मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १२ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय १२ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ६ श्लोक ७ ते १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ ते १४ श्लोक १५ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४४ अध्याय १२ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर ततोऽतिकायस्य निरुद्धमार्गिणो हुद्गीर्णदृष्टेर्भ्रमतस्त्वतस्ततः । पूर्णोंऽतरंगे पवने निरुद्धो मूर्धन्विनिष्पाप विनिर्गतो बहिः ॥३१॥त्यानंतरें रमावर । पर्वतप्राय जो अजगर । त्याचे कंठीं वाढला थोर । पवनद्वार बुजविलें ॥३६५॥कंठीं वाढला गोपाळ तेणें कोंडला प्राणानिळ । झाला अघासुर व्याकुळ । करी तळमळ प्राणांतें ॥६६॥नेत्र वाटारले भयंकर । गरगरा फिरती चक्राकार । पवनें पूर्ण अभ्यंतर । झाला असुर घाबरा ॥६७॥आज्ञाचक्र निरोधिलें । कां कीं मुख विकासलें । ब्रह्मरंध्र संपूर्ण भरलें । मग उघडिलें मूर्ध्नीतें ॥६८॥बळें करूनि मूर्ध्निभेद । बाहेर निघाला प्राणवृंद । पुढें वर्तला जो विनोद । तो तूं विशद परियेसीं ॥६९॥तेनैव सर्वेषु बहिर्गतेषु प्रानेषु वत्सान्सुहृदः परेतान् ।दृष्ट्या स्वयोत्थाप्य तदन्वितः पुत्रर्वक्त्रान्मुकुंदो भगवान्विनिर्ययौ ॥३२॥अघामाजीं वत्सें वत्सप । प्राणेंद्रियेंशीं पावले लोप । तिहींशीं अघप्राणांचा कळप । मूर्ध्निमागें निघाला ॥३७०॥बाहेर निघाले असतां प्राण । वत्सें वत्सप गतप्राण । अमृतदृष्टी त्या जीववून । काढी श्रीकृष्ण मुखमार्गें ॥७१॥वत्सें वत्सपांसमवेत । मुखापासोनि श्रीकृष्णनाथ । बाहेर निघाला पैं तरित । जेंवी भास्वत घनीहुनी ॥७२॥पीनाहिभोगोत्थितमद्भुतं महज्ज्योतिः स्वधात्मा ज्वलयदिशो दश । प्रतीक्ष्य खेऽवशितमीशनिर्गमं विवेश तस्मिन् मिषतां दिवौकसाम् ॥३३॥पीन म्हणिजे अतिमांसळ । अजगरी कलिवर विशाळ । मूर्ध्ना भेदूनि चित्कल्लोळ । तेज बंबाळ निघालें ॥७३॥परमज्योति जे महाद्भुत । रजतममळांपासूनि मुक्त । विरोधभजन प्रेमयुक्त । कृष्णस्पर्शें शोधिलें ॥७४॥सांख्ययोगें क्रमें शुद्ध । निवडे तत्पद जें विशुद्ध । लक्षूनि लक्ष्यांश स्वतःसिद्ध । पावे प्रसिद्ध समरस ॥३७५॥ते अघासुरज्योति त्वंपद । तत्पद प्रतीक्षा करी विशद । चरम देहींचा जो हृदय । आनंदकंद निवडला ॥७६॥स्थिरावोनि नभपोकळीं । स्वतेजें दशांतें जे उजळी । सायुज्यपदातें न्याहाळी । सुरीं सकळीं ब्रह्मांडीं ॥७७॥अजगरवदनींहोनि निर्गम । केव्हां करील पुरुषोत्तम । म्हणोनि अघासुराचें धाम । बसवूनि वोम लक्षीतसे ॥७८॥तंव राक्षस वदनाबाहेरीं । वत्सवत्सपेंशीं । श्रीहरि । तेजःपुंज सहस्र करीं । जैसा तमाचा अरी प्रकटला ॥७९॥विमानीं दिवौकसांच्या पंक्ति । परमाश्चर्य नयनीं पाहती । कृष्णीं अघासुराची ज्योति । सायुज्य मुक्ती पावली ॥३८०॥ततोऽतिहृष्टाः स्वकृतोऽकृतार्हणं पुष्पैः सुरा अप्सरसश्च नर्तनैः । गीतैः सुगा वाद्यधराश्च वाद्यकैः स्तवैश्च विप्रा जयनिःस्वनैर्गणाः ॥३४॥सायुज्य पावल्या अघासुर । सुरवर आनंदें निर्भर । स्वकार्यार्थ रमावर । अतितत्पर जाणोनि ॥८१॥ज्यापासूनि अमरपंक्ति । रात्रंदिवस मरणा भीती । त्यांसी ओपूनि सायुज्य मुक्ति । साधिलें निगुती सुरकार्य ॥८२॥स्वकार्यकर्ता जो श्रीकृष्ण । त्यातें अर्चिती निर्जरगण । आपुलाले विशेष गुण । कृष्णार्पण करिताती ॥८३॥देव वर्षती दिव्य सुमनें । अप्सरा अक्रिती सुकीर्तनें गंधर्व गाती साभगानें । तानमाने किन्नरी ॥८४॥ताल मृदंग विणावेणु । गति गमकें कला प्रविण । वाद्यकांदे विचित्र गण । करिती अर्पण निजविद्या ॥३८५॥सात्वत पढती हरिचरित्रें । विष्णुसूक्तें नाना स्तोत्रें । वेदघोष महर्षिवक्त्रें ।स्तुतिस्तवन हरिप्रियें ॥८६॥उपनिषद्भागीं सनकादि मुनि । स्तविती आनंदें गर्जोनि । उर्जित विजयघोष ध्वनि । सिद्धादिगणीं यक्षलक्ष्मी ॥८७॥साध्य चारण किं पुरुष । कृष्णविजयाचा उत्कर्ष दुंदुभीचा प्रलयघोष । ब्रह्मांड घोष गाजविती ॥८८॥तदद्भुतस्तोत्रसुवाद्यगीतिकाजयादिनैकोत्सवमंगलस्वानान् ।श्रुत्वा स्वधाम्नोंऽत्यज आगतोंऽचिराद्दृष्ट्वा जगाम विस्मयम् ॥३५॥ते अनेकद्भुत कृतोत्साह । गीतनृत्यवाद्यसमूह । स्वलोकां निकटिं भारतीनाहो । ऐकोनि पाहों प्रवर्तला ॥८९॥विरातमूर्ध्नि तो सत्य लोक । ऐसा कोण सुकृती देख । कोणा पुण्याचा परिपाक । तो विवेक विपरावया ॥३९०॥सत्वर भूतळा येऊनि स्वामिमहिमा विलोकूनि । परमाश्चर्य पावला मनीं । पद्मयोनि ते काळीं ॥९१॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP