मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १२ वा| श्लोक १२ अध्याय १२ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ६ श्लोक ७ ते १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ ते १४ श्लोक १५ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४४ अध्याय १२ वा - श्लोक १२ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १२ Translation - भाषांतर यत्पादपांसुर्बहुजन्मकृच्छ्रतो धृतात्मभिर्योगिभिरप्यगम्यः । स एव यादृग्विषयः स्वयं स्थितः किं वर्ण्यते दिष्टमहो व्रजौकसाम् ॥१२॥ज्याचा पादपांसु पावावया । बहुजन्म करिती तपश्चर्या । सांतपनादि कर्कशक्रिया । करूनि काया शोधिती ॥२१०॥कृच्छ्रें चांद्रायण पंचाग्नि । तीव्र व्रताची जाचणी । वर्षाहंमेतीं मेघ पाणी । धैर्यें करूनि सोसिती ॥११॥क्षुधा तृषा वात घर्म । साहती चिंतोनि पुरुषोत्तम । त्यांसी धृतात्में हें नाम । मन निःसीम जे धरिती ॥१२॥जें चपळांहूनि अत्यंत चपळ । जें बलिष्ठाहूनि महाप्रबळ । खळाहूनि जें अत्यंत खळ । प्रपंचखेळ हा ज्याचा ॥१३॥ऐशिया मनातें धरूनि मुष्टि । धैर्य मेरू जे साधनसृष्टि । होऊनि लोटिल्या जन्मकोटि । त्यांसीही शेवटीं अगम्य ॥१४॥आणि योगियांसही अगम्य । श्रीकृष्णाचें सहचर प्रेम । योगाभ्यासें मनोधर्म । जिहीं निःसीम सांडविला ॥२१५॥मूलबंध उड्याण । जालंधर तिसरा जाण । आधार नाभिकंठस्थान । तनु समान इहिं तिहीं ॥१६॥बंधत्रये समान तनु । वज्रासनें ऊर्ध्व पवनु । जागवी कुंडलणी क्षोभवून । हें लक्षण हठाचें ॥१७॥गोरजाग्नि जैसा कठिण । चरणीं लाऊनि हुताशन । मुखें किजे नामस्मरण । मन उद्विग्न न होतां ॥१८॥त्याहूनि कठिण कोटिगुणें । हठयोगाचें अभ्यासनें । ऐसें दुर्घट मनाचें धरणें । प्राप्तीकारणें पदरज ॥१९॥सपाद लक्ष्य लयावधानें । कथिलीं गौरीसि ईशानें । मनोनिग्रहाचीं कारणें । तीं सर्व साधनें जिहीं केलीं ॥२२०॥ऐशिया धृतात्मयाप्रति । ज्याच्या पदरजाची ही प्राप्ति । अगम्य म्हणोनि महामति । नृपातें कथी शुकयोगी ॥२१॥तो हा स्वयें श्रीभगवान । इंद्रियांचा विषय होऊन । प्रत्यक्ष गोचर क्रीडे जाण । भाग्य कोण गौळियांचें ॥२२॥मृगजळ पिऊनि अमरत्वप्राप्ति । कीं स्वप्ननिधानें कुबेर होती । नाते त्रिदोष भ्रमभारती । सायुज्य मुक्ति महावाक्य ॥२३॥वागुल संततीची सेना । कृतांता आणी रणांगणा । सत्यत्व आलें ऐशिया वचना । आश्चर्य मना हें वाटे ॥२४॥मिथ्याभ्रम हा जगदाकार । विपरीत ज्ञानाचा प्रकार । जागृदवस्था करी गोचर । असाचार दृग्विषयां ॥२२५॥वाचा परतल्या नेणोनि सोय । मनासि ज्याची प्राप्ति नोहे । तो अत्मा गौळियां गोचर होय । हें आश्चर्य नृपवर्या ॥२६॥लटिक्यामाजि साचार जोडे । या लागीं भाग्य हें म्हणणें घडे । या कारणास्तव एवढें । नव्हे कीं थोडें आश्चर्य ॥२७॥तंव कुरुपति म्हणे जी सर्वज्ञा । हें नुमजे माझिया मना । मिथ्या अवघी भवकल्पना । साचपणा केविं पावे ॥२८॥ऐकोनि हांसिला वय्यासकी । एवढी श्रवणामाजी चुकी । हे गोष्टी पूर्वींच ठाउकी । केली स्वमुखीं तुज आम्हीं ॥२९॥करूनि मृत्तिकेचीं अन्नें । लटकींच जेविती अज्ञानें । तैशीं गुळाचीं केलिया मिष्टान्नें । कां पां रसने न फावती ॥२३०॥अयोनिसंभव चैतन्यघन । करावया धर्मसंस्थापन । लीलाविग्रही कळल्या कृष्ण । कां पां प्रश्न स्फुरला हा ॥३१॥म्हणसी प्राकृत व्रजनिवासी । चैतन्य कैसें गोचर त्यांसी । तरी भक्तियोगाची महिमा ऐशी । जे निर्गुणासी भुलवी ॥३२॥विषयप्रेमा होऊनि रामा । द्वैत नसतां प्रवर्ते कामा । उमजूं न देतां स्वप्नभ्रमा । माजि आत्मा द्विधा करी ॥३३॥प्रेमोत्कर्षें वीर्य क्षरे । मैथुनानंद ही अवतरे । आपुल्या सत्यत्वें अनुभव उरे । परी तीसि लेंकुरें न होती ॥३४॥विषयप्रेमामाजी हे शक्ति । मोहे तो केवळनिजात्मरति । चैतन्य आणूनि अव्यक्त व्यक्तीं । निजविश्रांति अवतरे ॥२३५॥जे शुद्धसत्त्वाची माया । जींमाजि भेदा नाहीं ठाय । स्वगत ऐसें नाम लाहे । परी जें अद्वय चित्सुख ॥३६॥तिच्या अवलंबें ये व्यक्ति । स्वभक्तप्रेमाची लेऊनि बुंथी । अभेदभेदें क्रीडा करिती । ते व्युत्पत्ति हे केली ॥३७॥प्रेमोत्कर्षाचेनि क्षोभें । वालभ नटोनि राहिलें उभें । देवभक्त ऐसिये शोभे । ज्या चित्प्रभे पात्रत्व ॥३८॥जेंवि रविभा नभाक्षिती - । माजि असतां नलगे हातीं । तेचि सांपडे सूर्यकांतीं । तदनुयुक्ति ग्राहका ॥३९॥तो तो मग पावे शुष्केंधना । प्रकटी प्रकाशा दीपनपचना । नफवे आर्द्रा मृत्पाषाणा । तेंवीं दुर्जना जगदात्मा ॥२४०॥गौळी म्हणसी सामान्य जन । तरी यांचें ब्रह्मादिकां न गणे पुण्य । अनंत जन्मांचें सेवाऋण । एथ उत्तीर्ण हरि होय ॥४१॥ते पुण्यपुंज हे संवगडे । निःशंक क्रीडती न धरूनि भिडे । ब्रह्मादि देव जेथें वेडे । तेही पुढें ऐकसी ॥४२॥हें ऐकोनि कुरुश्रेष्ठ । म्हणे यावरी कथा स्पष्ट । कथावी हा परमोत्कृष्ट । हेतु वरिष्ठ मम मनीं ॥४३॥आणिक एक आशंका । चिदात्मया सर्वात्मका । शत्रुमित्र कां भासे लोकां । हा विचार ठाउका मज करा ॥४४॥ हें ऐकोनि बादरायणि । कृतप्रश्नाचे निरूपणीं । प्रवर्तला चरित्रकथनीं । सावध श्रवणीं म्हणोनियां ॥२४५॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP