मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १२ वा| श्लोक १५ ते २० अध्याय १२ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ६ श्लोक ७ ते १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ ते १४ श्लोक १५ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४४ अध्याय १२ वा - श्लोक १५ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १५ ते २० Translation - भाषांतर एते यदा मत्सुहृदोस्तिलापः कृतास्तदा नष्टसमा व्रजौकसः । प्राणे गते वर्ष्मसु का नुं चिंता प्रजाऽसवः प्राणभृतो हि ये ते ॥१५॥सबळ म्हणिजे ससैन्येशीं । वत्सेंसहित वत्सपेंशीं । कृष्ण मारूनि तिळोदकासी । अग्रजांसीं कल्पीन ॥८७॥कृष्णेंसहित वत्स वत्सप । अग्रजा कल्पीं हेंचि तिळाप । येर उरले व्रजींचे पशुप । ते प्रेतरूप सहजेंची ॥८८॥ममतावंत जे गृहस्थ जन । अपत्यें केवळ त्यांचे प्राण । त्यांच्या नाशें ते यतप्राण । पावती मरण न मारितां ॥८९॥इति व्यवस्याजगरं बृहद्वपुः स योजनायाममहाद्रिपीवरम् ।धृत्वाऽद्भुतं व्यात्तगुहाननं तदा पथि व्यशेत ग्रसनाशया खलः ॥१६॥ऐसा विचार करूनि मनीं । अजगरशरीर धरूनि । पसरिला मार्गी येऊनि । वैर स्मरोनि मागिलें ॥२९०॥तं अजगरहरीर म्हणसी कैसें । स्थूळ पीवर पर्वता ऐसें । विस्तीर्ण योजनायतावकाशें । महा आवेशें विक्राळ ॥९१॥पर्वतगुहेसारिखें वदन । महा अद्भुत पसरिलें जाण । वत्सेंवत्सपसहित कृष्ण । कपटेंकरून ग्रासावया ॥९२॥कैसें अद्भुत त्याचें वदन । पुडिले श्र्लोकी श्रीभगवान । करा विशेषें व्याख्यान । श्रोतीं श्रवण तें किजे ॥९३॥धराधरोष्ठो जलदोत्तरोष्ठो दर्याननांतो गिरिशृंगदंष्ट्रः ।धांतांतरास्यो वितताध्यजिह्वः परुषानिलश्वासदेवेष्णः ॥१७॥अधरओष्ट पसरिला मही । ऊर्ध्व्व ओष्थ नभाच्या ठायीं । मेघपटलासारिखा पाहीं । वितर्क कोणाही न करवे ॥९४॥पर्वताच्या जैशा दरकुटी । तैशा दोन्ही वदनकोटी । सृक्किणीमाजीं दंष्ट्रा दाटी । गिरिकूटथाटी सारिख्या ॥२९५॥गुहागव्हरीं अंधकार । तैसें वदनगर्भीं शर्वर । जिव्हा पसरली सविस्तर । भासे सुंदर पथ जैसा ॥९६॥मुखश्वासाच्या निघती अह्या । तुल्य गमती त्या वणव्या । वाफा झोंबती प्राणियां । तप्ततैलासारिख्या ॥९७॥पेटलीं पर्वाताचीं जेवीं मौळें । तैसे प्रज्वळित उष्ण डोळे । नयजदीप्ति श्वानासलॆं । शलभपळें आहळती ॥९८॥दृष्ट्वा तं तादृशं सर्वे मत्वा मृदावनश्रियम । व्यात्ताजगरतुंडेन दृत्प्रेक्षन्ते स्म लीलया ॥१८॥सर्व वत्सप ऐसे परी । देखोनि अद्भुत तनु अजगरी । वृदावनींची शोभा खरी । ऐसें अंतरीं मनिती ॥९९॥वृंदावनींची ही वनश्री । सप्रर्वत गिरिदरी । सजीव सर्शरीरापरी । परस्परें निर्धारिती ॥३००॥पसरलें अजगरतुंडे जैसें । पर्वतदरीसी हेंही तैसें । तुळिती करूनियां उत्प्रेक्षे । विपरीत कैसें मानित ॥१॥वत्सपा ऊचुः - अहो मित्राणि गदत सत्त्वकूटं पुरःस्थितम् । अस्मत्संग्रहनव्यात्तव्यालतुंडायते न वा ॥१९॥पहा रे गडी हो आश्चर्य कैसें । सांगा काय रे पुढें असे । सजीव पर्वत जैसा भासे । तैसें दिसे कीं ना रे ॥२॥दुसरा म्हणे पहा रे दृष्टी । आमुचा ग्रास करावयासाठीं । पसरली सर्पाची मुखवटी । तैशी दरकुटी नव्हे ॥३॥सत्यमर्ककरारक्तमुत्तराहनुवद्घनम् । अधराहनुवद्रोधस्तत्प्रतिच्छाययाऽरुणम् ॥२०॥खरें रे खरें म्हणती एक । मेघपटलामाजीं अर्क । ऊर्ध्वभागीं सर्पमुख । तेवीं लखलख रक्तिमा ॥४॥ऊर्ध्व ओष्ठ आणि टाळा । ऐशी लोहीव या अभ्रपटळा । त्या प्रतिबिंबाची अरुणकळा । अधरोष्ठशकलासम कां रे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP