मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५९ वा| श्लोक २६ ते ३० अध्याय ५९ वा आरंभ श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४६ अध्याय ५९ वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने । नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रये ॥२६॥तुझी प्रपितामही जे कुंती । तिनें ज्या मंत्रें श्रीपति । प्रसन्न केला तो मंत्र क्षिति । जपूनि स्तविती पदनमनें ॥५१॥जयाचिया नाभिपद्मा । पासून जन्मला रजात्मक ब्रह्मा । तेणें सृजिलें ब्रह्माण्डधामा । रूपनामात्मक विश्व ॥५२॥त्या तुज जगत्कारणा नयन । तूं त्रिजगाचें उपादान । भूतमौतिकां अधिष्ठान । तुजवीण आन असेना ॥५३॥पंकजमयी माला कंठीं । वाहसी तयेची ऐसी गोठी । सत्कीर्तिपराग ब्रह्माण्डघटीं । धवलित सृष्टि तव यशभा ॥५४॥अमळकोमळपंकजनेत्र - । मंडित ध्याती जे तव गात्र । ते स्वसुखाचे होती पात्र । एवं पवित्र तव ध्यान ॥३५५॥पदतल रातोत्पलवत् मृदुल । जेथ सश्रीक सुचिह्नमेळ । आमोघवेधें सत्प्रेमळ । अलिउळ गुंजारव करिती ॥५६॥इत्यादि चतुर्थ्यंत नामीं । अर्थेंसहित हृदयपद्मीं । चिंतूनि प्रभूतें वसुधा नमी । तें मुनिवाग्मी निरूपी ॥५७॥पुढती काय इळादेवी । नमूनि भगवंतातें स्तवी । श्रोतीं व्युत्पत्ति ते आघवी । स्वस्थ परिसावी हरिगरिमा ॥५८॥नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय विष्णवे । पुरुषायाऽऽदिबीजाय पूर्णबोधाय ते नमः ॥२७॥नमो भगवंता तुजकारणें । निरतिशयानंद ऐश्वर्यगुणें । विराजमान पूर्णपणें । वास्तव वयुनें मत्प्रणति ॥५९॥निरतिशयानंद ऐश्वर्य । यास्तव सर्वभूताश्रय । अखिलाद्यत्वें निवासमय । वासुदेवाय नमो नमः ॥३६०॥अखिल ब्रह्माण्डें व्यापून । व्याप्यव्यापकत्वें न होतां भिन्न । शुद्ध शाश्वत सनातन । विष्णवे नमन एतदर्थें ॥६१॥म्हणसी परिच्छिन्न मी देहधारी । जन्मलों वसुदेवाचे जठरीं । सर्वभूताश्रय मम शरीरीं । न घडे निर्धारीं व्यक्तत्वें ॥६२॥सर्वाश्रयत्व कोठून कैसें । माझ्या ठायीं लक्षिलें असे । ऐसें म्हणिजेल आदिपुरुषें । तरी विश्वेशें परिसावें ॥६३॥सर्वत्र कार्यापासूनि पूर्वीं । सन्मात्रत्व श्रुतिगौरवीं । प्रतिपादिलें तें पुरुषनांवीं । लक्षूनि उर्वीं नमो म्हणे ॥६४॥सर्व सर्वग सर्वात्मक । सन्मात्र अभेद अद्वय एक । तो तूं पुरुष श्रुतिवाचक । जाणोनि निष्टंक भू वंदी ॥३६५॥हेंही कैसें घडेल म्हणसी । तरी जगत्कारणें प्रधानेंसीं । त्या सर्वांतें जें प्रकाशी । सत्तायोगेंसीं आदिबीज ॥६६॥तया आदिबीजात्मका तूतें । जाणोनि नमिलें म्यां निरुतें । उपादान या प्रपंचातें । तुजवीण येथें असेना ॥६७॥म्हणसी घटमठादिकार्यांप्रति । उपादान केवळ माती । जड अचेतन याचि रीती । त्वां मजप्रति जाणितलें ॥६८॥ऐसें न म्हणावें गोपाळा । मृदादि उपादानां सकळां । जडत्व असतां कार्यमेळा । प्रकट केला कर्त्यानें ॥६९॥निमित्त कर्तृकारणाविण । मृदादिकारणा अनुपकरण । संविन्मात्र स्वबोधपूर्ण । तूं सर्वज्ञ सर्वदृक् ॥३७०॥प्रधानादि कारणें जडें । कार्यें प्रसवती तव उजिवडें । अन्यकरणापेक्षा पडे । हें प्राकृत कोडें तुज नाहीं ॥७१॥जरी सर्वोत्कृष्ट कारणांपूर्वीं । असणें माझें बोलसी उर्वी । तरी त्या असणियांचें कारण केंवी । प्रतिपादिसी तें सांग ॥७२॥ये शंकेच्या परिहरणीं । प्रभूतें नमूनि बोले धरणी । श्लोकोक्त सातां विशेषणीं । तें सज्जनीं परिसावें ॥७३॥अजाज जनयित्रेऽस्य ब्रह्मणेऽनंतशक्तये । परावरात्मन्भूतात्मन्परमात्मन्नमोऽस्तु ते ॥२८॥कार्यरूपें जायमान । त्यासी कारण असे आन । तूं अज अव्यय सनातन । अकारण अनादि ॥७४॥तुझिया योगसत्ताबळें । माया सचेत ऐसी कळे । अनंत ब्रह्माण्डांचिये माळे । गुण प्रसवोनियां गौण रची ॥३७५॥तस्मात् तूंचि या जनयिता । अजत्वें अनादि अकारण असतां । कारणाकारणद्वयसंकेता । श्लोकोक्त हेतुद्वय बोधी ॥७६॥ब्रह्मणे या विशेषणें । बृहत्वात् ब्रह्म तूंतें म्हणणें । अनादि अजत्व प्रतिपादणें । तुजकारणें या हेतू ॥७७॥अज असतां सृजन कैसें । जनयितृत्व केंवि दिसे । तरी अनंतशक्तये या विशेषणवशें । प्रतिपाद्य असे निगमोक्त ॥७८॥बृहत्वास्तव अजस्व सिद्ध । तैसेंच जनयितृत्वही विषद । अनंतशक्तित्वें प्रतिपाद्य । एवं अविरोध मम नमन ॥७९॥परावरात्मन् ऐसिया पदें । संबोधिलें वाक्यें विशदें । येथींचा अर्थ श्रीमुकुन्दें । अखिलकोविदें आणिजेत ॥३८०॥पित्यापासून पुत्र झाला । पित्यातें आजा प्रसवला । आज्यालागून पणजा व्याला । प्रसवे पणज्याला निपणजा ॥८१॥एवं ओषधीपासूनि अन्न । अन्न अन्नापासोनि रेत उत्पन्न । रेत रुधिर परिणमोन । पुरुष उत्पन्न होतसे ॥८२॥तिया ओषधि भूसंभव । पर्जन्यें बीजप्रादुर्भाव । तेजोनिळें जलवर्षाव । पर्जन्य नांव त्या होय ॥८३॥पंच भूतां प्रसवे नभ । तेथें कारण काळक्षोभ । एवं अष्टधाप्रकृतिकोंभे । परावरात्वें तुज कथुला ॥८४॥एवं अष्टधा प्रकृति जड । परावरत्वें कथिली रूढ । तीमाजि आत्मत्वें जो उघड । प्रकाश सुघड चिदाभास ॥३८५॥ऐसा अनुगत तव प्रकाश । वेदान्तवाच्य चिदाभास । जीवशब्दें बोलिजे ज्यास । स्वकर्मास जो भोक्ता ॥८६॥स्वकर्मद्वारा फलानुरूप । भोगणें घडे पुण्यपाप । सुरनरतिर्यग्योनि अमूप । कृतसंकल्प परावर ॥८७॥जरी तूं म्हणसी तमादि त्रिगुण । विश्वसृजनादिहेतु जाण । गुणत्रयासही कारण । प्रसवे प्रधान प्रसिद्ध ॥८८॥पुरुष प्रधान क्षोभक । तोही काळनैमित्तिक । येथ माझा स्तवनघोक । कोण विवेक करावया ॥८९॥ऐसें न म्हणावें गोपाळा । यदर्थीं स्वमुखें प्रार्थीं इला । तो तूं परिसें कुरुनृपाळा । हेत्वर्थ सरळा ये श्लोकीं ॥३९०॥त्वं वै सिसृक्षू रज उत्कटं पभो तमो निरोधाय बिभर्ष्यसंवृतः ।स्थानाय सत्त्वं जगतो जगत्पते कालः प्रधानं पुरुषो भवान्परः ॥२९॥पूर्वश्लोकींचें अंतिम पद । तेंचि वाखाणावया विशद । इये श्लोकीं शुक कोविद । कारणानुवाद वाखाणी ॥९१॥विश्वसृजनाकारणें । तूंचि उत्कट रजोगुणें । अवगोनि करिसी अनेक सृजनें । प्रवृत्तिभानें नावरितां ॥९२॥तया विश्वाचा संस्थितिहेतु । त्वत्कृत प्राचीन स्वधर्मसेतु । तत्पालन सत्ववंतु । आविर्भूत सत्त्वात्मा ॥९३॥तेचि वाढल्या बहुवस सृष्टि । उत्पथ अनावर देखूनि दृष्टी । तमोत्कर्षें घालिसी पोटीं । निर्मोह शेवटीं अलिप्त तूं ॥९४॥काळपुरुषप्रधानगुण । इयें कारणें भिन्न भिन्न । तुजवीण यांतें प्रकाशक आन । भो परमात्मन् कोण असे ॥३९५॥सूर्यापासूनि निघती किरण । तत्प्रकाशें धवळे गगन । तेणें विश्वा प्रवर्तन । देखणें नयनें तद्योगें ॥९६॥तया तेजाचा उपसंहार । करूनि पाहतां एक भास्कर । भास्करात्मा तूं अगोचर । तेज गोचर विषयरूप ॥९७॥भूतभौतिकां अंतर्गत । व्यंजकत्वें साक्षीभूत । पुरुष प्रधान गुण समस्त । कालनिमित्त तूं अवधारीं ॥९८॥तुझिया प्रकाशव्यंजकगुणें । करणें होतीं विषयात्मभिज्ञें । तियें निर्विषया तुजकारणें । कवण्या वयुनें अवगमिती ॥९९॥व्यष्टिगोगम्य नव्हसी म्हणों । तरी समष्टीचा जो गोगण । यासही तुझें अगोचर वयुन । तो तूं परमात्मन् परात्पर ॥४००॥मृषा आभास जडतन्मात्रें । तदभिज्ञें करणें परें । करणांसही पर मानस खरें । बुद्धि निर्धारें मनःपरा ॥१॥बुद्धीहूनि जो परात्पर । तो तूं परमात्मा अगोचर । कार्य कारण सृष्टिप्रकार । तुजमाजी अपर तो कैंचा ॥२॥वास्तव आत्मा अद्वितीय । तेथ कैंचा व्यतिरेकान्वय । ये श्लोकीं तो अभिप्राय । भू वदताहे तें ऐका ॥३॥अहं पयो ज्योतिरथानिलो नभो मात्राणि देवा मन इंद्रियाणि ।कर्ता महानित्यखिलं चराचरं त्वय्यद्वितीये भगवन्नयं भ्रमः ॥३०॥आधाररूपा जे कां मही । तिये मज पृथक्सत्तत्व नाहीं । आपोमात्रा अमृतमयी । तुजवीण कायी पृथक् असे ॥४॥रसाकर्षण अभिवर्षण । कर्ता आदित्य जो पर्जन्य । तिये ज्योतीस अधिष्ठान । नसे तुजवीण जगदीशा ॥४०५॥अनिलचलनें ज्योति झळके । तेणें लखलखितां पावकें । शोषणें वर्षणें पचनात्मकें । होती अशेखें तव सत्ता ॥६॥एवं भू जल अनळानिळ । गगनगर्भीं साळुमाळ । तया गगना कोण स्थूळ । तुजमाजी केवळ त्यां वसती ॥७॥पंच भूतें इथें पृथगाकारें । शब्दस्पर्शादिकें तन्मात्रें । प्रकटलीं तामसें अहंकारें । सबाह्यान्तरें तूं त्यांत ॥८॥वाक् आणि पादोपस्थ गुद । कर्मेंद्रियांचे पांचही भेद । श्रोत्र त्वक् चक्षु रसना घ्राण विशद । इयें प्रसिद्ध ज्ञानेंद्रियें ॥९॥प्राणापानादि चेष्टाकरणें । पंधरा प्रकाशती रजोगुणें । तुजवीण यांचें होणें जाणें । कोणें कोणें म्हणिजेल ॥४१०॥दोल[अवमार्ल वरिं दस्र । हव्यवाहन इंद्रोपेन्द्र । प्रजापति निरृति हें सुरचक्र । कैचें अपर हें तुजमाजी ॥११॥अंतःकरणादि कर्तृकरणें । विष्णुशशाङ्ककमलासनें । नारायणें गौरीरमणें । पंचधाभिन्नें अधिष्ठिलीं ॥१२॥एवं त्रिगुणात्मकें कार्यें । त्रिधा अहंकारें विराटमयें । तो अहंकार तुजमाजी काय । वर्तता होय पृथक्त्वें ॥१३॥अहंकाराचें कारण । ज्यासी महत्तत्त्व हें अभिधान । त्यातें प्रसवें अव्यक्त जाण । इत्यादि कारणपरंपरा ॥१४॥एवं उपक्रमोपसंहार । बोधप्रवृति श्रुतिगोचर । येथ तूं अद्वितीय अगोचर । हा विचार भ्रम अवघा ॥४१५॥जैसी उकारमात्रेमाजी । विक्षेपवयुनें स्वप्नराजी । तैजस अवगमी ते प्रबोध उमजीं । भ्रमावांचूनि साच असे ॥१६॥तेंवि तूं सच्चिदानंद अद्वितीय । तेथ प्रपंचभ्रम हा मायामय । एवं तूंचि व्यतिरेकान्वय । भ्रमाचा लय तव बोधीं ॥१७॥एवंविधा जगदीश्वरा । नमनें स्तवनें प्रार्थूनि धरा । भौमासुराचिया कुमरा । अभय श्रीधरा याचीतसे ॥१८॥विनीतभावें करूनि विनते । प्रसन्न केला कमकापति । मग भौमपुत्र धरूनि हातीं । निरोवी क्षिति तें ऐका ॥१९॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP