मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३९ वा| श्लोक ६ ते १० अध्याय ३९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५७ अध्याय ३९ वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर अहो अस्मदभूद्भूरि पित्रोर्वृजिनमार्ययोः । यद्धेतोः पुत्रमरणं यद्धेतोर्बंधनं तयोः ॥६॥अपराधरहित साधुप्राय । इहीं त्याचें केलें काय । जाणोनि माझीं बापमाय । परमान्यायें जाचितसे ॥५८॥भूरि वृजिन जें परम दुःख । माझ्या वैरास्तव हा देख । देतसे करूनियां अविवेक । कारण सम्यक् मी याचें ॥५९॥मजचि कारणें यांचे पुत्र । मारिले होऊनियां अमित्र । निगडबंधादि दुःखपात्र । यातना सर्वत्र मज साठीं ॥६०॥मजचि साठीं सर्व ज्ञाति । कंसें लाविलिया दिगंतीं । प्रजा सेवक अनुचरवृत्ति । तुम्ही त्या प्रति सेवितसां ॥६१॥हें सर्वही मजचिकडे । दिसोनि येतसे पैं उघडें । यावरी पुसेन जें मी पुढें । तेंचि निवाडें निरूपिजे ॥६२॥दिष्ट्याऽद्य दर्शनं स्वानां मह्यं वः सौम्य कांक्षितम् । संजातं वर्ण्यतां तात तवागमनकारणम् ॥७॥आश्रयूनियां कंसा खळा । अक्रूरा क्रमिसी विपत्तिवेळा । सौम्य म्हणिजे सहनशीला । बुद्धिकुशळा दानपति ॥६३॥तुम्हां स्वकीयांचें दर्शन । सर्वकाळ वांछी मन । तें आजि बरव्या प्रकारें करून । जालें म्हणोनि उत्साह ॥६४॥दैवास्तव हा परमोत्साह । येथोनि जाणिजे कल्याणोदय । आतां सांगिजे कारण काय । आगमनाचें सविस्तर ॥६५॥शुक म्हणे गा अर्जुनपौत्रा । कुरुभूमंदलमंगलसूत्रा । कृष्णें पुसिलें श्वफल्कपुत्रा । तो तच्छ्रोत्रा परिसवी ॥६६॥श्रीशुक उवाच - पृष्टो भगवता सर्वं वर्णयामास माधवः । वैरानुबंधं यदुषु वसुदेववधोद्यमम् ॥८॥यत्संदेशो यदर्थं वा दूतः संप्रेषितः स्वयम् । यदुक्तं नारदेनास्य स्वजन्मानकदुंदुभेः ॥९॥कृष्णें पुसिलें मधुवंशजा । त्यामाधवें अक्रूरें अधोक्षजा । सर्व निवेदिलें बरवे वोजा । तें कुरुराजा अवधारीं ॥६७॥देवकीविवाहोत्तर प्रयाणीं । भविष्य वदली गगनवाणी । कंसा वधील तुजलागोनी । अष्टम गर्भ देवकीचा ॥६८॥तें ऐकोनी देवकीहनन । करितां वसुदेवें बोधून । कंस वारिला पुत्रार्पण । करीन म्हणोनि शपथेंसीं ॥६९॥तद्विश्वासें देवकीमोक्ष । प्रथमपुत्रार्पणें तो पक्ष । रक्षिता जाला वसुदेव दक्ष । तंव नारदें प्रत्यक्ष गुज कथिलें ॥७०॥यादव तितुके देवावतार । विष्णु तव रिपु देवकीकुमर । अचुक आठवा हा जाणोनि मंत्र । होईं सत्वर सावध तूं ॥७१॥तेथूनि यदुकुळासी वैर । चाळिता जाला कंसासुर । देवकीवसुदेव सह निज पितर । कारागार त्यां केलें ॥७२॥अष्टम गर्भाचिये काळीं । देवकीकन्या मारितां गेली । पुढें कंसाची मति खुंटली । मग सोडिलीं तीं दोघें ॥७३॥त्यावरी कंस आजिपर्यंत । विचार न सुचोनि होता भ्रांत । तंव नारद पातला अकस्मात । तेणें वृत्तांत पुन्हा कथिला ॥७४॥आनकदुंदुभीपासून । देवकीजठरीं कृष्णजनन । तेणें नंदग्रुहीं लपवून । कन्या आणूनि तुज दिधली ॥७५॥ऐसी ऐकोनि नारदोक्ति । कंस प्रवर्तला वसुदेवघातीं । मग त्या नारदें धरूनि हातीं । कथिली मुक्ति नृपवर्या ॥७६॥नीति कथूनि नारद गेला । कंसें उपाय आरंभिला । मानें पाचारूनियां मजला । व्रजपुराला पाठविलें ॥७७॥धनुर्मखाचें करूनि छद्म । आणवी सगोप कृष्णराम । किमर्थ तरी तो हननकाम । कृतसंभ्रम अवधारीं ॥७८॥द्वारीं लोटूनि महागज । वधावे बळराम अधोक्षज । दैवें वांचल्या महाभुज । रंगीं काज साधीन ॥७९॥चाणूर मुष्टिक शल तोशल । अतुलबळि हे प्रचंड मल्ल । धडकूनि विद्युल्लते तुल्य । मज निःशल्य करितील ॥८०॥ऐसे मारीन रामकृष्ण । नंदव्रजाचें सर्वस्वहरण । देवकी वसुदेव उग्रसेन । शस्त्रें वधीन स्वहस्तें ॥८१॥यदुकुळाचें खणोनि खात । मृत्युभयाचें फाडीन खत । ऐसा कथूनि मज वृत्तांत । दूतकर्मार्थ आलों मी ॥८२॥ऐसें अक्रूरें अवंचकभावें । गुह्य कृष्णासि केलें ठावें । परिसोनि साग्रज वासुदेवें । श्रुतकैतवें हांसिला ॥८३॥श्रुत्वाऽक्रूरवचः कृष्णो बलश्च परवीरहा । प्रहस्य नंद पितरं राज्ञादिष्टं विजज्ञतुः ॥१०॥अक्रूरवृत्तांत परिसोनि हरि । आणि बलराम प्रलंबारि । हांसते झाले परस्परी । टाळी करीं देवोनी ॥८४॥पाचारूनियां पिता नंद । कथिला कंसाज्ञेचा निगद । तेणें समस्त गोपवृंद । केला सावध तें ऐका ॥८५॥ N/A References : N/A Last Updated : May 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP