मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २० वा| श्लोक १ ते ५ अध्याय २० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय २० वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - तयोस्तदद्भुतं कर्म दावाग्नेर्मोक्षमात्मनः । गोपाः स्त्रीभ्यः समाचख्युः प्रलंबवधमेव च ॥१॥कौरववंशावतंस सुमना । कृष्णलीलामृतरसपाना । मानस आणूनि श्रवणभुवना । सावधान बैसवीं ॥३१॥परीक्षितीसि सावधान । जाणोनि व्यासाचा नंदन । म्हणे दावाग्नि प्राशून । व्रजीं भगवान् प्रविष्टला ॥३२॥आपुलालिया सदनाप्रति । गोप गोधनें घेऊनि जाती । ते ते रामकृष्णांची कीर्ति । नूतन कथिती अद्भुत ॥३३॥माता भगिनी वनिता दुहिता । इत्यादि स्त्रीवर्गां समस्तां । आणि पुरुषांही ग्रामस्थां । कथिती वार्ता अपूर्व ॥३४॥म्हणती आम्हां ईषीकावनीं । गोधनेंसहित जाळितां अग्नि । करितां कृष्णासी विनवणी । तेणें वदनीं सांठविला ॥३५॥आच्छादूनि आमुचे नयन । कृष्णें केलें दावाग्निपान । न भरतांचि अर्धक्षण । केलें मोक्षण आमुचें ॥३६॥गाई महिषी अजा अविक । लहान थोर गोरक्षक । आलों भांडीरवटीं अचुक । नेत्रविमोक करितांची ॥३७॥आणि प्रलंबनामा दैत्य । गोपवेशें क्रीडासक्त । होऊनि नेला रोहिणीसुत । गगनाआंत वधावया ॥३८॥कृष्णें जाणोनि तो दुर्जन । राम केला सावधान । तेणें मुष्टिप्रहारेंकरून । विगतप्राण पाडिला ॥३९॥उभयतांच्या अद्भुतलीला । आजि प्रत्यक्ष देखिल्या डोळां । ऐसें प्रशंसितां गोपाळां । विस्मय सकळां हृत्कमळीं ॥४०॥गोपवृद्धाश्च गोप्यश्च तदुपाकर्ण्य विस्मिताः । मे निरे देवप्रवरौ कृष्णरामौ व्रजं गतौ ॥२॥गोपवृद्ध आणि गौळणी । ऐकोनि गोपाळांच्या वाणी । परमविस्मयें अंतःकरणीं । म्हणती करणी अद्भुत हे ॥४१॥बागुलाभेणें कांपती शिशु । आणि याचा हा उत्कर्षु । तरी हे कोणी पुराणपुरुष । व्रजीं निवास करूं आले ॥४२॥बाळपणीं हे अद्भुत ख्याति । तरी हे कोण्ही निर्जरपति । वृथा मानूं निजसंतति । मोहभ्रांतीस्तव आम्ही ॥४३॥ऐसें जाणोनि गोपगोपीं । रामकृष्ण ईश्वररूपी । भजननिष्ठेच्या साक्षेपीं । मनःसंकल्पीं प्रवर्तति ॥४४॥तंव तो लाघवी भगवान मोह । पसरूनि लोपी ज्ञान । जैसें तमीं विद्युत्स्फुरण । क्षणें फांकोन हारपे ॥४५॥मग यथापूर्व बालभावें । रामकृष्णांतें आघवे । मानूनि स्नेहाच्या लाघवें । धेनूंसवें पाठविती ॥४६॥अवघियां व्रजींचिया गोपाळां । नंद निरवी उभय बाळां । म्हणे या दोघांतें सांभाळा । अवघिया वेळां सावध ॥४७॥जातां येतां सावधपणें । रामकृष्णां न विसंवणें । बैसतां उठतां कृष्ण पाहणें । कृष्णावीण न वसिजे ॥४८॥खातां जेवितां पाणी पितां । लेतां नेसतां देतां घेतां । चालतां बोलतां धंदा करितां । कृष्णनाथा न विसंबा ॥४९॥देखूनि अद्भुत पराक्रम । पुढती मायेचा संभ्रम । तेणें मानिती अबलांसम । पुरुषोत्तम व्रजवासी ॥५०॥असो लोटल्या ग्रीष्मकाळ । पुढें प्रावृट् प्रभवनशीळ । प्रवर्तलिया प्राणी सकळ । व्याप्त केवळ सुखदुःखें ॥५१॥तया वर्षाकाळींची क्रीडा । शुक निवेदी नृपा पुढां । वृष्टिभरें आनंद गाढा । पावती पीडा जलशैत्यें ॥५२॥ततः प्रावर्तत प्रावृट् सर्वसत्त्वसमुद्भवा । विद्योतमानपरिधिर्विस्फूर्जितनभस्तला ॥३॥प्रलंबहनन दावाग्निपान - । कथनानंतर राया जाण । प्रावृट्काळ वर्तमान । तद्वर्णन अवधारीं ॥५३॥विराट्पुरुषाचें जें वीर्य़ । वृष्टिरूपें स्रवतें होय । भूमिदेवी गर्भ लाहे । प्राणिमय चराचर ॥५४॥पत्नी जाणुनियां ऋतुमती । कांत आलिंगी एकांतीं । विरहताप टाकूनि क्षिती । तैशी चित्तीं संतुष्ट ॥५५॥गर्भ संभवलिया उदरीं । दोहद होती परोपरी । धरा तैसी सस्यभरीं । होय विकारीं विकृत ॥५६॥चहूं खाणींमाजीं प्राणी । प्रावृट्काळीं प्रसवे धरणी । आदिपुरुषाची हे करणी । राया श्रवणीं परियेसीं ॥५७॥प्रावृट्शब्द हा स्त्रीलिंगी । विराट् कालात्मा आलिंगी । द्यावाभूमी उभयआंगीं । सालंकृत दंपती ॥५८॥चंद्र सूर्य परिधिमंत । नाडरीं प्रतिमंडळें बिंबत । द्यावाभूमी विस्फूर्जित । उपहासत परस्परें ॥५९॥क्षणैक उष्ण क्षणैक अभ्र । कांहीं वृष्टि कांहीं समीर । वर्षारंभीं चमत्कार । होती विकार लघुदीर्घ ॥६०॥सांद्रनीलांबुदैर्व्योम्नि सविद्युत्स्तनयित्नुभिः । अस्पष्टज्योतिराच्छन्नं ब्रह्मेव सगुणं बभौ ॥४॥पुढें पुढें प्रबळ मेघ । नभीं दाटती पैं अमोघ । शुभ्र धूसर सजल साङ्ग । सवेग रंग पालटती ॥६१॥नभ आच्छादे निबिड घनीं । माजीं गर्जना दीर्घध्वनी । विद्युल्लतांचिया स्फुरणीं । दृश्य दिसोनि हारपे ॥६२॥चंद्र सूर्य तारांगणें । घेती अभ्रांचीं प्रावरणें । स्पष्टास्पष्टप्रभाहीनें । तेणें गुणें भासती ॥६३॥सजल मेघांच्या येती सरी । तेव्हां झांकोनि जाती गिरि । जळें वाहती पृथ्वीवरी । चिंता अंतरीं पांथिकां ॥६४॥जेंवि गुणमय ब्रह्म सगुण । करूनि आणी जीवपण । प्रावृट्काळीं सजल घन । लेवूनि गगन तेंवि नटे ॥६५॥सत्त्वगुणाची विवेकमति । तैशा विद्युल्लता झळकती । रजोवल्गनांची आयति । घनगर्जितीं उपमावी ॥६६॥तमोगुणाचेनि पाडें । सजल मेघीं गडद पडे । जीवचैतन्या सांकडें । सगुण भासे खंब्रह्म ॥६७॥अष्टौ मासान्निपीतं यद्भूम्याश्चोदमयं वसु । स्वगोभिर्मोक्तुमारेभे पर्जन्यः काल आगते ॥५॥सगुण ब्रह्म जीवेश्वर । उभय सादृश्यप्रकार । शुकाचार्य परम चतुर । कथनीं भूवर तोषवी ॥६८॥ईश्वर म्हणिजे जगत्पति । जीव बोलिजे पैं नृपति । दोहीं दृष्टांतें व्युत्पति । करी दार्ष्टांती सूर्याचे ॥६९॥प्रजांपासूनि निजशासनें । राजा अंगीकारी धनें । पुन्हा देउनि संरक्षणें । करी वर्धन प्रजांचें ॥७०॥किंवा ईश्वर जगत्कर्मा । नेमूनि वेदाज्ञेच्या नेमा । पुन्हा फलद जाणूनि कामा । कल्पद्रुमा सम होय ॥७१॥हेमंतादि अष्ट मास । भूमिसंबंधीं जो जलरस । किरणें आकर्षी दिनेश । नृप धन्यास ज्यापरी ॥७२॥पर्जन्य म्हणिजे तो गभस्ति । उचित काळाची जाणोनि प्राप्ति । किरणसेवकां हातीं पुढतीं । अर्पणाप्रति प्रवर्ते ॥७३॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP