मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|देवी विजय| श्रीदुर्गास्तोत्र देवी विजय श्रीनित्यानंदतीर्थ यांचा परिचय देवीची पूजाविधी व फलप्राप्ती मंगलाचरण अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा श्रीदुर्गास्तोत्र श्रीमहालक्ष्मी स्तोत्र नामावली जप नवरात्रसंकल्प श्रीमहालक्ष्मीची आरती श्रीदुर्गास्तोत्र केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे. Tags : devidurgamarathipuranstotraदुर्गादेवीपुराणमराठीस्तोत्र श्रीदुर्गास्तोत्र Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीदुर्गायै नमः ॥नगरांत प्रवेशले पंडुनंदन । तों देखिला दुर्गास्थान । अर्मराज करी स्तवन । जगदंबेचें तेधवां ॥१॥जय जय दुर्गे भुवनेश्वरी । यशोदागर्भसंभवकुमारी । इंदिरारमण सहोदरी । नारायणी चंडिके अंबिके ॥२॥जय जय जगदंबे विश्वकुटुंबिनी । मूलस्फूर्ति प्रणवरूपिणी । ब्रह्मानंदपददायिनी । चिद्विलासिनी अंबिके तूं ॥३॥जय जय धराधरकुमारी । सौभाग्यगंगे त्रिपुरसुंदरी । हेरंबजननी अंतरीं । प्रवेशीं तूं धामुचे ॥४॥भक्तहृदयारविंदभ्रमरी । तुझे कृपाबळें निर्धारी । अतिमूढ निगमार्थविवरी । काव्यरचना करी अद्भुत ॥५॥तुझिये कृपावलोकनें करून । गर्भाधासी येतील नयन । पांगुळ करील गमन । दूर पंथें जाऊनि ॥६॥जन्मदारभ्य जो मुका । होय वाचस्पतिसमान बोलका । तूं स्वानंदसरोवर मराळिका । होसी भाविकां सुप्रसन्न ॥७॥ब्रह्मानंदे आदिजननी । तंव कृपेची नौका करुनि । दुस्तर भवसिंधु उल्लंघूनि । निवृत्तीतटां जाईजे ॥८॥ जय जय आदिकुमारिके । जय जय मूलपीठनायिके । सकलसौभाग्यदायिके । जगदंबिके मूलप्रकृतिके ॥९॥जय जय भार्गवप्रिये भवानी । भयनाशके भक्तवरदायिनी । सुभद्रकारिके हिमनगनंदिनी । त्रिपुरसुंदरी महामाये ॥१०॥जय जय आनंदकासारमराळिके । पद्मनयने दुरितवनपावके । त्रिविधतापभवमोचके । सर्व व्यापके मृडानी ॥११॥शिव मानसकनकलतिके । जय चातुर्यचंपक कलिके । शुंभनिशुंभदैत्यांतके । निजजनपालके अपर्णे ॥१२॥तव मुखकमलशोभा देखोनी । इंद्रबिंब गेलें विरोनी । ब्रह्मादिदेव बाळें तान्हीं । स्वानंदसदनीं निजविसी ॥१३॥जीव शिव दोन्हीं बाळकें । अंबे त्वां निर्मिलीं कौतुकें । स्वरूप तुझें जीव नोळखे । म्हणोनि पडला आवर्ती ॥१४॥शिव तुझें स्मरणीं सावचित्त । म्हणोनि तो नित्यमुक्त । स्वानंदपद हातां येत । तुझे कृपेनें जननिये ॥१५॥मेळवूनि पंचभूतांचा मेळ । त्वां रचिला ब्रह्मांड गोळ । इच्छा परततां तत्काळ । क्षणें निर्मूळ करिती तूं ॥१६॥अनंत बालादित्य श्रेणी । तंव प्रभेमाजीं गेल्या लपोनी । सकल सौभाग्य शुभकल्याणी । रमारमण वरप्रदे ॥१७॥जयशंबररिपुहरवल्लभे । त्रैलोक्य नगरारंभस्तंभे । आदिमाये आत्मप्रिये । सकलारंभे मूलप्रकृती ॥१८॥जय करुणामृतसरिते । भक्तपालक गुणभरिते । अनंतब्रह्मांड फलांकिते । आदिमाये अन्नपूर्णे ॥१९॥तूं सच्चिदानंदप्रणवरूपिणी । सकल चराचरव्यापिनी । सर्गस्थित्यंतकारिणी । भवमोचनी ब्रह्मानंदे ॥२०॥ऐकोनि धर्माचे स्तवन । दुर्गा जाहली प्रसन्न । म्हणे तुमचे शत्रु संहारीन । राज्यीं स्थापीन धर्मातें ॥२१॥तुम्ही वास करा येथ । प्रगटो नेदीं जगांत । शत्रू क्षय पावती समस्त । सुख अद्भुत तुम्हां होय ॥२२॥त्वां जें स्तोत्र केलें पूर्ण । तें जे त्रिकाळ करिती पठण । त्यांचे सर्व काम पुरवीन ॥ सदा रक्षीन अंतर्बाह्य ॥२३॥इति श्रीयुधिष्ठिरविरचितं श्रीदुर्गास्तोत्रं समाप्तम् ॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP