मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २० वा| श्लोक २६ ते ३० अध्याय २० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय २० वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर धेनवो मंदगामिन्य ऊधो भारेण भूयसा । ययुर्भगवताहूता द्रुतं प्रीत्या स्नुतस्तनीः ॥२६॥वनीं प्रवेशोनि श्रीहरि । स्फुरितां मंजुळ मोहरी । ध्वनिलाघवें सप्तस्वरीं । धेनु हकारी सन्निध ॥७॥अद्यापि कित्येक गोरक्षक । तेणें मार्गें अंतर्मुख । धेनु करूनि नादसुख । भोगिती निष्टंक वनवासीं ॥८॥धेनु सवत्सा नूतन । मंद चालती हुंबरून । कांसा दाटल्या दुग्धेंकरून । वोरसें स्तन पाझरती ॥९॥कृष्णमुखींचें आवाहन । सवेग धांवती परिसोन । पाहती श्रीकृष्णाचें वदन । टंवकारोन सप्रेम ॥२१०॥वनौकसः प्रमुदिता वनराजीर्मधुच्युतः । जलधारा गिरेर्नादानासन्ना ददृशे गुहाः ॥२७॥हर्षनिर्भर अंतःकरणीं । देखे वनौकसांच्या श्रेणी । वनराजी मधुश्रावणी । चक्रपाणि देखतसे ॥११॥धारावंत पाहे गिरि । गुहा गर्जती तेणें गजरीं । ऐशीं अनेक कौतुकें नेत्रीं । पाहे मुरारि ऋतुलक्ष्मी ॥१२॥वनीं प्रवेशला श्रीहरि । गोधनाचिया हुंकारगजरीं । आनंदोनि पुलिंदनारी । पाहती सादरीं सान्निध्यें ॥१३॥तैसा श्रीहरी आपुल्या नेत्रीं । कृपेनें पाहतां पुलिंदनारी । हर्षनिर्भरा शरीरीं । धन्य संसारीं मानिती ॥१४॥राजी म्हणिजे काननहारी । सन्निध येतांचि श्रीहरि । हर्षा पावोनि अंतरीं । बाह्यमधुधारीं पाझरती ॥२१५॥तैसाचि गोवर्धन पर्वत । समीप जाणूनि अनंत । अंतरीं होऊनि हर्षयुक्त । धारा स्रवत पाझर ॥१६॥तया धारांचें पतनध्वनि । भरती निकटगुहावदनीं । तेणें मुखें कृष्णस्तवनीं । गिरि तोषूनि प्रवर्ते ॥१७॥वनीं आला जाणोनि कृष्ण । सादर होऊनि पुलिंदीगण । असता झाला हर्शायमाण । हें व्याख्यान दुसरें ॥१८॥तैशीच काननपरंपरा । करिती झाली मधुपाझरा । गोवर्धनही अंबुधारा । स्रवता झाला आनंदें ॥१९॥तया धारांचा पतननाद । गुहा प्रतिशब्द करी विशद । अंतरवेत्ता श्रीगोविंद । देखोनि प्रमोद पावतसे ॥२२०॥क्कचिद्वनस्पतिक्रोडे गुहायां चाभिवर्षति । निर्विशन् भगवान् रेमे कंदमूलफलाशनः ॥२८॥कोणे एके पर्वतप्रांतीं । तिंतिड्यादि वनस्पति । त्यांचे कोटरीं निर्गम क्षिति । देखोनि श्रीपति प्रवेशे ॥२१॥सर्वत्र वर्षत पाऊस । आश्रयूनि तो निर्जल देश । कंदमूळफळातें भक्ष्य । कल्पूनि विशेष क्रीडति ॥२२॥कोठें पर्जन्याची सरी । येतां गुहामाजि हरि । प्रवेशोनि क्रीडा करी । कंदमूलफळ भक्षी ॥२३॥वनस्पतिकोटरें कपाटीं । गुहा असती त्या तळतटीं । तेथें प्रवेशोनिया जगजेठी । क्रीडे वृष्टि वर्षतां ॥२४॥दध्योदनमुपानीतं शिलायां सलिलांतिके । संभोजनीयैर्बुभुजे गोपैः संकर्षणाऽन्वितः ॥२९॥मेघ ओसरतां जला निकटीं । शिला पाहूनि गोमटी । बैसे श्रीकृष्ण जगजेठी । भवंती थाटी गडियांची ॥२२५॥दध्योदनाची शिदोरी । स्निग्ध बांधिली होती घरीं । ते काढोनि तये अवसरीं । भोजन आदरी सप्रेमें ॥२६॥संकर्षणेंशीं एकवट । प्राणसखे घेऊनि निकट । दध्योदनाचे स्वादिष्ठ । कवळ प्रविष्ट त्यां करी ॥२७॥नानारुचिकरा कोशिंबिरी । अनेक लवणशाकांच्या परी । रायतीं मेतकुटें सांबारीं । लेहन करी त्या ग्रासीं ॥२८॥नित्य वनभोजनलीले । ज्या गडियांशीं जैसा खेळे । त्यांचे तैसे पुरवी लळे । कवळें कवळें नर्मोक्ति ॥२९॥शाद्वलोपरि संविश्य चर्वितो मीलितेक्षणान् । तृप्तान् वृषान् वत्सतरान् गाश्च स्वोधोभरश्रमाः ॥३०॥रामगोपांशीं चक्रपाणि । जेवितां स्मरे अतःकरणीं । जैसें झालें वत्साहरणीं । तें ये क्षणीं झणें होय ॥२३०॥म्हणोनि गोधनां सांभाळी । तंव तीं बैसलीं शाद्वळीं । तृप्त होऊनि सुखकल्लोळीं । करिती सकळीं रोवंथ ॥३१॥वृषभ वांसुरें धाकुटीं । गोर्हे काल्हवडी पारठीं । सर्व गोधनें घाटीं मोठीं । कृपादृष्टि हरि पाहे ॥३२॥नवप्रसूता वोहाभारें । गाई श्रमतां वनसंचारें । तृप्त होऊनि कोमळचारें । अत्यादरें रोवंथती ॥३३॥दृष्टि झांकूनि विषयात्मक । योगमुद्रेनें अंतर्मुख । कृष्णध्यानीं लावूनि लक्ष । निमीलिताक्ष्ग गोधनें ॥३४॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP