मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३९ वा| श्लोक २६ ते ३० अध्याय ३९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५७ अध्याय ३९ वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर मैतद्विधस्याकरुणस्य नाम भूदक्रूर इत्येतदतीव दारुणः । योऽसावनाश्वास्य सुदुःखितं जनं प्रियात्प्रियं नेष्यति पारमध्वनः ॥२६॥ऐसें याचें क्रूर कर्म । आणि या शोभन अक्रूर नाम । कोण ठेवित होता अधम । तो मूर्ख परम अविवेकी ॥११॥नाम न शोभे या सर्वथा । किमर्थ ते ऐका कथा । निर्दय निष्ठुर क्रूर पुरता । याहूनि कोणी असेना ॥१२॥अत्यंत दारुण हा घातक । अक्रूर नामा मिरवी ठक । क्रिया पाहतां जैसें विख । पक्कान्नपणें जीव घेणें ॥१३॥प्राणांहुनी प्रियतम श्रीकृष्ण । विघडूनि नेतो हा निर्घृण । दृष्टिगोचर मार्गाहून । पार लंघून दुरंत ॥१४॥कृष्णा नेतां दूरतर । प्राण सोडिती शरीर । ऐसा आम्हांसि दुःखभर । परि त्याचें अंतर द्रवेना ॥२१५॥कृष्णवियोगें दुःखित जन । काढूनि नेतो त्यांचा प्राण । कांहीं न करी समाधान । क्रूर दारुण यमाहूनी ॥१६॥ऐसिया क्रूरा अक्रूरनाम । कोण ठेवित होता अधम । द्रवों शके अंतक यम । परि हा विषम क्रूरत्वें ॥१७॥पुन्हा म्हणती या काय बोल । आमुचेंचि प्रारब्ध झालें विफळ । म्हणोनि उदेला हा काळ । कृष्णही केवळ द्रवेना ॥१८॥धिक्कार आमुच्या जीवितासी । म्हणोनि रुदती उकसाबुकसी । दुःखें करिती वितर्कासी । तें रायासि शुक सांगे ॥१९॥अनार्दधीरेष समास्थितो रथं तमन्वमी च त्वरयंति दुर्मदाः । गोपा अनोभिः स्थविरैरुपेक्षितं दैवं च नोऽद्य प्रतिकूलमीहते ॥२७॥अगे हा कृष्णचि निष्ठुर । हृदयीं न द्रवेचि अणुमात्र । देखोनि याची बुद्धि कठोर । उपेक्षापर वृद्धहि या ॥२२०॥न धरी ओलावा अंतरीं । उद्धव चढतां रथावरी । वृद्धें दुखविल्या अनादरीं । मग किमर्थ वारी कोण या ॥२१॥भंगल्या वृद्धांचें अंतर । मग ते सहजचि उपेक्षापर । येर गोप ते दुर्मदतर । जाती सत्वर शकटेंशीं ॥२२॥दैव हो कां सानुकूळ । कृष्णसंगें हा दुर्मदमेळ । जातो यावरी वीजकल्लोळ । पडोनि मरो पैं एखादा ॥२३॥महाविघ्नांचा संघात । यांवरी पडो गे अकस्मात । किंवा घडो शकटघात । कीं डंखोनि निश्चित महासर्प ॥२४॥महाविघ्नें या दुर्मदांत । एखादा जरी पावे मृत्य । त्या तरी अपशकुनें कृष्णनाथ । राहता येथ निश्चयें ॥२२५॥परी आमुचें दैव कुडें । तरी या कांहींच वो न घडे । म्हणती मृत्यु आले रोकडे । बोटें कडाडें मोडिती ॥२६॥मग परस्परें धिवसा धरिती । कृष्णा वृद्ध न राहविती । तरी लज्जा सांडोनि द्या गे परती । चाला निश्चितीं राहवूं या ॥२७॥निवारयामः समुपेत्य माधवं किन्नोऽकरिष्यत्कुलवृद्धबान्धवाः । मुकुंदसंगान्निमिषार्धदुस्त्यजाद्दैवेन विध्वंसितदीनचेतसाम् ॥२८॥निषेधू जातां सर्वांपुढें । जारसौहार्द पडेल उघडें । हें भय ठेवूनि ऐलीकडे । चाला निवाडें या वर्जूं ॥२८॥लज्जा सांडूनि दीर्घप्रयत्ना । चढोनि म्हणती सुहृदा जना । शंकोनि मुकिजे किमर्थ प्राणा । न येचि करुणा कोणासी ॥२९॥बंधुवर्गसुहृदाभेणें । लज्जेसाठीं प्राण देणें । तरीं तें कृष्णवियोगें मरणें । आम्हां कारणें आलींच कीं ॥२३०॥बंधुवर्ग काय करिती । कायसी त्यांच्या भयाची खंती । मथुरे गेलिया श्रीपति । विरहावर्तीं पडिलों गे ॥३१॥मुकुंद केवळ सुखनिधान । तत्संग दुस्त्यज प्राणांहून । आम्हां विघडणी त्यापासून । अर्धक्षण न सोसवे ॥३२॥मुकुंदसंगा जेव्हां विघडी । तेव्हांचि चित्तें होतीं वेडीं । दीनें अनाथें बापुडीं । भणगें वराडी भासती ॥३३॥जैं अंतरला मुरलीधर । तैं हें शरीर भूमिभार । आम्हां न डंखी विखार । मृत्यु समोर न ये गे ॥३४॥मागतांही मरण न ये । बंधुवर्गाचें केतुलें भय । आमुचें जिणें वांचूनि काय । यशोदातनय विघडलिया ॥२३५॥या लागीं अवघ्या होऊनि धीटा । कृष्ण लागतां मथुरे वाटा । वोढा धरूनि बाहुवटा । दवडा खोटा अक्रूर हा ॥३६॥बंधुवर्गीं निर्लज्ज उद्धटे । सोसूं जारपैशुन्यबोट । परी कृष्णवियोगाचे कष्ट । याहूनि दुर्घट न सोसती ॥३७॥यालागीं आतांचि निःशंक होणे । आणिक कृष्णातें निवारणें । ना तरी तत्कृतक्रीडास्मरणें । आलीं मरणें न मरतां ॥३८॥मरण बरवें एके घायीं । परि तें दुःख न सोसे देहीं । हृदय फुटोनि होते लाही । तें लवलाही परिसा गे ॥३९॥यस्यानुरागललितस्मितवल्गुमंत्रलीलावलोकपरिरंभणरासगोष्ठ्याम् ।नीताः स्म नः क्षणमिव क्षणदा विना तं गोप्यः कथं न्वतितरेम तमो दुरंतम् ॥२९॥ज्याचे सप्रेमसुललितपणें । भ्रूविभ्रमें हास्य करणें । त्याच्या स्मरणमात्रें मरणें । कीं जीवें प्राणें तळमळिजे ॥२४०॥रासक्रीडासभास्थानीं । हास्यवदनें चक्रपाणि । रतिरहस्यगोष्ठी वाणी । बोलिला त्या आठवती ॥४१॥त्या शब्दांची चातुर्यता । नेत्रकटाक्ष तनुइंगिता । क्षेमालिंगन चुंबन स्मरतां । केंवि जीविता सांवरवे ॥४२॥ज्याचे सुस्निग्ध अपांगपात । रासविलासीं सभे आंत । कृष्ण केला जो एकांत । तो कें चित्त विसरेल ॥४३॥क्षणा समान क्षणदा तेथें । आम्हीं क्रमिल्या ज्याच्या सुरतें । त्याच्या वियोगें कैशा येथें । धरूं प्राणांतें सखिया हो ॥४४॥प्रियतमाचा विरह घोर । केवळ दुःखाचा सागर । कीं तें अंधतम अपार । केंवि परपार पावों गे ॥२४५॥असो अंधतम निस्तरणें । रोकडेंचि वियोगमात्रें मरणें । गोचारणें गेलिया कृष्णें । म्हणाल विघडणें साहतसों ॥४६॥आमुचा वियोगें जाईल प्राण । म्हणोनि अंतरीं कळवळोन । कैसें करी प्राणतर्पण । तें संपूर्ण परिसा गे ॥४७॥योऽह्नः क्षये व्रजमनंतसखः परीतो गौपैर्विशन्खुररजश्छुरितालकस्रक् । वेणुं क्कणन्स्मितकटाक्षनिरीक्षणेन चित्तं क्षिणोत्यमुमृते नु कथं भवेम ॥३०॥आमुचे ग्लानी उताविळा । परते लक्षूनि सायंकाळा । विष्णुसंगें सुरमुनिपाळा । तेंवि गोपाळ वत्सेसीं ॥४८॥गोवत्सांचे जे खुररज । पुढें हाकितां उधळती सहज । तेणें धूसर कुंतळपुंज । सबर्हस्रज मुखकांति ॥४९॥आधींच लावण्यतनु सुनीळ । धूसर जैसें अंबर अमळ । धूळी माजी धांवे चपळ । पोटीं कळवळ करुणेची ॥२५०॥धूळी निघोनि धेनुमागें । हळूच येतां मंदवेगें । तरी कां माखती अष्टांगें । प्रेमळ प्रसंगें रज सोसी ॥५१॥ऐसा व्रजा माजीं सांजे । अनुदिनीं प्रवेशे डवरला तेजें । तैं गोपीनयनचकोरें बिजे । चंद्रदर्शनें जीव धरिती ॥५२॥व्रजीं प्रवेशलियावरी । ललितस्मितवक्त्रें श्रीहरि । ईक्षणमात्रें मानस हरी । तें अमृतलहरीं सम वाटे ॥५३॥आणि अमृतातेंही लाजवी । कैवल्यसुखासी आणी उणिवी । तेणें वेणुक्कणनें निववी । मृता जीववी विरहिणी जो ॥५४॥तो मथुरे गेलिया तैसा पुढती । न येतां आमुची कवण गति । त्याविण जीवितें केंवि राहती । हें निश्चिती सांगा गे ॥२५५॥कृष्णावांचूनि आमुचें जिणें । क्षणमात्रही राहों नेणे । कृष्णवियोगें आलीं मरणें । म्हणोनि करुणें विलपती ॥५६॥शुक म्हणे गा परीक्षिति । अलौकिक गोपींची सप्रेम भक्ति । अव्यभिचारें कमलापति । व्यभिचारमति भजिन्नल्या ॥५७॥म्हणोनि दुर्लभ आम्हां तुम्हां । गोपिकांचा भाग्यमहिमा । ज्या अनुसरल्या मेघश्यामा । पतिसुतधामा विसरोनी ॥५८॥कृष्ण जातो हें ऐकूनि रातीं । ऐशा अनेक कल्पना करिती । लज्जा सांडूनि दीर्घ रुदती । परिसें नृपति तें आतां ॥५९॥ N/A References : N/A Last Updated : May 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP