मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २० वा| श्लोक ११ ते १५ अध्याय २० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय २० वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर हरिता हरिभिः शष्पैरिंद्रगोपैश्च लोहिताः । उच्छिलींध्रकृतच्छाया नृणां श्रीरिव भूरभूत् ॥११॥सार्वभौमाची जैशी लक्ष्मी । तैशी शोभती झाली भूमि । चित्रविचित्र रत्न हेमीं । वस्त्रीं सद्मीं विराजित ॥१॥हिरवीं बालतृणें लसलसित । तेणें पाचरंगीं राजित । माणिक्यरंगीं विराजित । इंद्रगोपप्राचुर्यें ॥२॥उच्छिलिंग ठायीं ठायीं । उठती तेणें शोभे मही । राजवाहिनीप्रवाहीं । जैशीं छत्रें विराजती ॥३॥कोमळ तरूंचे पल्लव । चंचळ चामरीं दाविती भाव । दुंदुभिघोषस्थानीं रव सरिताप्रसवप्रपात ॥४॥क्षेत्राणि सस्यसंपद्भिः कर्षकाणां मुदं ददुः । धनिनामुपतापं वै दैवाधीनमजानताम् ॥१२॥यथाकालीं होतां वृष्टि । सस्यें पिकलीं देखोनि दृष्टीं । आनंद कृषीवळाचे पोटीं । सभाग्य सृष्टीं मानिती ॥१०५॥वृष्टि खंडतां चांचरे पीक । तेणें सवेंचि पावती दुःख । नेणोनि अदृष्टविवेक । जैसे लोक व्यवसायी ॥६॥जलस्थलौकसः सर्वे नववारिनिषेवणात् अबिभ्रद्रुचिरं रूपं यथा हरिनिषेवया ॥१३॥जलमाजीं ज्यांचा वास । मत्स्यादि जलचर अशेष । जनकादु वल्ली तृणविशेष । ते जलौकस बोलिजे ॥७॥जळाबाहिर वनांतरीं । खेटखर्व्टीं पुरीं नगरीं । नाना जंतु चराचरीं । ते निर्धारीं स्थलौकस ॥८॥ओक शब्दें बोलिजे आलय । जलीं कां स्थळीं ज्यांचें होय । त्यांसि तैसेंचि नामधेय । जलौकसें स्थलौकसें ॥९॥ते सर्वही स्थलजलवासी । करितां नवनीतसेवनासी । पुष्टी पावती आनंदेशीं । अमरां जैसी पीयूषें ॥११०॥तेणें नवरसा रति तनु । अवयव टवटविती नूतन । रुचिररूपें शोभायमान । सुखसंपन वर्तती ॥११॥जैसा श्रीहरि जगज्जीवन । त्यातें सेविती जे जे जन । त्यांचें होय त्रितापशमन । सुखसंपन्न सहजेंची ॥१२॥संसारसंतप्त उन्हाळा । तापत्रयाच्या तीव्र ज्वाळा । तेणें आहाळणी भूतां सकळां । जीवनकळा हरिप्रेम ॥१३॥तें लाहती जे जे जीव । ते ते होती वासुदेव । सांडूनि मृत्यूचें लाघव । अमृतगौरव मिरविती ॥१४॥तैसेम नीलघनाचें कृपाजळ । सेवूनि स्थलजलवासी सकळ । रूपें निवडती सोज्वळ । परम रसाळ लावण्यें ॥११५॥सरिद्भिः संगतः सिंधुश्चुक्षुभे श्वसनोर्मिमान् । अपक्कयोगिनश्चित्तं कामाक्तं गुणयुग्यथा ॥१४॥मेघभरें महापूर । सरिता टाकिती सागर । संगमीं एकवटतां नीर । तेणें समुद्र क्षोभती ॥१६॥वर्षवाताच्या झंझाटा - । सरिशा प्रचंड उठती लाटा । मोडती जलयानाच्या वाटा । पांथ संकटा वरपडती ॥१७॥सरिता सिंधूसि जेथ मिळणी । महानौका तये स्थानीं । येतां जातां स्थिरावोनी । क्रियाचरणीं वर्तती ॥१८॥महापुराच्या संगमकाळीं । त्या न थरती तये स्थळीं । प्रबलवातें ऊर्मिमाली । सागर समूळीं क्षोभती ॥१९॥जैसें साधनीं अपक्कचित्त । योगमार्गें संक्षोभत । तेथ झगटतां कंदर्पवात । ऊर्मि उठत तृष्णेच्या ॥१२०॥इहामुत्रार्थाभिलाष - । सिद्धि गर्जती अशेष । सरितापूरविषयाभास । मिळती विशेष उत्पथ ॥२१॥तेणें तरणोपायसन्मार्गतरणि । विषयसरितां उत्पथमिळणी । नियमें थारों न शकती करणी । जाती उधळोनि सैराट ॥२२॥गिरयो वर्षधाराभिर्हन्यमाना न विव्यथुः । अभिभूयमाना व्यसनैर्यथाऽधोक्षजचेतसः ॥१५॥भगवन्निष्ठ जैसे व्यसनीं । पीडितां दुर्दैवें ग्रहगणीं । व्यसना पावती अंतःकरणीं । निंद्यवचनीं त्रितापीं ॥२३॥अक्षजज्ञाना गोचर नव्हे । त्यासी अधोक्षज म्हणावें । चित्तासि तें सुख जेव्हां फावे । मग नाठवे भवदुःख ॥२४॥तयां अधोक्षजचेतसांसी । विघ्नें बाधूं न शकती जैशीं । कीं अर्कतुळें आकाशासी । नोहे जैसी वेदना ॥१२५॥तैसें प्रबलवृष्टिभरीं । आच्छादूनि ठाती गिरि । तेणें न दुखवती तिळभरी । धाराप्रहारी खोंचतां ॥२६॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP