मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|देवी विजय| अध्याय तिसरा देवी विजय श्रीनित्यानंदतीर्थ यांचा परिचय देवीची पूजाविधी व फलप्राप्ती मंगलाचरण अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा श्रीदुर्गास्तोत्र श्रीमहालक्ष्मी स्तोत्र नामावली जप नवरात्रसंकल्प श्रीमहालक्ष्मीची आरती अध्याय तिसरा श्रीनित्यानंदतीर्थविरचित श्रीमार्कण्डेयपुराणांतर्गत श्रीदेवीविजय. Tags : devimarathipuranदेवीपुराणमराठी अध्याय तिसरा Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ ऋषी म्हणे सैन्य मारिलें अंबेनें ॥ हें पाहूनि चिक्षुर असुरानें ॥ अंबेची सेना मर्दीत आण ॥ युद्धा आपण अंबिकेसी आला ॥१॥देवीवरी शरवृष्टी करी ॥ असुर वर्षें शरधारीं ॥ जैसा मेघ गिरीशृंगावरी ॥ धारा वर्षाव करी तैसा तो ॥२॥देवी लीलें स्वशरें करून ॥ बाण त्याचे तोडूनि संपूर्ण ॥ अश्वसारथीसह बाण ॥ टाकूनि प्राण घेतला त्याचा ॥३॥लीलें करूनि ध्वज छेदिलें ॥ धनुष्य त्याचें द्विखंड केलें ॥ तीक्ष्ण बाणे देह खिळिलें ॥ कौतुक दाविले महासुरा ॥४॥तो छिन्नधनू दैत्य विरथी ॥ हताश्व पाहे सहसारथी ॥ ढालपट्टा तो घेऊनि हातीं ॥ धावें शीघ्र गती अंबेवरी ॥५॥असुर तो सिंहमस्तकावरी ॥ खङ्ग हाणीतला तीक्ष्णधारीं ॥ देविसि खङ्गसव्य भुजावरी ॥ तियेसी मारी प्रबळबळें ॥६॥खङ्गबाहुवरीं येतां दारुण ॥ पाडिला तो भूमीवरी मोडून ॥ असुर शूल घेऊनि सत्राणें ॥ क्रोधें दारुण उसळला ॥७॥ शूल टाकी भद्रकाळीवरी ॥ क्रोध आला असुरासिं भारी ॥ सतेज झळके तीक्ष्णधारी ॥ सूर्य पृथ्वीवरी येत जैसा ॥८॥येता पाहोनि सतेज शूल ॥ देवी टाकी आपला त्रिशूल ॥ शूलाचे शतखांडें तात्काळ ॥ करूनि टाकिलें असुरासह ॥९॥चिक्षुरासुरा मारिल्यावरी ॥ सक्रोधें धांवला दुराचारी ॥ चामर बैसोनि गजावरी ॥ देवी सेनेवरी धांवला ॥१०॥देवीवरी तो शक्ति टाकितां ॥ हुंकार करी जगन्माता ॥ शक्तीचें तेज निघोनि जातां ॥ हततेज होतां धरणी पडली ॥११॥तेजहीन पडतां ते शक्ती ॥ असुर पेटला क्रोधाप्रती ॥ चामर तो मारी शूलघातीं ॥ देवी स्वशरघातीं तोडिला शूल ॥१२॥सिंह तो उडाला तत्क्षणीं ॥ गजस्कंधीं असुरा पाहूनी ॥ बाहुयुद्धे युद्ध दोघेजणीं ॥ परस्परें रणीं मिसळले ॥१३॥दोघे करितां युद्ध दारुण ॥ उतरे असुर गजावरून ॥ येकमेकाते जय इच्छून ॥ मार दारुण ते करिती ॥१४॥सिंह सवेगवेगें उड्डाणें ॥ काय केला तळी येउन ॥ करप्रहारे तयासी ताडन ॥ करूनि प्राण घेतला त्याचा ॥१५॥उदग्रारणी देवी जे आपण ॥ शिलावृक्षघातें घेत प्राण ॥ करालद्रंष्ट्रा मारी बुक्क्यानें ॥ चपराकेनें मारिलें ॥१६॥देवी हातीं गदा घेऊन ॥ उद्धता कोपें करूनि चूर्ण ॥ गोफणानें बाष्कळा मारून ॥ ताम्रअंधका बाणें मारिलें ॥१७॥उग्रास्य उग्र वीर्यासी ॥ आणीकही त्या महाहनूसी ॥ त्रिनेत्रासह त्रिशूलेसी ॥ मारी वेगेसी परमेश्वरी ॥१८॥विडालासी खङ्ग घेऊन ॥ करी त्याचें शिर निकृंतन ॥ दुर्धर दुर्मुखाचाही प्राण ॥ बाण मारून घेतला त्याचा ॥१९॥स्वसैन्य मारिलें अपार ॥ तें पाहोनिया महिषासुर ॥ महिषरूप धरी असुर ॥ देवीगणा फार करी त्रास ॥२०॥तुंड प्रहार करी कोणासी ॥ कोणा मारी लत्ताप्रहारेसीं ॥ शेंपाटीनें हाणोनि येकासी ॥ आणिकांसी शिंगें फाडित ॥२१॥वेगासरिखे मारी येकासी ॥ नादें भ्रमणेही आणिकासी ॥ कितियेक मारी निश्वाससी ॥ ऐसें बहुतांशी मारूनि पाडिलें ॥२२॥पाडूनि ऐसें प्रमथगण ॥ धांवला तो असुर दारुण ॥ देवीच्या सिंहावरी आपण ॥ क्रोधें येतां जाण कोपली अंबा ॥२३॥पराक्रमी तोही कोंपे असुर ॥ खूर खरडी तो भूमीवर ॥ मोठे मोठे उंच गिरिवर ॥ शब्देंचि थोर ढाळी ॥२४॥सवेग तो भ्रमतां खुरानें ॥ पृथ्वी होतसे विदारण ॥ समुद्रा हाणोनि शेंपाटीनें ॥ उदकमय जाण करीतसे ॥२५॥शिंगानें त्याचा उदंडा ॥ मेघ होती खंडखंड ॥ त्याचा विश्वासमात्रें प्रचंड ॥ पडती उदंड पर्वत ॥२६॥ऐसा क्रोधें श्वासोच्छ्वास थोर ॥ टाकीत धांवला महाअसुर ॥ चंडिके आला क्रोध अपार ॥ वधावया असुर ते काळीं ॥२७॥मग देवीनें पाश घालून ॥ असुरा टाकिलें बांधुन ॥ तो बद्ध असतांही पाशानें ॥ महिरूप त्यानें टाकिलें ॥२८॥त्या काळीं सिंह झाला असुर ॥ अंबिका पाहोनि त्याचें शिर ॥ छेदिलें नाहीं तव त्वरें ॥ दिसे खङ्गपाणी पुरुष तो ॥२९॥देवी त्या पुरुषा पाहून ॥ मारी तयासी घेऊनि बाण ॥ तो खङ्ग चर्मासी सहजाण ॥ झाला मत्त वारण तत्क्षणीं ॥३०॥शुंडेनें वोढितो सिंहासी ॥ पुनः पुनः गर्जे तो अवेशीं ॥ देवीनें हातीं घेवो अशी ॥ शृंडा तत्क्षणेंशीं तोडिली ॥३१॥मग तो होऊनि महासुर ॥ महिषाचा देहधरी थोर ॥ असुर झोबवूं लागे अपार ॥ सचराचर तिन्हीं लोक ॥३२॥अंबिकेसी कोप आला ॥ ते पान करी मद्य प्याला ॥ पुनःपुन्हा पीते मद्या ॥ ताम्रनेत्रीं ते वेळां अट्टहास्य करी ॥३३॥असूरही नाचे थयथया ॥ बळवीर्यमदें गर्व तया ॥ पर्वतशृंगें उपडूनियां ॥ अंबेवरी त्या टाकितो ॥३४॥अंबिका घेवोनि तीक्ष्ण शर ॥ चूर्ण अक्रितसे ते भूधर ॥ वचन माझें ऐक हे असुर ॥ क्रोधें थोर बोले त्यासी ॥३५॥मूढा क्षण येक गर्जना करी ॥ मी मधु न प्याले तव वरी ॥ तुज मी येथेंचि वधिल्यावरी ॥ गर्जतील लवकरी देवता त्या ॥३६॥ऋषी म्हणे ऐसें बोलुनि शीघ्र उडाली ॥ असुरपृष्ठी आरूढली ॥ लीळेचि पायीं त्यासी खिळी ॥ शूल हाणिला मस्तकीं त्याच्या ॥३७॥पादें आवळिला असतां असुर ॥ महिषमुखीं निघे शरीर ॥ तो अर्धाचि निघतां बाहेर ॥ समग्र शरीर येवोनेदी ॥३८॥तो अर्धाचि निघोनी आपण ॥ युद्ध करी असुर दारुण ॥ देवीनें खङ्गघातें करून ॥ मस्तकछेदन केलें त्याचें ॥३९॥त्रैलोक्यांत भूतें जे समस्त ॥ जयजयकार शब्दें गर्जत ॥ महिषासुराचा केला घात ॥ सुरनर नाचत आनंदें ॥४०॥हाहाकारें गर्जती दैत्य जाण ॥ नासलें नासलें दैत्यसैन्य ॥ हर्ष झाला उत्कृष्ट पूर्ण ॥ सर्व देवगण आनंदले ॥४१॥देवी आनंदली देवा सर्व ॥ आनंदला ऋषींचा समुदाय ॥ गंधर्व गायन करिती अपूर्व ॥ अप्सरा सर्व नाचती ॥४२॥सहस्रनेत्र आदि करून ॥ देव समस्तही मिळून ॥ स्तवन आरंभिले संपूर्ण ॥ महिषासुरा जाण मारिल्यावरी ॥४३॥नित्यानंदाची जननी ॥ भक्त संतोषली भवानी ॥ महिशासुरमर्दन कहाणी ॥ प्राकृतवाणी करविली ॥४४॥ऐसी कथा सुमेधा ऋषी ॥ सांगतां झाला सुरथ राजासी ॥ नित्यानंद विनवी श्रोत्यांसीं ॥ पुढील कथेसी अवधान द्यावे ॥४५॥इति श्रीदेवीविजय ग्रंथ ॥ मार्कंडेय सांगे भागोरी ऋषीतें ॥ तृतीयाध्याय समाप्त ॥ जगदंबाप्रीत्यर्थ असो हा ॥४६॥इतिश्री देवीविजय ग्रंथ तृतीयाध्याय समाप्तः ॥श्री॥ ॥ ॥॥ इति श्रीदेवीविजय तृतीयाध्याय समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP