मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २० वा| श्लोक ६ ते १० अध्याय २० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय २० वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर तडित्वंतो महामेघाश्चंडश्वसनवेपिताः । प्रीणनं जीवनं ह्यस्य मुमुचुः करुणा इव ॥६॥विद्युल्लता कडकडाटी । महामेघांचिया दाटी । चंडवायो झडझडाटी । करी दिग्पटी सकंप ॥७४॥जैसे करुणावंत पुरुष । संतप्त जाणूनि जनास । वेंचूनि आपुलें अर्थायुष्य । देती तोष सर्वस्वें ॥७५॥तैसेचि जाण चंडघन । मोक्षण करूनि निजजीवन । या जगासि आप्यायन । सदयासमान करिताती ॥७६॥जलचरां जीवविती जीवनें । तृणांदिकां अभिवर्षणें । भूचरां खेचरां तृणें धान्यें । आप्यायमानें पौष्टिकें ॥७७॥तपःकृशा देवमीढा आसीद्वर्षीयसी मही । यथैव काम्यतपसमस्तनुः संप्राप्य तत्फलम् ॥७॥ग्रीष्माकळींचा महा आतप । तेणें शोषूनि गेलें आप । विपर्ण झाले पादप । झाला लोप तृणाचा ॥७८॥दावानळें जळालीं तृणें । झाडीं न थरती जीर्ण पर्णें । आहळलीं वाळलीं वठलीं उष्णें । तीं संपूर्ण खांकरलीं ॥७९॥तृणीं वनीं जीवनीं जंतु । ग्रीष्मतापें पावले अंतु । कृप संपूर्ण सस्यरहितु । तापें श्रमित धरित्री ॥८०॥देखोनि कृशता धरित्रीआंगीं । देव म्हणिजे महामेघीं । मीढाशब्दें शिंपितां वेगीं । पुष्टता सर्वांगीं जाहली ॥८१॥पतिव्रता विरहतापें । कृशता पावे विरहपापें पुढती । लाहतां स्वामिकृपें । होय कंदर्पे संतुष्ट ॥८२॥किंवा सकाम तापस । कृच्छ्रें तनु करिती कृश । सफळ होतां त्यांचे क्लेश । पावती तोष पुष्टत्वें ॥८३॥तैशी पृथ्वी अष्ट मास । उष्णतापें होतां कृश । यथाकाळें तो पाऊस । वर्षतां तोष पावली ॥८४॥मृत्तिका सांडोनि कठोरत्व । प्रकटे सर्वांगीं मार्दव । उखरी अखरीं जे जे जीव । जीवनें सर्व तोषती ॥८५॥निशामुखेषु खदोतास्तमसा भांति न ग्रहाः । यथा पापेन पाखंडा न हि वेदाः कलौ युगे ॥८॥अविद्येचीं मेघपटलें । झांकोळिती ग्रहमंडळें । तेणें गडद पडे काळें । मार्ग न पडे कर्दमीं ॥८६॥प्रदोषकाळीं निशामुखीं । प्रभा आगळी खद्योतकीं । मोडे ग्रहांची ओळखी । कोणा ठाउकीं नक्षत्रें ॥८७॥ कळीमाजीं जैसी पापें । वेदप्रणीत मार्ग लोपे । जैसे माल्हावलेनि दीपें । विविधें रूपें हारपती ॥८८॥निगम लोपतां संपूर्ण । प्रकाशती पाखंडगण । वेदविहित निषेधून । महाप्रवीण अभिचारीं ॥८९॥वेदोक्त पुत्रेष्टिसाधन । सांडोनि सटवीचें पूजन । संतानवृद्धीसि कारण । विपरीताचरण कलीचें ॥९०॥जारण मारण स्तंभन । उद्वेजण उच्चाटन । संमोहन वशीकरण । इहीं मान्य पाखंडी ॥९१॥मद्यमासांचीं सेवनें । नानाहिम्सादि बलिदानें । ऐसे पाखंड पापाचरणें । महाज्ञानें मिरविती ॥९२॥आच्छादूनि निगमाचार । मान्य कलिकाळीं अभिचार । जैसे प्रावृटीं खेचर । लोपूनि धुंधुर फांकती ॥९३॥श्रुत्वा पर्जन्यनिनदं मंडूका व्यसृजन् गिरः । तूष्णीं शयानाः प्राग्यद्वद्ब्राह्मणा नियमात्यये ॥९॥प्रावृट्काळाचें निशाण । ऐकोन मेघांचें गर्जन । खवळे मंडूकांएं सैन्य । जेंवि ब्राह्मण नियमांतीं ॥९४॥स्नानसंध्येच्या शेवट - । पर्यंत आचार्य मौननिष्ठ । त्याचा ऐकोनि शांतिपाठ । उठे बोभाट छात्रांचा ॥९५॥ पूर्वीं प्रसुप्त छात्रभार । ऐकोनि आचार्याचा स्वर । एकसरा ते करिती गजर । तेंवि दर्दुर प्रावृटीं ॥९६॥आसन्नुत्पथवाहिन्यः क्षुद्रनद्योऽनुशुष्यतीः । पुंसो यथाऽस्वतंत्रस्य देहद्रविणसंपदः ॥१०॥प्रावृट्काळीं पर्जनभरें । क्षुद्र नद्या लोटती पूरें । मार्ग रोधिल्या उतारे । सार्थ व्यवहारें सांडविती ॥९७॥क्षणैक उत्पथ वाहती पूर । सवेंचि पात्रीं न मिळे नीर । जेंवि मूर्खाचा स्वैराचार । यौवनभर लोटतां ॥९८॥इंद्रियाधीन तो परतंत्र । जाणे विषयसेवन मात्र । ओहटूनि गेलिया अर्थ गोत्र । रितें पात्र मग पडे ॥९९॥त्याच्या देहद्रव्यसंपदा । ओहटूनि जातां प्राप्त आपदा । तैसें उत्पथ नदी नदा । न थरे कदा जलबिंदु ॥१००॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP