मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १२ वा| आरंभ अध्याय १२ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ६ श्लोक ७ ते १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ ते १४ श्लोक १५ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४४ अध्याय १२ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीमद्गोविंदात्मने नमः । गुरुगौरवा गणना करूं । न शकती ब्रह्मादि ईश्वरु । म्हणतां एवधा जगदाकारु । तुजवीण अपरू असेना ॥१॥जो जगाचा होणाजाणा । अचळ साद्यंतदेखणा । त्या गुरूची गौरवगणना । करवे कोणा कोठूनी ॥२॥ईश्वरादिदृश्यवरी । ज्याची नेणिवाभा उभारी । त्या विपरीतबोधें गौरवथोरी । केंवी निर्धारीं अवगमे ॥३॥माजीं ब्रह्मादि सज्ञान । सिद्ध सुरवर मुनींचे गण । त्यांचें तुजहूनि आरौतें ज्ञान । नेणती म्हणोन तव गरिमा ॥४॥तें तूं स्वभासें भासविसी । सत्यसंकल्पें चेष्टविसी । स्वबोधें स्वरूपीं लीन करिसी । स्वयमेव क्रीडसी स्वच्छंदें ॥५॥यालागीं सकळा साकल्यरहिता । विश्वातीता विश्वसहिता । अगुणा सगुणा उभयातीता । नमो अनंता गोपती ॥६॥गोप्ता गोपन गोपनीय । एवमादि अभेदत्रय । एकानेक अद्वितीय । श्रीगुरुराय स्वतःसिद्ध ॥७॥हृदयीं त्वत्पदप्रेमादर । प्रकटी तावक अभयकर । वरदकृपेचा भास्कर । अज्ञानतिमिर विध्वंसी ॥८॥तवानुग्रहगजानन । शारदा तावकी कृपापूर्ण । तव श्रोते प्रेमळ सुज्ञ । अभेदनमन अवघेंची ॥९॥एवं अवघियांमाजीं अवघेपणें । नमन माझें पृथक् नुरणें । वेगळा नसतां समरस । म्हणणें । हें बोलणें सवडीचें ॥१०॥शुद्ध सन्मात्र सदोदित । गोविंद सद्गुरु स्वानंदभरित । तो दयार्णव अभीष्टार्थ । विनवी अंकित अनन्य ॥११॥दशमामाजीं दशमावधि । गोकुळकथा कथिली आधीं । वृंदावनप्रवेशविधि । एकादशीं निरूपिली ॥१२॥एवं एकादशिनी पहिली । आज्ञावरें वाखाणिली । ब्रह्मयासि जेथ भुली । ते ठाकली यापुढें ॥१३॥वयस्येंशीं गिळितां कृष्ण । केलें अघाचें मोक्षण । पुढें परीक्षितीचा पावन प्रश्न । इतुकें व्याख्यान द्वादशीं ॥१४॥करितां पुलिनीं वनभोजन । वत्सें वत्सप हरितां कृष्ण । करी विधीचें स्मयभंजन । इतुकें व्याख्यान त्रयोदशीं ॥१५॥चतुर्दशीं ब्रह्मस्तुति । अगाध जेथींची व्युत्पत्ति । जेणें तोषोनि श्रीपति । विरंचीप्रति वर ओपी ॥१६॥धेनुअवनें धेनुकार्दन । धेनु प्राशितां सगरवन । कालियकलुषें पावल्या मरण । जीववी कृष्ण पंचदशीं ॥१७॥कालियासीं कृतनिग्रह । तत्पत्न्यांचा स्तवनोत्साह । पावोनि केला अनुग्रह । शुद्ध प्रवाह षोडशीं ॥१८॥नागालया कालियगमन । दर्शनें तोषवूनि स्वजन । रात्रीं दावाग्निप्राशन । करी श्रीकृष्ण सप्तदशीं ॥१९॥वसंतग्रीष्मगुणांचें कथन । प्रलंबदैत्य कपटेंकरून । गोपरूपें संकर्षण । नेतां मरण अष्टादशीं ॥२०॥मुंजारण्यीं गोपाळ । भस्म करितां दावानळ । डोळें झांकवूनि गोपाळ । गिळी अनळ एकोणिसावीं ॥२१॥विसावा वर्षाशरत्काल । उपमा त्यागा त्यागशीळ । देऊनि प्रबोध रसाल । रामगोपाळ वर्णिती ॥२२॥शरत्काळीं वृंदावनीं । वेणू वहातां चक्रपाणि । गोपी वेधल्या ऐकोनि श्रवणीं । गाती वदनीं एकविसीं ॥२३॥गोपिकांचीं हरूनि वसनें । वरदें तोषविल्या कृपाघनें । यज्ञपत्न्यांचीं याचिलीं अन्नें । हें निरूपण बाविसामाजीं ॥२४॥इत्यादि अध्यायव्याख्यानीं । प्राप्त द्वितीय एकादशिनी । एथ धिवसा नुपजे मनीं । ते श्रीचरणीं विज्ञप्ति ॥२५॥ब्रह्मस्तुतीचा अवघड घाट । पुढें व्याख्यान न चाले वाट । प्रज्ञा शंकोनि नुमली ओष्ठ । कथनीं संकट वैखरिये ॥२६॥ब्रह्मादिकांची प्रज्ञा वेडी । कथनीं सरस्वती बोबडी । व्यासें गुरुवराचे प्रौढी । केली परवडी ग्रंथाची ॥२७॥जेथ चांचरे चंडकिरण । तेथ खद्योता पुसे कोण । तेंवि मानव मतिहीन । केंवि व्याख्यान करूं शके ॥२८॥हें ऐकोनि हास्यवदनें । सद्गुरु म्हणे हें बोलणें । तुवांचि बोलावें बाळपणें । येर शहाणे नादरती ॥२९॥कांसे लागोनि निस्तरतां । कासया मानावी दुस्तरता । कीं कडिये बैसोनियां जातां । पथदुर्गमता कायशी ॥३०॥तैसें तुझें अंतःकरण । आम्ही स्वसत्ता अधिष्ठून । जें जें प्रकाशू व्याख्यान । तें तव वदन वदेल ॥३१॥आतां द्वितीय एकादशिनी । उपाइली ते वाखाणूनि । परमामृताची परगुणी । करी श्रवणीं बैसतया ॥३२॥ऐशिया वरदआज्ञापूर्णिमा । प्रकटी पूर्णोत्साह पूर्णिमा तेणें दयार्णवींचा प्रेमा । सांडूनि सीमा उचंबळे ॥३३॥मग सद्गुरूचें सदय ध्यान । हृदंबुजीं प्रतिष्ठून । द्वादशाध्यायाचें व्याख्यान । मागे अवधान परिसावया ॥३४॥ज्ञानाज्ञान द्विप्रकार । वत्स बक द्विरूपधर । तो मारूनि दंभासुर । स्वभक्तनिकर तोषविला ॥३५॥आतां महामोह अघासुर । तेणें गिळिले निगमानुचर । हें देखोनि मुरलीधर । करी संहार अघाचा ॥३६॥महासर्पाचें शरीर । कपटें धरूनि अघासुर । गिळितां कृष्णेंशीं अनुचर । झाला असुर निर्मुक्त ॥३७॥संवगडियांशीं नंदनंदन । अघापोटीं प्रवेशोन । अघासुराचें केलें हनन । हें व्याख्यान द्वादशीं ॥३८॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP