मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १२ वा| श्लोक ५ ते ६ अध्याय १२ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ६ श्लोक ७ ते १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ ते १४ श्लोक १५ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४४ अध्याय १२ वा - श्लोक ५ ते ६ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५ ते ६ Translation - भाषांतर मुष्णंतोऽन्योन्यशिक्यादीञ्ज्ञातानाराच्च चिक्षिपुः । तत्रत्याश्च पुनर्दूराद्धसंतश्च पुनर्ददुः ॥५॥ऐसे सालंकृत गोपाळ । छाया पाहोनि सुशीतळ । बैसोनि करिती गदारोळ । सुखकल्लोळ समस्तां ॥८०॥पूर्ण सदन्नें भरलीं जाळीं । कंठींचीं काढूनि ठेविती तळीं । वृतीवरी टाकूनि कांबळीं । वत्सप खेळीं गुंतती ॥८१॥जाळिया चोरूनि परस्परें । विस्मयें बोलती व्यंग्योत्तरें । अन्वेषाच्या परिहारें । आविष्कारें दाटिती ॥८२॥जाळीं पेंध्याचीं चोरिती । हळूच वडज्यापाशीं देती । झाडा देऊनि नाहीं म्हणती । लांबविती परस्परें ॥८३॥वांकुड्यानें दिधला झाडा । सुदामा देऊं बैसला पुढां । वडज्यापासूनि घे वांकुडा । मग वडज्या झाडा देऊं ये ॥८४॥ऐसें करूनि दृष्टिगूढ । परिहार बोलती अवघड । आणा वाहोनि झडझड । भंड उभंड बोलती ॥८५॥तथापि देखिली ज्याची तेणें । झोंबोनि मागतां आंगवणें । दुसर्यापाशीं भिरकावणें । म्हणती ठेवणें सांभाळीं ॥८६॥जाळी पाहोनि गळां पडे । तंव तो टाकी आणिकाकडे । हास्य करूनि वाडें कोडें । धडासि वेडें लाविती ॥८७॥जैसें मानवी सुखाचें चाडें । सुकृतबळें स्वर्गा चढे । तंव त्या तेथें तें नातुडे । पुढतीं वावडे इहलोकीं ॥८८॥ऐसें हुडकितां अनेक लोक । नातुडे आत्मतृप्तीचें सुख । शिणोनि उगतां नावेक । सुखसंतोष तैं जोडे ॥८९॥तैशी जाळी न चढे करीं । तैं तो शिणोनि रुदना करी । प्रेत्ना रुसोनि प्रवेशे नगरीं । तेव्हां श्रीहरि समजावी ॥९०॥स्वरूपतेचें आलिंगन । देऊनि करी समाधान । सायुज्यसाम्राज्यभोजन । करूं म्हणोनि आश्वासी ॥९१॥ऐशी अन्योन्य चोरूनि जाळीं । परस्परें करिती रळी । परोपरीची वत्सपकेलि । दावी वनमाळी क्रीडोनी ॥९२॥यदि दूरं गतः कृष्णो वनशोभेक्षणाय तम् । अहं पूर्वमहं पूर्वमिति संस्पृश्य रेमिरे ॥६॥अनन्यवत्सवात्सल्यचाडें । सवेग कृष्ण धांवे पुढें । गुंतले भवभानीं संवगडे । कृष्णाकडे अंतरले ॥९३॥दृश्यें गोंविले नेत्रपाशीं । सकाम सफळ बोरांटिसी । एक गुंतले वासनावासीं । तेणें मनासीं अनुगंड ॥९४॥वेदवादाच्या पुष्पित वेली । देखोनि लेंकुरें विगुंतलीं । फलाभिलाषें क्रिया कौटाळी । स्वर्गताळीं वळंघावया ॥९५॥कुटुंबसुखाची भल्लातकी । पक्क सफळित देखिली एकीं । स्नेह उततां तोंडीं नाकीं । गोडी ठाउकी मग झाली ॥९६॥बाह्यदंभाचें उदुंबर । देखोनि भुलती वत्सपभार । फोडोनि पाहतां अभ्यंतर । कृमिविकार बुचबुचिती ॥९७॥ऐकतां निंदेच्या तिंतिणी । तेणें जिव्हेसि सुटलें पाणी । सेवितां सरांग कणकणी । पदार्थ कोणी न चाविती ॥९८॥वर्मस्पर्शाची लागतां ढांसी । वैसों नेदिती भोजनापाशीं । खोकी ओकी अहर्निशीं । अवघे चिळसी मानिती ॥९९॥एक अविवेकी अविचारी । देखोदेखी आचारचारीं । भुलले अपक्क फळाहारीं । अरुचिकरीं थुंकिती ॥१००॥देहबुद्धिच्या लगड्या आकारीं । देखोनि झोंबती एक साकारीं । टोंचतां कंटक षड्विकारीं । निर्विकारी आठवती ॥१॥ममतेचीं भोंकरें । घेतां चिकटोनि पडती करें । भक्षूं जातां थुंकती वक्त्रें । वस्त्रें शरीरें लिगटती ॥२॥पाहतां वनश्रीशोभा ऐशी । गडी गुंतले दृश्याभासीं । दुरी अंतरला हृषीकेशी । हें मानसीं उमजेना ॥३॥आधीं कोण कृष्णा शिवे । ऐसें म्हणोनि घेती धांवे । सांडूनि अवघेचि दृश्यगोवे । निजस्वभावें तकटती ॥४॥एक धांविले श्रवणमार्गें । दृश्याभास सांडूनि मागें । श्रीहरि टाकावया सवेगें । सप्रेम अंगें धांवती ॥१०५॥एक कीर्तनें घेती धांवा । येरा कृष्ण करिती ठावा । सहित गडियांच्या समुदावा । अष्टभावा पावती ॥६॥एक गुप्तत्वें स्मरण वाटे । लागोनि पाउलें टाकिती नेटें । अवघ्यां आधीं श्रीकृष्ण भेटे । म्हणोनि नेटें धांवती ॥७॥एकीं चरणाचा मागोवा । घेवोनि साधितां पादसेवा । सांडिला अवघा भवहेवा । एका माधवा गिंवसिती ॥८॥एकीं श्रीकृष्णाचें रूप । भूतमात्रीं देखोनि समीप । अर्चनपथें ससाक्षेप । वेगीं सकृप टाखिती ॥९॥एकीं झांकूनि प्रवृत्तिडोळे । न देखों म्हणती कृष्णा वेगळें । वंदनमार्गें धांवती सरळे । कृष्ण करतळें स्पर्शावया ॥११०॥एकीं दास्याच्या धोरणें । कायावाचासहित मनें । धांव घेतल्या कृष्णार्पणें । अभिन्नभजनें हरिप्राप्ति ॥११॥एका जगदात्मक स्नेहाळा । सख्यभक्तिमार्ग मोकळा । लाहोनि धावतां चरणचपळा । प्रेमें गोपाळा टपिती ॥१२॥एक केवल आत्मार्पणें । कृष्णामाजि मिळोनि जाणें । पुन्हा कल्पांतीं न निवडणें । पंथें येणें धांवती ॥१३॥कृष्ण स्पर्शेन मीचि आधीं । म्हणोनि सप्रेमभजनविधि । धांवती सांडोनि देहबुद्धि । कृष्ण त्रिशुद्धि स्पर्शावया ॥१४॥आधीं माधीं मी मी म्हणती । अवघे सप्रेमें धांवती । कृष्ण स्पर्शोनि मांदी भंवती । ते क्रीडती स्वानंदें ॥११५॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP