मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३९ वा| आरंभ अध्याय ३९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५७ अध्याय ३९ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीकृष्णानाथाय नमः ॥ सज्जनचक्रचकोरचंद्रा । नमो गोविंदा देशिकेंद्रा । तुझी लाहतां वरदमुद्रा । भवसमुद्रा जड तरती ॥१॥सद्गुरुभजनीं जे अवक्र । तत्समुदाय सज्जनचक्र । त्यातें तोषक अमृतकर । अनंद सधर श्रीमूर्ति ॥२॥श्रीपदनमनमात्रें दास । देशिकेंद्रा तव आदेश । लाहतां निर्भय कळिकाळास । भवभय त्यास मग कैंचें ॥३॥ब्रह्म निर्गुण निराकार । करितां स्वगत अंगीकार । शुद्ध सत्त्वात्मक ईश्वर । कर्ता गोप्ता सर्वज्ञ ॥४॥स्वगतानुगतत्त्वें पूर्णता । तेणें उपलभे सर्वज्ञता । तैं तो एकाकी न रमतां । अनेकविधता परिकल्पी ॥५॥जडत्वें आलें सर्वज्ञपण । येर्हवीं ब्रह्मचि ईश्वर पूर्ण । एकाकी न रमे म्हणोन । शबल माया अवलंबी ॥६॥अविद्यासंभव तदुत्तर । अव्याकृत जें अज्ञानप्रचुर । तदभिमानी जो कां रुद्र । कर्ता संहार सृष्टीचा ॥७॥तया तमोगुणाचे पोटीं । सत्त्वगुणाची प्रभा उठी । विपरीत ज्ञानाची पाउटी । गोप्ता सृष्टि हरि जेथें ॥८॥तेथोनि विराट रजात्मक । जेथ ब्रह्मा त्रिजगज्जनक । जागृतावस्थाप्रकाशक । चिद्भ्रामक भवभान ॥९॥अव्याकृतीं पंचभूतें । हिरण्यगर्भीं तत्संभूतें । अंतःकरणादि समस्तें । कर्तृकरणें ज्या नाम ॥१०॥चेष्टा ज्ञान क्रिया करणें । प्रकाशूनियां रजोगुणें । भूतिविषयां अभिलाषणें । दृश्यभानें भुलोनियां ॥११॥तम प्रसवे व्यापक गगन । गगन प्रसवे सर्वग पवन । पवन प्रसवे प्रकाशमान । विश्वदीपन तेजस्वी ॥१२॥तेजापासूनि होय जळ । जळापासूनि पृथ्वी स्थूळ । पृथ्वीपासूनि भौतिकमेळ । पंचभूतात्मक बहुयोनि ॥१३॥परस्परें तो समुदाय । पंचभूतात्मक भौतिकमय । एकमेकांचें अन्न होय । परमप्रिय स्वादिष्ट ॥१४॥पंचभूतात्मक तो रस । रेत होऊनि सुरतावेश । धरितां तेथ प्रकृतिपुरुष । होती अशेष देहरूपी ॥१५॥एवं दशगुण उत्तरोत्तर । ब्रह्मापासूनियां स्थूळ शरीर - । पर्यंत जडतेचा विस्तार । जाणती चतुर तत्त्ववित् ॥१६॥ऐसा चिज्जडग्रंथिमय । भवभ्रमासि जो आश्रय । तो हा जीवांचा समुदाय । भ्रमें विषयपरिबद्ध ॥१७॥मिथ्याविषय साच मानी । तदभिलाषें नानायोनि । भ्रमतां भवसिंधूचें पाणी । अगाध करूनि बुडतसे ॥१८॥ऐसे जड तव चरणा शरण । होतां निरसे मग जडपण । केवळ होती चैतन्यघन । जाती लंघोनि भवसिंधु ॥१९॥त्या तव चरणा प्रणति मात्र । करूनि कृपेसि जालों पात्र । आज्ञानियमें हरिचरित्र । कथनीं वक्त्र प्रवर्त्तविलें ॥२०॥तेथ अठतीस अध्यायवरी । वाखाणिली शुकवैखरी । अक्रूरा भेटले राममुरारी । कथा पुढारीं अवधारा ॥२१॥एकोणचाळिसाव्या आंत । मथुरे जातां कृष्णनाथ । विरहें गोपींचा आकांत । तो समस्त कथिजेल ॥२२॥आणि अक्रूरा यमुनास्नानीं । विष्णुलोक अवलोकूनी । सात्त्विक अष्टभाव होऊनी । हरिगुणस्तवनीं तो वेंठे ॥२३॥इतुकी कथा या अध्यायीं । व्यासतनयें कथिली पाहीं । भाषाव्याख्यान श्रवणालयीं । दयार्नव कथिल श्रोत्यांचे ॥२४॥पूर्वाध्यायाचे समाप्तीं । अक्रूर पूजिला परम भक्ति । ऐकोनि नंदादिकांच्या उक्ति । परम विश्रांति मानिली ॥२५॥ N/A References : N/A Last Updated : May 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP