मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३९ वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ३९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५७ अध्याय ३९ वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर यावदवालक्ष्यते केतुर्यावद्रेणू रथस्य च । अनुप्रस्थापितात्मानो लेख्यानीवोपलक्षिताः ॥३६॥ऐकोनि कृष्णाचा संकेत । चित्तें त्यासंगें प्रस्थित । शरीरें राहिल्या तटस्थ । जैशां अचेत पुतळिया ॥२७॥चित्तें धाडूनियां कृष्णासंगें । उभ्या ठाकल्या केवळ आंगें । जनपदमांदी मुरडली मागें । रथ सवेगें अंतरतां ॥२८॥जंववरी केतु दृष्टी दिसे । तंववरी जडलीं तेथें लक्षें । जैसीं योगियांचीं मानसें । स्वरूपसमरसें स्थिरावलीं ॥२९॥सवेग मार्ग क्रमितां रथु । दृष्टिगोचर नव्हे केतु । तैं त्या धूळी गगनाआंतु । पाहती तटस्थ मुद्रिता ॥३३०॥लेप्यमूर्ति सालंकारीं । किंवा लिखितचित्रापरी । रेणु लक्षिता अंबरीं । मुद्रा खेचरी जडली त्यां ॥३१॥चिरकाळें त्या श्वासापरती । होतां चेइली जागृति । मुद्रा सोडोनि पूर्वस्थिति । विरहावर्तीं पडलिया ॥३२॥सिद्धि न पावतां योगाभ्यास । विघ्नबाहुल्यें पावे भ्रंश । जेंवि तो साधक पावे क्लेश । गोपीमानस तेंवि करपें ॥३३॥गोपी लक्षें ज्या लक्षिती । त्याची न होतां दर्शनावाप्ति । म्हणाल निष्फळ योगस्थिति । तरी हें श्रोतीं न म्हणावें ॥३४॥त्यांचें जें कां विरहदुःख । तनुमानसें कृष्णात्मक । भवभ्रमासि करूनि विमुख । कैवल्यसुखप्रद होय ॥३३५॥गोपींऐसी तन्मयता । इच्छिती सनकादि भवविधाता । त्यांचे क्लेश निष्फळ म्हणतां । वाग्देवता सकंप ॥३६॥कैशी विरहें तन्मयता । सावधान परिसिजे श्रोतां । कृष्णचेष्टितें स्मरतां गातां । नेणती वनिता उदयास्त ॥३७॥ता निराशा निववृतुर्गोविन्दविनिवर्तने । विशोका अहनी निन्युर्गायन्त्यः प्रियचेष्टितम् ॥३७॥कृष्ण न परते गेला दुरी । देखोनि निराशा बल्लवनारी । फिरत्या झाल्या ते अवसरीं । शोकलहरीं वरपडिल्या ॥३८॥प्रियतमा अद्वया यदुनायका । तच्चेष्टिता मायाकौतुका । विरहें गाती विगतशोका । कीं सशोका होत्सात्या ॥३९॥कृष्णानुगत्वें आमुच्या चेष्टा । कृष्णवियोगें लागती काष्ठा । कृष्णविरहें पात्र कष्टा । जालों अदृष्टा भोगाव्या ॥३४०॥कृष्णवेणूचिया ध्वनी । चेतना उपलभे अचेतनीं । स्वानंदभोग अंतःकरणीं । कल्पना मनीं तद्वेधें ॥४१॥कृष्ण चैतन्यच्छायामात्र । प्रकटी प्रवृत्तिप्रवाहीं गात्र । मां तो प्रत्यक्ष चिन्मात्र । केंवि स्वतंत्र करीना ॥४२॥तस्मात् प्रवृत्ति निवृत्ति । कृष्णचेष्टा सर्वभूतीं । गोपी त्या त्या स्मरोनि गाती । शोकनिवृत्तीकारणें ॥४३॥कृष्ण प्राणांचा चेष्टक । कृष्ण मनाचा तुष्टक । कृष्ण कर्मांचा पुष्टक । कृष्ण निष्टंक प्रियप्रेष्ठ ॥४४॥कृष्णभोगीं भवविराम । कृष्णसंगीं चित्सुखाराम । कृष्ण केवळ पूर्णकाम । आत्माराम जगजात्मा ॥३४५॥कृष्ण मनाचें मोहन । कृष्ण बुद्धीचें जीवन । कृष्ण केवळ चैतन्यघन । कृष्णें विण केवीं जिणें ॥४६॥प्रियतम कृष्ण ऐशा गाती । वेधें नेणती दिवस राती । असो गोपींची हे स्थिति । गेला श्रीपति तें ऐका ॥४७॥भगवानपि संप्राप्तो रामाक्रूरयुतो नृप । रथेन वायुवेगेन कालिंदीमघनाशिनीम् ॥३८॥सकलैश्वर्यसंपन्न । यालागीं सर्वज्ञ श्रीभगवान । तथापि गोपी उपेक्षून । करी गमन नृपवर्या ॥४८॥भगवान म्हणिजे ऐश्वर्यवंत । रासविलासीं गोपी समस्त । अनेक होऊनि जेंवि रमवीत । तेंवि कां येथ न जाला ॥४९॥ऐश्वर्यसम्पन्नही असोन । गोपी सशोका उपेक्षून । विरहवेधें तत्कल्याण । लक्षूनि गमन स्वयें करी ॥३५०॥ज्याची तुलना न पवे पवन । ऐसा गतिमन्त स्यन्दन । रामाक्रूरश्रीभगवान । करिती गमन तद्वेगें ॥५१॥त्रिजगदघौघहंत्री यमुना । सवेग येऊनि तिचिया पुलिना । अक्रूर आदरी मध्याह्नस्नाना । कुरुभूषणा तें ऐक ॥५२॥तत्रोपस्पृश्य पानीयं पीत्वा मृष्टं मणीप्रभम् । वृक्षखण्डमुपव्रज्य सरामो रथमाविशत् ॥३९॥ते कालिंदी सुकृतजननी । आश्रयूनि तिष्ठती मुनि । उदार क्षमस्वी दृढासनी । समदर्शनी तरुरूपी ॥५३॥कल्पतरूंतें लाजविती । ऐसी ज्यांची फलसंपत्ति । तया द्रुमांचे छायेप्रति । रामश्रीमप्ति उतरले ॥५४॥तेथ ठेवूनियां स्यंदन । स्पर्शोनि कालिंदीजीवन । हस्तपाद प्रक्षाळून । केलें आचमन श्रमहारी ॥३५५॥मुक्ताफलादिरत्नप्रभा । लाजवी ऐसिया रविजाम्भा । प्राशितां रामपद्मनाभा । पथक्लमाभा विरमली ॥५६॥अगाधत्वें शीतळतर । मृष्ट निर्मळ रत्नाकर । सुखकर सुन्दर श्रेयस्कर । तें यमुनानीर प्राशिलें ॥५७॥मग जाऊणि वृक्षच्छाये । रथीं बैसते झाले स्वयें । श्रीकृष्ण आणि रोहिणीतनय । किशोरप्राय अवगमती ॥५८॥अक्रूरस्तावुपामन्त्र्य निवेश्य च रथोपरि । कालिन्द्या ह्रदमागत्य स्नानं विधिवदाचरत् ॥४०॥वक्तयामाजि चातुर्यराशि । तो शुक सांगे नृपापासीं । अक्रूर सारी आह्निकासी । कोणे विधीसीं तें ऐका ॥५९॥शत्रु धरोनि नाना व्यक्ति । रामकृष्णांतें देखोनि क्षितीं । झणें कांहीं विघ्न करिते । अक्रूराचित्तीं हे शंका ॥३६०॥यालागीं बळराम मुरारी । बैसवूनियां रथावरी । अक्रूर त्यांतें विनति करी । जननीपरी स्नेहभरें ॥६१॥माध्याह्निक विधिविधान । स्नानसंध्या ब्रह्मयज्ञ । जंव मी सारीं जपतर्पण । तुम्ही स्यंदन तंव न टका ॥६२॥ऐसें तुमचें अभयदान । होतां करीन संध्यास्नान । तथास्तु म्हणे जनार्दन । सहसा स्यन्दन न सोडूं ॥६३॥ऐसा करूनियां अनुवादु । रामकृष्ण दोघे बन्धु । रथीं बैसवूनियां सावधु । मग प्रबुद्ध चालिला ॥६४॥पूर्वीं जेथ गोपांप्रति । ब्रह्मलोकाची दर्शनावाप्ति । यमुनाह्रदीं त्या दानपति । निमज्जनार्थीं प्रवेशला ॥३६५॥हस्तपाद प्रक्षाळून । शौचविधि शुद्धाचमन । यमुनाजीवन अभिवंदून । करी मज्जन तें ऐका ॥६६॥ N/A References : N/A Last Updated : May 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP