मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५९ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ५९ वा आरंभ श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४६ अध्याय ५९ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर तस्याऽऽत्मजोऽयं पादपंकजं भीतः प्रपनार्तिहरोपसादितः ।तत्पालयैनं कुरु हस्तपंकजं शिरस्यमुष्याखिलकल्मषापहम् ॥३१॥शरणागताचा दुःखपरिहार । करी तो प्रपन्नार्तिहर । साभिप्राय जगदीश्वर । धरा मधुर संबोधी ॥४२०॥भो भो प्रपन्नार्तिहरणा । नरकात्मज हा तुझिया चरणा । शरण पातला यावरी करुणा । करूनि सर्वज्ञें रक्षावा ॥२१॥तस्यात्मज हा त्याचाचि पुत्र । म्हणूनि नरकाहूनि नरकतर । तरी हा तैसाचि हें साचार । तथापि विचार अवधारीं ॥२२॥तुझिया काळचक्रापुढें । असुर प्रतापी न वाढे । गेले हिरण्याक्षाएवढे । किती ते तोंडें कोण वदे ॥२३॥रज्तमात्मक आसुरी प्रकृति । सुरविरोधी जन्मप्रभृति । जातिनिसर्गें जे दुष्कृति । दैत्याराति तव नामें ॥२४॥करिकेसरिनिसर्गवैर । धेनुव्याघ्र मत्स्यधीवर । धूर्तकुरंग बिडाळउंदिर । तैसा श्रीधर दैत्यारि ॥४२५॥प्रत्यक्ष भौमासुरमर्दन । करूनियां मारिलें अपार सैन्य । मी तंव नरकाचा नंदन । मजलागून हरि कां न मरी ॥२६॥सहजजातिनिसर्गवैर । विशेष शत्रूचा मी कुमर । मजला देखतांचि श्रीधर । करील संहार तत्काळ ॥२७॥ऐसी भयाची कणकणी । पितृशोकार्त अंतःकरणीं । म्हणोनि म्यां तुझिये चरणीं । प्रविष्ट केला प्रपन्न ॥२८॥तूं तंव प्रपन्नार्तिहर । हा तव बिरुदाचा बडिवार । तरी याचे मस्तकीं अभय कर । ठेवोनि किंकर पाळीं हा ॥२९॥जन्मला नरकासुराच्या कुसीं । म्हणसी केवळ कल्मषराशि । तरी अभय हस्त त्वां ठेविजे शिशीं । अखिल अघांसी तूं हंता ॥४३०॥तुझिया शंतम करारविंदें । पावन होती अधिष्ठवृंदें । यालागीं भगदत्त हा मुकुन्दें । अभयवरदें पाळावा ॥३१॥मजवरी करूनि पूर्ण स्नेह । माझ्या तनयाचा हा तनय । वरदहस्तें देऊनि अभय । कृपानुग्रहें पाळावा ॥३२॥बादरायणि म्हणे राया । हे भूप्रार्थना ऐकोनियां । भगदत्तावरी केली दया । परिसा तिया व्याख्याना ॥३३॥श्रीशुक उवाच - इति भूम्याऽर्थितो वाग्भिर्भगवान्भक्तिनम्रया । दत्वाऽभयं भौमगृहं प्राविशत्सकलर्द्धिमत् ॥३२॥इत्यादि मधुरवाणीकरून । धरादेवीनें श्रीभगवान । पूजिला भक्तिप्रेमें पूर्ण । कृपेनें सकर्ण कळवळिला ॥३४॥धरादेवीनें धरूनि हातीं । बद्धाञ्जली विनीतभक्ति । नयन स्रवती अश्रुपातीं । सस्वेदकान्ति रोमाञ्चित ॥४३५॥ऐसा भगदत्त कृष्णचरणीं । नेवोनि घालिती झाली धरणि । अभय देऊनि पंकजपाणि । स्पर्शोनि मूर्ध्नि उठविला ॥३६॥भगदत्त म्हणे श्रीगोपाळा । मनुष्यनाट्यें दाविसी लीला । धर्मस्थापक सुरमुनिपाळा । अवतारमाळा युगीं युगीं ॥३७॥भो भो सर्वात्मक सर्वगा । चराचरात्मा तूंचि अवघा । शत्रु मित्र सुरासुरवर्गा । भेदविभागा कैं ठाव ॥३८॥तथापि धर्मोच्छेदक दैत्य । तद्वधाचें मुख्य कृत्य । यालागीं अवतार असंख्यात । सुरकार्यार्थ आंगविसी ॥३९॥प्रकृतिजनित विरोधी गुण । दैवीसंपत्ति सुरगण । आसुरी आसुर राक्षस निर्घृण । धर्मोच्छेदनकारक जे ॥४४०॥तूं उभयात्मक चैतन्य । नोहसी प्राकृत प्रकृतिगुण । तूं नेणसी भेदमान । अभेद पूर्ण जगदात्मा ॥४१॥सत्वसंपत्ति देव भजती । रजतमें असुर विरोधिती । देहाभिमानें उत्पथमति । ते संहरती निजकर्में ॥४२॥यास्तव माझी हे प्रार्थना । नैसर्गिकां असुरां गुणां । निरसोनि रक्षीं चरणशरणा । स्वदासगणांमाजी गणीं ॥४३॥ऐसी ऐकोनि विनवणी । कृपेनें द्रवला चक्रपाणि । प्रेमें हृदयीं आलिंगूनी । स्पर्शिला मूर्ध्नि पद्मकरें ॥४४॥म्हणे तुजला येथोनि अभय । इंद्रप्रमुख अमरवर्य । तुजसीं चालती पूर्णस्नेह । राहें निर्भय निज नगरीं ॥४४५॥बोलावूनियां प्रजाजन । किंकरपार्षदसह प्रधान । भौमासुराचें भद्रासन । भगदत्तासी समर्पिलें ॥४६॥मग तेणें वंदूनि भगवच्चरण । प्रार्थूनि प्रवेशवी भौमासन । म्हणे हें स्वामींचें ऐश्वर्य भुवन । अपेक्षित धन स्वीकीजे ॥४७॥सकळ समृद्धिमंत गृह । नाहीं कोणाचा आग्रह । मजवरी करूनि पूर्ण स्नेह । वस्तुसमूह नेइजे ॥४८॥भौमसदनीं श्रीभगवान । प्रवेशला देदीप्यमान । तेथ घेतल्या वस्तु कोण । तें संपूर्ण अवधारा ॥४९॥तत्र राजेंद्रकन्यानां षट्सहस्राधिकायुतम् । भौमाहृतानां विक्रम्य राजभ्यो ददृशे हरिः ॥३३॥प्रधानामात्यपार्षदसचिव । किंकरवेष्टित वासुदेव । भौमगृहींच्या वस्तु सर्व । सादर स्वमेव अवलोकी ॥४५०॥भगदत्ताचे आज्ञेवरूनी । गृहरक्षकीं उत्कीलनीं । पृथक पृथक कोष्ठश्रेणी । कपाटें उघडोनि दाविती ॥५१॥अनर्घ्य रत्नें वैदूर्यमणि । जडित जाम्बूनदसुवर्णीं । दिव्य भूषणें त्वाष्ट्रघडणीं । भौमें स्वर्गौनि जियें हरिलें ॥५२॥तिया विशाळा मंजूषा । उघडूनि दाविती हृषीकेशा । कें ते लक्ष्मीच सुरतावेशा । स्वकान्तेंसीं तनु प्रकटी ॥५३॥अमूल्य विचित्रा वसनशाळा । अग्निधौता दिव्यदुकूळां । देखतां शक्रा सहस्रडोळां । झांपडी पडे ज्या तेजें ॥५४॥चिंतामनि गुरुत्मन्ममणि । मुक्ता माणिक्य वैदूर्यमणि । नादवेधादि स्पर्शमणि । ललामश्रेणी बहुजाति ॥४५५॥वज्र गोमेद पाच प्रवाळ । सद्गुणाढ्य इंद्रनीळ । शाळा उघडूनि रक्षकमेळ । दावूनि गोपाळ तोषविती ॥५६॥ऐसी पाहतां भौमभुवनें । तेथ देखता झाला ललनारत्नें । भौमें संगृहिलीं प्रयत्नें । समराङ्गणें करूनियां ॥५७॥राजे जिंकूनि राजतनया । शतोत्तर सोळा सहस्रें राया । भौमें ठेविल्या पर्णावया । शुभमुहूर्तीं एकसर्या ॥५८॥तेथ तें ललनाललाभुवन । देखता झाला जगज्जीवन । कन्यारत्नीं पुरुषरत्न । नयनीं देखोन वेधलिया ॥५९॥श्रोते शंका करिती येथ । शतोत्तर नाहीं श्लोकसंमत । तरी विष्णुपुराणीं प्रकट अर्थ । आजा बोलिला शुकाचा ॥४६०॥विष्णुपुराणोक्तम् - कन्यापुरे सकन्यानां षोडशातुलविक्रमः । शताधिकानि ददृशे सहस्राणि महामते ॥राजकन्या हें वदला शुक । परी त्या देवादिकांच्या सम्यक । तोही पराशरमुखींचा श्लोक । ऐकोनि निःशंक श्रवण कीजे ॥६१॥देवसिद्धासुरादीनां नृपाणां च जनार्दन । हत्वा हिंस्रोऽसुरः कन्यारुरोध निजमंदिरे ॥देवासुरगंधर्वराजा । सिद्धचारनमनुष्यराज । एवं राजकन्याचि त्या सहज । प्रतापपुंज भौम हरी ॥६२॥त्यांतें देखतां गरुडध्वजें । तेव्हां त्यांचीं हृदयकंजें । फुल्लारमान झालीं वोजें । तें कुरुराजे परिसावें ॥६३॥तं प्रविष्टं स्त्रियो वीक्ष्य नरवीरं विमोहिताः । मनसा वव्रिरेऽभीष्टं पतिं दैवोपसादितम् ॥३४॥आधींच उपवर कन्यारत्नें । विशेष दिअत्यें रोधिलीं यत्नें । तेथोनि सुटिकेच्या प्रयत्नें । सांडविलीं जीं दुःखार्तें ॥६४॥तेथ अवचित नरवीररत्ना । दैवें पाहती त्यांचे नयन । म्हणती प्रविष्ट झाला कोण । लावण्यभुवन ये ठायीं ॥४६५॥मनेंकरूनि तिहीं वरिला । म्हणती दैवें प्राप्त केला । आम्हां हा अभीष्ट पति जोडला । तरी तुष्टला जगदीश ॥६६॥भूयात्पतिरयं मह्यं धाता तदनुमोदताम् । इति सर्वाः पृथक् कृष्णे भावेन हृदयं दधुः ॥३५॥मजकारणें हा अभीष्ट पति । दैवें अनुकूळ जरी यदर्थीं । विधिही प्रेरक हो याप्रति । ऐशा भाविती पृथक्पृथक् ॥६७॥सप्रेम आस्तिक्यभावें करूनी । आपुलाल्या अंतःकरणीं । कृष्ण वरिती अवघ्या जणी । म्हणती भवानी तुष्टो कां ॥६८॥माता पिता तुटला आम्हां । वरपड्या झाल्या होतों भौमा । कृपा आली पुरुषोत्तमा । तरी नरललामा योजियलें ॥६९॥म्हणती मनोरथा पावो सिद्धी । यदर्थीं साह्य हो कां विधि । ऐसी जाणोनियां तयांची बुद्धि । करुणानिधि कळवळिला ॥४७०॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP