळी असती दारा । नव नव यूनां देखोनि नरां । विकार अंतरामाजी उठती ॥४००॥पर्णित पुरुष असतां शेजे । मानसें नव नव तरुणां भजे । सज्ञान पुरुष तीतें उमजे । मानी ओझें भरणादि ॥१॥भरण पोषण तीचें न करी । त्यागी जाणोनि दुराचारी । विषयसुखास्तव न टाकी दुरी । तो अधिकारी नरकाचा ॥२॥सज्ञान जाणोनि तिची चर्या । तत्काळ त्यागी पुंश्चळी जाया । तदासक्त तो लोकद्वया । पासोनि पतन पावतसे ॥३॥जनांमाजी क्कचित् वर्ते । म्हणोनि वोलिलें श्रीअनंतें । येर्हवीं मद्विषयीं अघडतें । सर्वज्ञातें विदित असे ॥४॥माझें नव नव पुरुषांवरी । मानस धांवत असेल जरी । जाणोनि सर्वज्ञ अंतरीं । मग मज बाहेरी घालावें ॥४०५॥अपराध नसतां प्रेमकलहें । स्वामी वदलां कठोर जें हें । तें भेदतां वज्रप्रायें । पुढती स्नेहें सान्तविलें ॥६॥जाणोनि सान्तवनाचें प्रेम । मीही वदलें जें समविषम । त्या नर्मोक्ति कुसुमासम । दुरुक्ति अधम न मानाव्या ॥७॥कामसंभ्रमामाझारी । दंपती वदतां नर्मोत्तरीं । आनंदभरित ते परस्परीं । रोष अंतरीं न स्पर्शे ॥८॥यालागीं उच्चावचें वचनें । सर्व क्षमावीं जनार्दनें । इतुकी प्रार्थना करूनि मौनें । चरण लक्षूनि तिष्ठतसे ॥९॥हें ऐकूनि जगदीश । भीमकीचें मनःसारस । निर्भय पावावया संतोष । बोले पीयूषमय वचनें ॥४१०॥श्रीभगवानुवाच - साध्व्येतच्छ्रोतुकामैस्त्वं राजपुत्रि प्रलंभिता । मयोदितं यदन्वात्थ सर्व तत्सत्यमेव हि ॥४९॥हरि म्हणे वो साधुशीले । पतिव्रते भीष्मकबाळे । विनोदवचनें तवमुखकमळें । उपहास केले परिसावया ॥११॥तुवां बोलावें मृदुतर वचनीं । गुणलावण्यचातुर्यखाणी । तववाक्यश्रवणाची शिराणी । आमुचे मनीं बहुकाळ ॥१२॥यालागीं आजि ये विलाससमयीं । नर्मोक्ति वदलों ज्या ज्या कांहीं । ते ते प्रेमसंरंभनवाई । नेणोनि हृदयीं भंगलीस ॥१३॥मग म्यां केलें सान्तवन । तेणें होवोनि निर्भय पूर्ण । तुझें यथोचित भाषण । तें यथार्थ व्याख्यान मान्य आम्हां ॥१४॥माझिया वचनामाजील अर्थ । तुवां वाखाणिला अन्वर्थ । तो तैसाचि होय हें यथार्थ । जाण निश्चित भीमकिये ॥४१५॥राजपुत्रि या संबोधनें । भीमकी सम्मानिली बहुमानें । यावरी बोले प्रसन्नमनें । तीं हरिवचनें अवधारा ॥१६॥यान्यान्कामयसे कामान्मय्यकामाय भामिनि । संति ह्येकांतभक्तायास्तव कल्याणि नित्यदा ॥५०॥माझ्या ठायीं एकान्तभक्ता । भववैभवीं पूर्ण विरक्ता । जे जे काम कामिसी आतां । ते ते तत्त्वतां सफळचि ॥१७॥कामकामी जे जे जीव । जन्ममरणें भोगिती भव । ते मोक्षाचें नेणती नांव । झणें हा भाव मनीं धरिसी ॥१७॥ एकान्तभक्ता माझे ठायीं । तुझे काम जे जे कांहीं । ते सफळचि सर्वदाही । हे नवाई मद्भजनीं ॥१८॥कामनिवृत्तिकारणें । मज कामिलें कामचि जाण । मोक्षीं समरस करिती पूर्ण । हें महिमान मत्कामीं ॥१९॥प्रेमसंंभें सकोपिनी । जाणोनि संबोधी भो भामिनी । कोपनिवृत्ति झालिये क्षणीं । म्हणे कल्याणि भीमकिये ॥४२०॥तुझेनि त्रिजगाचें कल्याण । ते तूं ऐकोनि उपहासवचन । हृदयीं झालीस परमोद्विग्न । असमाधान मानूनी ॥२१॥तुझिया उक्तिश्रवणासाठीं । आम्ही वदलों उपहासगोठी । जाणोनि विषाद न धरीं पोटीं । म्हणे जगजेठी तें ऐका ॥२२॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP