मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|संतवर्णनविषयक| विठ्ठलभक्तस्तुति संतवर्णनविषयक गुरुस्तुति गुरुस्तुतिमुक्तांजलि १ गुरुस्तुतिमुक्तांजलि २ गुरुस्तुतिमुक्तांजलि ३ गुरुस्तुतिमुक्तांजलि ४ महद्विज्ञापना १ महद्विज्ञापना २ महद्विज्ञापना ३ महद्विज्ञापना ४ महद्विज्ञापना ५ विठ्ठलभक्तस्तुति पुंडरीकप्रार्थना सन्मणिमाला १ सन्मणिमाला २ सन्मणिमाला ३ सन्मणिमाला ४ ज्ञानदेवस्तव नामदेवस्तव एकनाथस्तव वामनपंडितस्तुति नरसिंहमहतास्तव तुलसीदासस्तव माधवदासस्तव कबीरस्तव साधुस्तव साधुरीति साधुसत्कार सद्वर्णन साध्वीचा महिमा विठ्ठलभक्तस्तुति मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते. Tags : moropantpoemकविताकवीमराठीमोरोपंत विठ्ठलभक्तस्तुति Translation - भाषांतर ( द्रुतविलंबितवृत्त )निजजना अमृतें बहु तर्पिती, स्वअनवे - अनवे कर अर्पिती;सतत पूर्ण मुकुंद यशोरसें न, वदना ! वद ना, म्हणती असें. ॥१॥करिति विठ्ठलभक्त सभामुखें विकसितें नटुनी स्वमहा सुखें;अहिशिरीं करि नृत्य महामना, नटप तो टपतो अवलोकना. ॥२॥अजित विठ्ठलभक्त यश:कथा करुनि, दाविति मुक्तिमहापथा;रसिकसाधुमुखांबुरुहांप्रती हंसविते सवितेचि नराकृति. ॥३॥शुकचि विठ्ठलभक्त न हें मृषा. नुरविती रसिकीं दुसरी तृषा.हरियशोरस फ़ार रुचे असा. रसिकता सिकता नुतरे कसा. ॥४॥करिति विठ्ठलभक्त कथा बरी, सुदृढ बाळहि जीस मनीं धरी;वश जयासि सदा भगवान् हरी, कुतुक या तुकयापरि भूवरी. ॥५॥सदय विठ्ठलभक्तचि तोडिती त्रिगुणजाळ, जडासहि सोडिती;प्रभुचियाहि सुसंकट जें मतें, उलगडील गडी दुसरा न तें. ॥६॥न तुकयासमशील, न नामाया, प्रिय मिळे न कळींत अनामया.वरि अभंगसमुल्लसनें रसीं, शुकवचें कवचें नृप तो जसीं. ॥७॥हरिजनोक्तिसमुल्लसनीं पटु वचन जें वदती न कधीं कटु;त्यजिति, सेवुनि ज्या, अघवासना; बलवती लवती सदुपासना. ॥८॥सुख तसें सकळांसहि वाटतें, असुख सर्व पळांतचि आटतें;निरखितांचि जसें भवपारदा मुनिजना निजनायक नारदा. ॥९॥वदति जीं वचनें परितोखदें, भवतमाप्रति होतिच ओखदें;निवविले बहु वंदुनि मागती, भजन ते जन तेथचि जागती. ॥१०॥कथिति जेथ मुकुंदयश:कथा त्यजुनि विठ्ठलभक्त भवव्यथा;निरखितां करूणामृतवृष्टिचें अजिर तें, जिरतें अघ सृष्टिचें. ॥११॥सम सदा अमृत प्रभु वर्षतो, निवुनि सर्वहि सेवक हर्षतो;घनचि विठठल, भक्त मयूरसा, समजला मज, लास्य करी तसा. ॥१२॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP