मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १२ वा| श्लोक २१ ते २५ अध्याय १२ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ६ श्लोक ७ ते १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ ते १४ श्लोक १५ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४४ अध्याय १२ वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर प्रतिस्पर्धेते सृक्किभ्यां सव्यासव्ये नगोदरे । तुंगशृंगालयोप्येतास्तद्दंष्ट्राबिश्च पश्यत ॥२१॥पहा रे या नगोदरीं । सृक्किणी सारिख्या उभय दरीं - । माजि दंष्ट्राचिये परी । उभय हारी श्रृंगाच्या ॥६॥आस्तृतायाममार्गोऽयं रसनां प्रति गर्जति । एषामंतर्गतं ध्वांतमेतदप्यंतराननम् ॥२२॥विस्तीर्ण मार्गाचा तळवट । सोज्वळ चोपडा निघोंट । रसनेसारिखा सरळ नीट । आणी वीट रसनेतें ॥७॥पर्वतगुहागर्भींचें ध्वांत मुखावकाशा लाजवीत । वणव्याचा उष्णवात । अहिनिश्वसित हें जैसें ॥८॥दावोष्णखरवतोऽयं श्वासवद्भाति पश्यत । तद्दग्धसत्वदुर्गंधोऽप्यंतरामिषगंधवत् ॥२३॥खरपुस झुळका वणव्यावरूनि । येतां होतसे आहळणीं । तेथ जळाल्या जीवश्रेणि । त्याची घाणी हे पहा रे ॥९॥जैसा अजगरें घेतला आहार । तदुदरींचा आमिषोद्गार । तैसा दुर्गंध दावी समीर । भासे अपर की नारे ॥३१०॥ऐशी विपरीत कल्पना । पर्वत मानूनि सर्पानना । उपमा सादृश्यें वल्गना । करूनि वदना प्रवेशती ॥११॥अस्मान्किमत्र ग्रसिता निविष्टानयं तथा चेद्बकवद्विनंक्ष्यति ।क्षणादनेनेति बकार्युशन्मुखं वीक्ष्योद्धसंतः करताडनैर्ययुः ॥२४॥जैसें सर्पाचें जाभाडें । तैसें गव्हर दिसतें पुढें । आम्हा ग्रासावयाच्या चाडें । पहा रे केवढें पसरलें ॥१२॥जरी साचची सर्पपणें । मुखीं प्रवेशतां गिळिलें येणें । तरी बकाचे ऐसा जाईल मरणें । निर्भयमन हांसती ॥१३॥बका माझारी एकला । कृष्ण निःशंक प्रवेशला । तैसेचि आम्ही ही जाऊं चला । पैल पातला श्रीकृष्ण ॥१४॥हा जरी भरील आमुचा घोंट । तरी कृष्ण याचा फोडील कंठ । बका सारिखी मृत्युवाट । यासि प्रकट दावील ॥३१५॥श्रीकृष्णाच्या हस्तें करून । याचें होईल निर्दळण । बकारीचें सुंदर वदन । पहाती फिरोन वत्सप ॥१६॥आमुचा पाठिराखा हरि । पूर्ण विश्वास हा अंतरीं । करताडणें परस्परीं । हास्य गजरीं प्रवेशती ॥१७॥श्रीशुक उवाच - इत्थं मिथोऽतथ्यमतज्ज्ञमाषितं श्रुत्वा विचिंत्येत्यमृषा मृषायते । रक्षो विदित्वाऽखिलभूतहृत्स्थितः स्वानां निरोद्धुं भगवान्मनो दधे ॥२५॥शुक म्हणे गा पार्थिवाग्रणी । ऐकोनि वत्सपांची अतज्ज्ञवाणी । काय विचारी चक्रपाणि । तें तूं श्रवणीं परियेसीं ॥१८॥परस्परें ऐसें वत्सप । यथार्थ असतां अयथार्थ सर्प । भाविती करूनि पर्वतारोप । सर्परूप गिरि म्हणती ॥१९॥सत्य मानूनि असत्य । असत्यासी म्हणती सत्य । विपरीत ज्ञानाचा संकेत । मृत्यु अमृत भाविती ॥३२०॥दृश्य मानूनि साचार । आत्मा मानूनि स्वशरीर । ब्रह्मसुखेंशीं संसार । अतज्ञ चतुर उपमिती ॥२१॥जगही अवघें ब्रह्म आहे । वृथा साधनीं करणें काय । ऐसें भाविते महामोहें । गिळिले पाहें बालिश ॥२२॥ब्रह्म बाईल ब्रह्म लेक । ब्रह्म लेकी सुना देख । शत्रु मित्र राग द्वेष । भेद विवेक ब्रह्म हें ॥२३॥ब्रह्म रडतें ब्रह्म हांसतें । ब्रह्म मरतें आणि मारितें । ऐसें विपरीत बोधें ज्ञाते । मृत्यु सेवते झाले ॥२४॥सर्वांतरीं ज्याचा वास । तो हा श्रीकृष्ण आदिपुरुष । तेणें जाणोनि भवराक्षस । आणि मानस गडियांचें ॥३२५॥पर्व मानूनि अघावदनीं । स्वकीय प्रवेशती नेणोनि । त्यांसी वर्जावयालागूनि । चक्रपाणि प्रवर्ते ॥२६॥अमृत मानूनि मृत्युमुखीं । स्वजन भरतां विषयसुखीं । ते निषेधार्थ आत्मविवेकी । जगद्व्यापकी कळवळला ॥२७॥ऐसा कळवळूनि श्रीहरि । वत्सप निषेधावे हें मनीं धरी । तंव ते प्रवेशले सत्वरीं । मुखाभीतरीं अघाच्या ॥२८॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP