मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|देवी विजय| अध्याय सोळावा देवी विजय श्रीनित्यानंदतीर्थ यांचा परिचय देवीची पूजाविधी व फलप्राप्ती मंगलाचरण अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा श्रीदुर्गास्तोत्र श्रीमहालक्ष्मी स्तोत्र नामावली जप नवरात्रसंकल्प श्रीमहालक्ष्मीची आरती अध्याय सोळावा केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे. Tags : devimarathipuranदेवीपुराणमराठी अध्याय सोळावा Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ऋषी म्हणे नंदा भगवती या नामेंकरून ॥ नंदापासून होईल जाण ॥ तिचें स्तवन पूजन ध्यानें ॥ तो वश्य करील जाण तिन्हीं लोक ॥१॥उत्तम कनककांती ऐसी ॥ कांचन वस्त्र झळकें कांचेसी ॥ देवी शोभते सुवर्णप्रभा तैसी ॥ उत्तम कनकभूषणेंसी भूषित ॥२॥कमळ अंकुश पास अस्त्र ॥ तेणेंसी अलंकृत चतुर्भुज ॥ इंदिरा कमला लक्ष्मी सहज ॥ बैसें कनकाब्जे आसनीं ॥३॥ते रक्तदंतिका नामें करून ॥ देवी म्यां बोलिला तुजलागून ॥ स्वरूप तियेचें मी सांगेन ॥ ऐक भयनाशन होय जेणें ॥४॥रक्तवर्ण वस्त्र आरक्त ॥ अंगी आरक्त भूषणें भूषित ॥ आरक्त नेत्र रक्तायुधें शोभती हात ॥ केशही आरक्त अतिभयंकर ॥५॥आरक्त नखें अति तीक्ष्ण ॥ दांतदाढाही रक्तवर्ण ॥ पतिव्रता अनुसरे भर्त्यालागून ॥ त्यासी भक्तजना देवी भजे ॥६॥पृथ्वी ऐसी विस्तीर्ण ॥ मरूसरिखे जिचें स्तन ॥ अत्यंत स्थूल लंबायमान ॥ आकृतीप्रमाणें मनोहर ॥७॥देदीप्यमान अति कठोर ॥ सर्व आनंदाचाचि समुद्र ॥ भक्तालागीं पाजवी सत्वर ॥ सर्व काम दुभणार ऐसे स्तन ॥८॥खङ्गपात्र मुसळ जाण ॥ नांगराचें करी धारण ॥ रक्त चांमुडाविख्यात जाण संपूर्ण ॥ योगाची स्वामिण देवी परमेश्वरी ॥९॥जिनें व्यापिले सकळ लोक ॥ जग सर्वही स्थावरजंगमात्मक ॥ हिचा जो भक्तियुक्त पूजक ॥ चराचर व्यापक होतसे तो ॥१०॥जो करील नित्य अध्ययन ॥ रक्तदंतिकेचें स्तवन ॥ करी सेवा संपूर्ण देवी त्याची ॥ पतीचें जाण पतिव्रता जेवी ॥११॥शाकंभरी नीलवर्ण ॥ नीलोत्पला ऐसें जियेचे नयन ॥ नाभी सखोल त्रिवळी जाण ॥ उदर शोभायमान जियेचें ॥१२॥अतिकठोर उंच दोन्हीं ॥ वर्तुळ मोठें घन स्तनी ॥ बैसलीं हातीं कमळबाण घेउनी ॥ कमळासनी सुशोभित ॥१३॥पुष्पपल्लवमूळ आदिकरून ॥ फलादिशाका संग्रहून ॥ अनंत रसयुक्त संपूर्ण ॥ क्षुधातृषा मरणजरानाशक ॥१४॥देदीप्यमान धनुष्यही ॥ धारण करूनि परमेश्वरी पाही ॥ शाकंभरी शतनेत्रींही ॥ म्हणती दुर्गाही तिजलागुन ॥१५॥शाकंभरीसी स्तविती ध्याती ॥ जपिती पूजिती नमन करिती ॥ अक्षयीं त्या भोगप्राप्ती ॥ अन्नपानादि संपत्ती लौकर ॥१६॥भीमादेवी ते नीलवर्ण ॥ दांतादाढा अतिभीषण ॥ विशाल नयन देदीप्यमान ॥ वर्तुळ पीनस्तनी ते ॥१७॥प्रचंड हास्य डमरू करीं ॥ नरकपाळाचें पात्र करीं ॥ एकवीरा काळरात्री ॥ कामनादात्री बोलिली भक्ता ॥१८॥तेजोराशी देदीप्यमान ॥ भ्रामरी ते विचित्र वर्ण ॥ करी चित्रविचित्र भ्रमण ॥ महामारी जाण म्हणती तिसी ॥१९॥या प्रकारें मूर्ती देवीच्या मंगळ ॥ तुज राजा सांगितल्या सकळ ॥ जगन्माता चंडिकेच्या केवळ ॥ कामधेनु प्रबळ सर्व त्या ॥२०॥हे जे कां अतिरहस्य ॥ राजा न सांगावें तुवां कवणास ॥ या दिव्य मूर्तीचा कथासौरस । देती मनास अभीष्टफळ ॥२१॥तेचि कथा इथंभूत ॥ भागोरी ऋषीसी अत्यद्भुत ॥ ऋषी मार्कंडेयसमस्त ॥ समाप्तपर्यंत सांगितली ॥२२॥कथा झाली संपूर्ण ॥ कोंदाटली जगन्माता आपण ॥ नित्यानंद श्रोत्या करी विनवण ॥ अबद्धसुबद्ध वर्णन म्यां केलें ॥२३॥संतश्रोते सज्ञान तुम्ही ॥ अव्युत्पन्न अज्ञान असतांही मी ॥ मजपासून बोलविलें स्वामी ॥ हें सामर्थ्य म्हणे मी तुमचेची ॥२४॥वेडेवांकुडे माझें बोलणें ॥ म्हणूनि तुम्हां मी येतसे शरण ॥ मज अनाथा कराल सज्ञान ॥ ज्ञानसंपन्न तुम्ही सकळ ॥२५॥ऐसी वक्त्याची विनंती ॥ ऐकूनि संतोषलें संतश्रोती ॥ म्हणती तुला देवीच बोलविती ॥ मुखीं वस्ती करूनियां ॥२६॥तूं तरी केवळ मूर्ख ॥ हें आम्हांसी असे ठाऊकें ॥ परी देवीचाचि प्रसाद देख ॥ आम्ही सकळिक मानितों ॥२७॥नको आम्हां करूं विनवण ॥ देवी असे तुला प्रसन्न ॥ ऐसें ऐकूनि संतवचन ॥ नित्यानंदतीर्थ येती ॥२८॥पदपुष्पें वेंचूनि बुद्धीच्या हातीं ॥ ओव्याबद्ध माळाबुक्ती ॥ अध्यायीं ग्रंथिते एकोणविस ॥२९॥धूपदीपनैवेद्य संपूर्ण ॥ पूजा सर्वही शब्दचि करून ॥ अंबे केलें तुज अर्पण ॥ मी अपराधी जाण जगन्माते ॥३०॥नसतांचि सक्ती नसतां ज्ञान ॥ कथा केली तुझी म्यां वर्णन ॥ क्षमा करी नेणता म्हणून ॥ अंबे तान्हें बाळ मी तुझें ॥३१॥आपली आपण कथा ॥ तूंचि होऊनियां वक्ता ॥ नित्यानंदा करूनि निमित्ता ॥ केलें ग्रंथा समाप्त तुवांची ॥३२॥ग्रंथासी देईं वरदान ॥ जो करील याचें श्रवणपठण ॥ त्यासी चतुर्विध पुरुषार्थ देऊन ॥ कुळपरंपरा जाण नांदवी ॥३३॥हा श्रीदेवीविजय ग्रंथ ॥ मार्कंडेयपुराणसंमत ॥ येथूनि झाला समाप्त ॥ जगदंबाप्रीत्यर्थ असो हा ॥३४॥मन्मथनाथ संवत्सरीं जाण ॥ शके सस्त्राशेंसत्तावन्न ॥ पवित्र त्यांतही उत्तरायण ॥ हरिदिन पौष वद्य ॥३५॥गुरुवारी सप्तऋषी क्षेत्रीं ॥ ग्रंथ समाप्त दिवा दोप्रहरीं ॥ झाला हनुमत्संन्निधीं भीतरीं ॥ नागेशार्पण करी नित्यानंद ॥३६॥इतिश्रीदेवीविजय ग्रंथ षोडशोध्याय समाप्त ॥श्री॥श्री॥श्री॥॥ श्रीदेवीविजय षोडशोध्याय समाप्त ॥॥ इति श्रीदेवीविजय समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP