मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशव दत्त| अध्याय १३ वा केशव दत्त अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा भगवान गोपालकृष्ण - अध्याय १३ वा प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे. Tags : gopalkeshav dattakrishnamarathiकाव्यकृष्णकेशव दत्तगोपालमराठी अध्याय १३ वा Translation - भाषांतर नम: परम कल्याण । नम: परम् मंगल । वासूदेवाय शांताय । यदुनाम पतयेनम: । श्रीसद्गुरु केशवदत्त । होते अति प्रसिध्द । ज्ञानेश्वरीचे सिध्दहस्त । भाष्यकार म्हणोनी ॥१॥ज्ञानवंत प्रज्ञावंत । विवेकी विरागी विचारवंत । अलौकिक कृष्णभक्त । कीर्ति पसरली तयांची ॥२॥महाराजांचे विद्वताप्रचुर । निरुपण ऐकोनी सुमधुर । मनें श्रोत्यांची जणुं मयूर । होवोनी नाचती स्वच्छंदे ॥३॥ज्ञानसंपदा केशवांची । व्याप्ति जणूं विश्वाची । अथांगता सागराची । अंत न ठावा तियेसी ॥४॥संत केशवांची व्याख्यानें । नामसंकीर्तन वा प्रवचनें । अद्वितिय तयांच्या प्रज्ञेनें । रिझविती मनें श्रोत्यांची ॥५॥ज्ञानप्रभा तयांची । प्रखर इतुकी असावयाची । मति तेणें भाविकांची । क्षणभर व्हावी दिङमूढ ॥६॥महाराजांच्या जिव्हेवरती । वक्तृत्वाची सरस्वती । बसली होती ओघवती । गंगेसारखी स्वोज्वल ॥७॥शब्दाशब्दांची मौक्तिके । बुलंद होऊनी कौतुकें । ओघळावी केशवांच्या मुखे । अचपळ होऊनी ॥८॥अमृतासारखे तयांचे शब्द । कानीं पडतां मंत्रमुग्ध । होतसे सकल श्रोतृवर्ग । निरुपण श्रींचे ऐकोनी ॥९॥उप्रेक्षा अलंकाराचे वैभव । उभे राहावे सावयव । सौख्य धृति अभिनव । मिळे भाग्यें श्रोतृजना ॥१०॥महाराजांच्या मुखांतून । येणारे मुक्त ज्ञानकण । मधुमक्षीके सारिखे जतन । हृदयीं करिती मुमुक्षु ॥११॥वेद वैदिक ग्रंथांचा । विपुल होता व्यासंग त्यांचा । त्या कारणे विविध-विषयांचा । उहापोह होई प्रवचनीं ॥१२॥आध्यात्म विषया खेरीज । समाज वा राजकारण सहज । हाताळीत असत महाराज । निरुपणात आपुल्या ॥१३॥रामायण महाभारत । संत साहित्य भागवत । पुर्णत्वें होते अवगत । केशवदत्त प्रभुंना ॥१४॥प्रवचनाच्या संदर्भात । विचार अति तर्कशुध्द । देऊनी उदाहरणें विविध । रंगवीत निरुपण आपुलें ॥१५॥उपमा अलंकाराची उधळण । ठाई ठाई करून । दृष्टांताची सुरेख पखरण । करीत केशव विवेचनीं ॥१६॥साहित्य सौंदर्याची समिक्षा । ज्ञानविज्ञानाची कक्षा । तत्वज्ञानाची मिमांसा । निवेदीत केशव सुलभारिती ॥१७॥मंत्र तंत्र ज्योतिष । ग्रह नक्षत्र-पीडा भविष्य । इत्यादि विषयांचा समावेश । केशव करीत प्रवचनीं ॥१८॥अभंग गवळणी भारुडे । कटाव ओव्यां श्लोक फटके । गोड गळ्यानें गाऊनी नेटके । बहार आणिती निवेदनीं ॥१९॥गातां एकनाथाची गवळण । किंवा राधेगोविंद नामस्मरण । गर्जतां, तयाचे अंत:करण । भक्तिप्रेमे वाहे दुथडी ॥२०॥प्रवचनांतही कधीं कधीं । लागे तयांना भावसमाधी । मग श्रोत्याचीहि ब्रह्मानंदी । टाळी लागे अवचित ॥२१॥श्रीकृष्णलीला वर्णन । महाराज जैं करिती कथन । तेव्हां त्यांच्या प्रज्ञेतून । गोकुळ दिसे प्रत्यक्ष ॥२२॥कृष्णभक्तीची भावसमाधी । लागे जेव्हां केशवांची । तेव्हां भाविका भगवंताची । मूर्ति दिसे सामोरी ॥२३॥घननीळा शामसुंदर । राधिकेचा मुरलीधर । सांवळा सुकुमार मनोहर । सावयव ठाके प्रवचनीं ॥२४॥ज्ञानेश्वरी आणि ज्ञानदेव । होते तयांचे सर्वस्व । धमनीतून गीता-तत्व । वाहे रुधिरा ऐवजी ॥२५॥ज्ञानदेवाची अमृत ओवी । एक तरी अंगी वागवावी । भवसिंधू पार करावी । सहज, म्हणती केशव ॥२६॥हें विश्वची माझे घर । विचार अंतरी निरंतर । वागविता या भूवर । कलह अशांति कशाची ॥२७॥किंबहुना भगवत भक्तीं । न ठेवितां आसक्ति । हीच जीवन फलश्रुती । माना म्हणती केशव ॥२८॥श्रीसद्गुरु केशवदत्त । आत्मसुखाची दिव्यज्योत । निजभक्तावरी अनवरत । वर्षाव करी सुखाचा ॥२९॥कीं ज्ञानदेवी मूर्तिमंत । होते प्रभु केशवदत्त । म्हणोनी तयांना वदत । ज्ञानेश्वरहृदय सकलजन ॥३०॥निरुपणार्थ होता आसनस्थ । श्रीसद्गुरु केशवदत्त । दीप्ति एक प्रशस्त । दिसे भोंवती तयांच्या ॥३१॥कीं भावगंगेचे प्रदर्शन । असे केशवांचे प्रवचन । शुध्द वाणीं अर्थपूर्ण । अंत:करणा भिडावी ॥३२॥तेजस्वी नेत्र तयांचे । वेध घेती हृदयाचे । मन कितक पाखंडयाचे । झीरपूं लागे हिमवत ॥३३॥मृण्मय ढेकळां सारिखे । कुविचार विरघळावे तयांचे । तिमावे रोपटें सुविचारांचे । मनी सुबोधे सात्विक ॥३४॥वितंड वादकांचे तर्क-वितर्क । वादविवादे अतर्क्य । महाराजाची प्रभा सहज । खंडण करी लिलया ॥३५॥अनेक व्यक्तींच्या मानसीचे । आचार आणि विचारांचे । मंथन करुनी प्रभु साचे । लावीत सन्मार्गी तयांना ॥३६॥नास्तिक कट्टर कितीही । विवादी हट्टी निग्रही । होतसे तात्काळ मतप्रवाही । हस्तस्पर्शे केशवांच्या ॥३७॥महाराजांचे वाक चातुर्य । होते बहु अवर्णनीय । भावनांचे अनिवार्य । चढ उतार दिसावे ॥३८॥शैलीपूर्ण प्रवचनांत । नम्रता असे नितांत । आग्रह उपरोध तयांत । किंचितही नसावा ॥३९॥राधे गोविंद राधे गोविंद । प्रवचनी चढे जै रंग । श्रोतृवर्ग मग होई दंग । मोहरूनी जाई वसंता परी ॥४०॥राव रंका पासोन । पंडित शास्त्री सामान्य । अर्थवाही तयांचें प्रवचन । सुलभ राही सकलांसी ॥४१॥आदिवासी, कातकरी । स्पृश्य अस्पृश्य शेतकरी । कामकरी वा पुढारी । येती प्रवचना बहुसंख्ये ॥४२॥आध्यात्म-ज्ञान सहज सुंदर । उमजावे सकल थरावर । कटाक्ष केशवांचा यावर । उत्कटपणें असावा ॥४३॥आध्यात्म वल्लीची लावणी । संत वाङ्मयाचे घालोनि पाणी । सहज सुलभे रुजविली मनीं । कंशवांनी भक्तांच्या ॥४४॥सदविचारांची पेरणी । मुक्त हस्तें करोनी । जनतेच्या मनीं केशवांनी । पिक उभविले भक्तीचे ॥४५॥भक्ति-प्रेमाचा ज्ञानाकुंर । घालोनी हळुवार फुंकर । केशवांनी लाविला घरोघर । कल्याणप्रद मानवा ॥४६॥महाराजांची अमृतवाणी । भाग्ये जयांच्या पडली कानीं । ते पुण्यवंत शिरोमणी । पूर्व जन्मीचे म्हणावे ॥४७॥अर्चा, परिषदेचा वृतांत । कथिला तुम्हां साद्यंत । द्वादशोध्यायीं विशोधित । रसिका अवगत असेल ॥४८॥यश या कार्याचें उज्ज्वल । झाले तात्काल सफल । भागवत धर्म मंडळ । स्थापन करीतां केशवांनी ॥४९॥केंद्रें मंडळाची बहुत । ठिकठिकाणीं झाली स्थापित । कार्यकर्ते अति उत्साहित । येऊनी मिळाने केशवांना ॥५०॥या कामीं बहुमोलाची । साथ मिळाली सव्यसाची । मदनभाई पटेल यांची । केशवदत्त गुरुंना ॥५१॥सदर केंद्रातर्फे विविध । परिक्षा होत धार्मिक । परितोषकें दिली जात । प्रतिवर्षीं छात्रांना ॥५२॥रोख पैसे वा पुस्तकें । कुणाला प्रशस्ति पत्रकें । केशवगुरु निज हस्तें । देती उत्तेजनार्थ ॥५३॥इंग्रजी वा मराठी । शाळेचे कैक विद्यार्थी । हौसेनें या स्पर्धेसाठी । केंद्रीं येती संघाटे ॥५४॥गीताध्याय, ज्ञानेश्वरी पठण । वाङ्मय चर्चा निबंध लेखन । संत साधुची चरित्रें कथन । विषय असावे परिक्षेचे ॥५५॥संत वाङ्मयाचे परिशीलन । केल्यानेच बालपण । होते संस्कृती संपन्न । सिध्दान्त होता केशवांचा ॥५६॥सात्विक विचारांची पेरणी । करीतां केवळ बालपणीं । सतप्रवृत्तीची विचारसरणी । साक्षेपे लागते वाढीस ॥५७॥याच विचारांचे सूत्र । हाती धरोनी केशवदत्त । संतवाङ्मयाच्या प्रचारार्थ । उद्युक्त झाले जीवनीं ॥५८॥एकदां सद्गुरु केशवदत्त । धरण गांवच्या मुक्कामांत । लाहोर कॉलेजच्या सुसंस्कृत । प्राध्यापकासी भेटले ॥५९॥प्राध्यापक महाशय । होते बहुश्रुत निरतिशय । सुशील आणि विनयशील । नावाजलेले सज्जन ॥६०॥आदरे केशवांचे स्वागत । करोनी ते प्रज्ञावंत । म्हणाले धन्य धन्य भाग्यवंत । आज आम्ही जाहलों ॥६१॥मग केशव दयाघन । बोलिले प्राध्यापका लागुन । आपण अभ्यासु विद्वान । पंडित गिर्वाण भाषेचे ॥६२॥चर्चा एका विषयावर । करावी तुमच्याबरोबर । ऐकावे आपुले विचार । हेतु आमच्या मनीचा ॥६३॥संस्कार वा धर्मबंधन । मंत्र तंत्राचे संवर्धन । प्रायोगिक तयाचें संशोधन । प्रमेय आपुल्या मंथनाचें ॥६४॥या प्रकांड विषयावर । चर्चा विद्वत्ताप्रचूर । उभयां मध्यें घटकाभर । झाली खेळीमेळीनें ॥६५॥या चर्चेच्या अंतर्भुत । काढिला तयांनी निष्कर्ष । तो करितों तुम्हां विशद । रसिका पुढीलप्रमाणें ॥६६॥जे आत्मस्वरूपाचे दर्शन । श्रवण, मनन निधिध्यासन । करी समष्टीचे कल्याण । त्या म्हणावें संस्कृती ॥६७॥अहिंसा शांति अक्रोध । सौजन्य चित्तवृत्ति-निरोध । विभूती चिंतन सश्रध्द । या नांव संस्कृती ॥६८॥सत्यता क्षमा निग्रह । कर्मयोगी अपरिग्रह । विश्वदेखे वासुदेव । या नांव संस्कृती ॥६९॥हानी लाभ सुखदु:ख । जरा मरण खंत खेद । विवेके न करी भेद । या नांव संस्कृती ॥७०॥ज्या योगे संस्कृती वर्धन । होते रक्षण व आचरण । जो अभ्युदयार्थ धारण । करणें त्या धर्म म्हणावे ॥७१॥पवित्र या भारतात । संत सज्जन प्रेषित । प्रत्यक्ष युगेयुगे भगवंत । धर्मा कारणे अवतरले ॥७२॥जो स्वभावे नेमिले कर्म । विवेके वागवी नित्यनेम । राखोनी आपुला प्रियधर्म । आत्मोध्दार करितसे ॥७३॥याच आधार मुख्यत्वे । धर्म कारणाची मूलतत्वे । शिकवावी विशेषत्वे । विद्यार्थ्यांना शैशवी ॥७४॥गीता ज्ञानेश्वरी भागवत । वेद उपनिषदे धर्मग्रंथ । रामायण आणि महाभारत । हाती द्यावे तयांच्या ॥७५॥ऐशा वाङ्मयाचे वाचन । मनन आणि अध्ययन । करील निश्चये जतन । धर्म भावनेचे तयांच्या ॥७६॥या विषयांचा समावेश । अभ्यासक्रमांत अवश्य । केल्यानेच राष्ट्रोत्कर्ष । साधेल म्हणाले दोघेही ॥७७॥मंत्रसिध्दि मंत्रोपचार । याही गहन विषयावर । मांडिले उभयंतानी विचार । चर्चेमाजी परखड ॥७८॥रोगराई निवारण । व्याधी पीडा क्लेशहरण । शुध्द मंत्रोच्चारे करून । फल निष्पत्ती होते मुक्कर ॥७९॥देऊन विविध दाखले । महाराजांनी हे सिध्द केले । प्राध्यापक मनी संतोषले । फिटला संभ्रम तयांचा ॥८०॥विज्ञानाच्या कसोटीतून । मंत्रविद्येचे संशोधन । व्हावें निरखून पारखून । आग्रह होता केशवांचा ॥८२॥असो मग केशवदत्त । निघाले फिरत फिरत । पुन्हां एकदां यात्रेप्रत । चारी धामें करावया ॥८३॥बद्रिकेदार रामेश्वर । द्वारका काशी भुवनेश्वर । अयोध्या मथुरा नर्मदातीर । तीर्थें किती सांगावी ॥८४॥हिमालयाच्या परिसरांत । भेटले तयांना पुण्यवंत । तपी यती साधुसंत । सुख संवाद करावया ॥८५॥परतीच्या प्रवासांत । श्रीसद्गुरु केशवदत्त । धर्म, संस्कृती प्रचारार्थ । गांवो गांवी राहिले ॥८६॥जागृती करावया जनमनीं । श्रीसद्गुरु केशवांनी । दिली रसाळ ठिकठिकाणीं । उद्बोधक प्रवचनें ॥८७॥केशवांना या सुमारास । भेटले एक सत्पुरुष । अधिकार जयांचा विशेष । होता धर्म शास्त्रांचा ॥८८॥नांव तयाचे माधवनाथ । होते अति प्रख्यात । गाढे पंडित नामवंत । कीर्ति सर्वत्र गाजलेली ॥८९॥तंव स्वकार्याची हकिगत । श्रीगुरु केशवदत्त । सांगते झाले तयाप्रत । राखोनी आदर तयांचा ॥९०॥मग उभय जणांची । धर्म संस्कृती संबधीची । प्रचार आणि कार्याची । चर्चा झाली विस्तृत ॥९१॥श्रींच्या कार्याचें कौतुक । केले माधवांनी मन:पूत । म्हणाले परी या कार्यक्रमांत । यज्ञयागाचा समावेश राहावा ॥९२॥धर्मजागृती कारणें । कीर्तनें वा प्रवचने । या खेरीज होमहवनें । अवश्यमेव असावी ॥९३॥माधवनाथांची सूचना । मान्य झाली केशवांना । मग वंदन करोनी तयांना । केशवदत्त निघाले ॥९४॥पुढें महाराजांचा मुक्काम । होईल तेथें यजनयाजन । ब्रह्मवृंद जमा करून । केले केशवांनी बहुत ॥९५॥नाम सप्ताहादि कार्यक्रम । ग्रामोग्रामीं आयोजुन । धर्मवृध्दि आणि धर्मरक्षण । केले केशव प्रभूंनी ॥९६॥अशा या कार्यक्रमास । उपस्थित राहावयास । सर्व जाती जमातीस । बंधन नसे कधीहीं ॥९७॥याच वर्षी केशवांनी । जळगांव शहर मुक्कामी । परिषद एक पुरोगामी । भरविली प्रचंड ॥९८॥वर्णाश्रम-स्वराज्य संघ । अखिल भारतीय एक संघ । नाम ऐसे सुसंबंध । उद्दिष्टानुसार ठेवले ॥९९॥हा अपूर्व मंगलमय । समारंभ सुखातिशय । यशस्वी झाला निरतिशय । प्रयत्नें प्रभु केशवांच्या ॥१००॥या परिषदेचे अध्यक्ष । होते स्वत: केशवदत्त । उपाध्यक्षपदीं थोर संत । संतोजी महाराज विराजती ॥१०१॥धार्मिक राजकीय सामाजिक । अशा संस्थांचे सर्वैक्य । हाच सर्वोत्तम मार्ग एक । राष्ट्रोन्नती कारणें ॥१०२॥या त्रयींच्या प्रयत्नें । गुलामगिरीची बंधने । तुटोनिया निश्चितपणें । देश होईल स्वतंत्र ॥१०३॥अशा प्रकारचे विविध । ठराव नानाविध । पसार झाले निर्वेध । परिषदेत त्यावेळीं ॥१०४॥पुढें केवळ तपे दोन । होताच तो सुवर्णदिन । सद्भाग्यें आला घेऊन । स्वातंत्र्य सूर्य क्षितीजावरी ॥१०५॥केशवांनी हा सोहळा । प्रत्यक्षें पाहिला स्वडोळा । नेत्रीं तयांच्या ते वेळा । आनंदाश्रू पातले ॥१०६॥इति श्रीयशोधन विरचित । श्रीसद्गुरु केशवदत्त चरित । होवो सकलां सुखद । तेरावा अध्याय संपूर्ण ॥१०७॥॥ इति त्रयदशोऽध्याय: समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : December 02, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP