मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५९ वा| श्लोक २१ ते २५ अध्याय ५९ वा आरंभ श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४६ अध्याय ५९ वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर तद्विसर्गात्पूर्वमेव नरकस्य शिरो हरिः । अपाहरद्गजस्थस्य चक्रेण क्षुरनेमिना ॥२१॥शूळप्रेरणापूर्वींच कृष्णें । क्षुरपर्वें सुदर्शनें । गजस्था नरकासुराचें यत्नें । शिर छेदून उडविलें ॥१४॥बालार्ककोटिप्रभाभासुर । सुदर्शनचक्र सहस्रार । क्षुरपर्वतीक्ष्णधार । लागतां प्रहार तयाचा ॥३१५॥शिर उडालें गगनोदरीं । कबंध पडिलें पृथ्वीवरी । विमानीं देखिलें सुरवरीं । कवणेपरी तें परिसा ॥१६॥सकुण्डलं चारुकिरीटभूषणं बभौ पृथिव्यां पतितं समुज्ज्वलम् ।हाहेति साध्वित्यृषयः सुरेश्वरा माल्यैर्मुकुंदं विकिरंत ईडिरे ॥२२॥अभेद वज्र किरीटमूर्ध्नि । अनर्घ्य जडित श्रवणीं । गण्ड मंडित उभयकर्णीं । भासुर सुरवर विलोकिती ॥१७॥भुजंग भंगूनि भूतळवटीं । खगेन्द्र संचरे गगनपृष्ठी । पुन्हा झेंपावे जगजेठी । तेंवि भूतटीं उतरले ॥१८॥विमानीं देखोनि सुरवरीं । दिव्यलोचनीं ऋषीश्वरीं । पुष्पवृष्टि कृष्णावरी । जयजयकारीं वर्षले ॥१९॥दिव्यकुण्डलकिरीटवंत । नरकासुराचा मस्तक पतित । भूमंडळीं उज्वळित । देखती दैत्यअनुयायी ॥३२०॥हाहाकार करिती असुर । म्हणती भ्मला भौमासुर । शेष यूथप पलायनपर । रडती किंकर सभोंवते ॥२१॥निर्जर करिती पुष्पवृष्टि । साधु म्हणती सुखसंतुष्टि । आशीर्वादप्रणितमुष्टि । मंत्राक्षतांच्या मुनिहस्तें ॥२२॥गगनीं लागल्या सुरदुंदुभि । दिव्यपताका फडकती नभीं । सुमनवृष्टीचा सुगंध सुरभि । पंकजनाभीवरी वर्षे ॥२३॥दैत्यदानवां महापळणी । भौमपरिवार विलपे रणीं । निर्जर मुनिवर नाना स्तवनीं । कृष्णालागूनि स्तविताती ॥२४॥ऐसिये समयी भौममाता । भूमिदेवी सशोक मुदिता । येऊनि भेटली श्रीभगवंता । तें गुरुनाथा अवधारीं ॥३२५॥ततश्च भूः कृष्णमुपेत्य कुंडले प्रतप्तजांबूनदरत्नभास्वरे ।सवैजयंत्या वनमालयाऽर्पयत्प्राचेतसं छत्रमथो महामणिम् ॥२३॥तनयभंगें शोकाकुळा । स्वामिदर्शनें आह्लाद बहळा । सवेग येऊनि कृष्णाजवळा । विनीत गोपाळा भेटली ॥२६॥सत्यभामारूपें आपण । कृष्णेसहित अवलोकून । म्हणे त्वां पाळिलें मम प्रार्थन । वधिला नंदन मम प्रेमें ॥२७॥कुण्डलें अदितीचीं भास्वरें । ललामरचितें दिव्य रुचिरें । जियें जाम्बूनदकार्तस्वरें । कुशलत्वष्टारें निर्मिलीं ॥२८॥वैजयंतीवनमाळेसहित । कृष्णा अर्पिती झाली त्वरित । वरुणच्छत्र अत्युद्भुत । अमृतस्रावी समर्पिलें ॥२९॥तैसाचि अर्पिला महामणि । स्वतेजें लाजवी जो दिनमणि । मंद शिखररत्नखाणी । मेर्वंश म्हणोनि वजमय ॥३३०॥इत्यादि अनेक रत्नसंपत्ति । समर्पूनियां कृष्णाप्रति । बधाञ्जळि नम्र क्षिति । स्तविती झाली तें ऐका ॥३१॥अस्तौषीदथ विश्वेशं देवीदेववरार्चितम् । प्रांजलिः प्रणता राजन्भक्तिप्रवणया धिया ॥२४॥बुद्धिपूर्वक प्रेमभरिता । कृष्णचरणारविंदीं प्रणता । स्तविती झाली मंगलमाता । कुरुभूकान्ता तें ऐक ॥३२॥अकारमात्रामुकुरान्तरीं । स्फारिली जितुकी दृश्य लहरी । बुद्ध्यादि उदान चक्षु वेह्रीं । परादि व्यापारीं श्रुतिगदिता ॥३३॥समष्टिकारण देवतामापें । उमाणितां सत्य संकल्पें । शब्दस्पर्शरसगंधरूपें । विश्व या पडपें ठी केली ॥३४॥तया विश्वाचें ईशितव्य । जया आंगीं वर्ते सर्व । म्हणोनि विश्वेश ऐसें नांव । बोलती सर्व सुरवर्य ॥३३५॥तयासुरवरपूज्याप्रति । अनन्यभावें स्तविते क्षिति । क्षणैक सावध होऊनि श्रोतीं । श्रवण परीक्षितीसम कीजे ॥३६॥भूमिरुवाच - नमस्ते देवदेवेश शंखचक्रगदाधर । भक्तेच्छोपात्तरूपाय परमात्मन्नमोऽस्तुते ॥२५॥देव म्हणिजे द्योतमान । अमळ अबाधित वास्तव ज्ञान । भूत भविष्य वर्तमान । नोहे कालीन आधुनिक जें ॥३७॥कालकलनेचा प्रवाह । त्रिकालीन जो तदनुभव । केवळ कालज्ञानोद्भव । नव्हे तो वास्तव तव बोध ॥३८॥तस्मात्स्वबोधें द्योतमान । देव ऐसें त्या अभिधान । त्या देवांचा देव पूर्ण । त्या तुज नमन देवदेवा ॥३९॥निःस्वासोद्भव वेदजनन । यथापूर्व विधिविधान । ब्राह्मण निगमकर्माचरण । प्रणवप्रसवन जें केलें ॥३४०॥तदाचरणें त्रिविध फळ । इष्टानिष्ट मिश्र केवळ । प्रकटी त्रयीविद्या प्राञ्जळ । जें कां मूळ त्रिभुवना ॥४१॥अभीष्टसुकृतभोक्ते दैव । मिश्रफळभोक्ते मानव । अनिष्टकर्मफळासि जीव । तिर्यक सर्व तामिस्र ॥४२॥ऐसी स्वधर्मसंस्थापना । भंगावया दानव विघ्ना । करिती तेव्हां संरक्षणा । साधुपालना अवतरसी ॥४३॥देव सांगती गार्हाणें । आविष्करसी तदभिमानें । यालागीं देवेश या संबोधनें । तुज कारणें मी नमितें ॥४४॥स्वधर्मसेतु भंगिती दैत्य । तयांचा करावया निःपात । शंखचक्राब्जगदाभृत । हा नामसंकेत मी नमितें ॥३४५॥वेदत्रयीच्या कर्माचरणें । फलभोगार्थी तिन्ही भुवनें । तें कर्म नसतां तुजकारणें । रूपा येणें भक्तेच्छा ॥४६॥भक्तेच्छोपात्तरूपाय । म्हणोनि नमितें तुझे पाय । यावरी वास्तव जैसें होय । ते स्मरोनि सोय भू नमिते ॥४७॥पंचकोशातीत परम । चित्सुख सन्मात्र निःसीम । सर्व सर्वग पुरुषोत्तम । तो पूर्णकाम मी नमितें ॥४८॥परात्पर जो मायातीत । तो परमात्मा अनुस्यूत । अखिलात्मकत्वें ओतप्रोत । तो भगवंत मी नमितें ॥४९॥राया कुरुकुलव्यंजकमुकुरा । पूर्वीं कुन्तीनें श्रीधरा । स्तविलें त्याचि जपोनि मंत्रा । नमिते धरा तें ऐक ॥३५०॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP