मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग| भूपाळ्या संत नामदेवांचे अभंग आत्मस्वरूपस्थिति उपदेश आत्मसुख भक्तवत्सलता १ श्रीचांगदेवांची समाधी ध्रुवचरित्र श्रीज्ञानेश्वरांची आदि कुटुंबातील मंडळींच्या अभंग रचना नाममहिमा संत नामदेव रचित गवळण द्रोणपर्व ह्माळसेन कथा करुणा श्रीकृष्णमाहात्म्य श्रीकृष्णलीला मुक्ताबाईची समाधी नामसंकीर्तन माहात्म्य श्रीनामदेव चरित्र श्रीनिवृत्तिनाथांची समाधी पंढरीमाहात्म्य पौराणिक चरित्रें प्रल्हाद चरित्र श्रीराममाहात्म्य रूपके श्रीज्ञानेश्वरांची समाधी श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा संतमहिमा संतचरित्रे शिवरात्रमाहात्म्य शुकाख्यान श्रीसोपानदेवांची समाधी सुदामचरित्र तीर्थावळी उपदेश विठाचे अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य श्रीविठ्ठल व पुंडलिक यांचा संवाद शिवस्तुति तुळसीमाहात्म्य चोवीस नामांचा महिमा गंगामाहात्म्य कलि प्रभाव प्रारब्धगती समाधियोगनिषेध हरिश्चंद्रराजाचें चरित्र श्रीयाळ चरित्र उपमन्यूचें चरित्र भीष्मप्रतिज्ञा रावण मंदोदरी संवाद नक्र उद्धार चोखोबाचे स्त्रीचें बाळंतपण चोखामेळ्याच्या समाधीचे अभंग विरहिणी भूपाळ्या भेट मागणें संतस्तुति जनाबाईचा निश्चय भाट आऊबाईचे अभंग लाडाईचा अभंग भूपाळ्या संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevअभंगनामदेवभूपाळी भूपाळ्या Translation - भाषांतर १. उठाउठा प्रभात जाहली । चिंता श्रीविठ्ठ्ल माउली । दीन जनांची साउली । येई धांउनी स्मरतांचि ॥१॥पंढरपुरीं जे भिमातटीं । सुंदर मनोहर गोमटी । दोन्ही कर ठेविनियां कटीं । भेटीसाठीं तिष्ठतसे ॥२॥कीरीट कुंडलें मंडित । श्रीमुख अति सुंदर शोभत । गळां बैजयंती डुल्लत । हार मिरवत तुळसीचा ॥३॥सुरेख मूर्ति सगुण सांवळी । कंठीं कौस्तुभ एकावळी । केशर उटी परिमळ आगळी । बुका भाळीं विलसतसे ॥४॥पीत पीतांबर कसला कटीं । अक्षयीं वीट चरण तळवटी । सकळ सौंदर्य सुखाची पेटी । इंद्रिय संपुष्टी आठवातें ॥५॥अति प्रिय आवडे तुळसी बुका । तसीच प्रीति करी भोळ्या भाविका । नामा पदपंकज पादुका । शिरीं मस्तकीं वंदीतसे ॥६॥२. उठा जागे व्हारे आतां । स्मरण करा पंढरिनाथा । भावें चरणीं ठेवा माथा । चुकवी व्यथा जन्माच्या ॥१॥धन दारा पुत्रजन । बंधु सोयरे पिशून । सर्व मिथ्या हे जाणून । शरण रिघा देवासी ॥२॥मायाविन्घें भ्रमलां खरे । म्हणतां मी मायेनि घरें । हें तों संपत्तीचें वारें । साचोकारें जाईल ॥३॥आयुष्य जात आहे पहा । काळ जपतसे महा । खहिताचा घोर वहा । ध्यानीं रहा श्रीहरीच्या ॥४॥संत चरणीं भाव धरा । क्षणक्षणा नाम स्मरा । मुक्ति सायोज्यता वरा । हेंचि करा बापांनों ॥५॥विष्णुदास विनबी नामा । भूलूं नका भवकामा । धरा अंतरीं निज प्रेमा । न चुका नेमा हरिभक्ति ॥६॥३. उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां । झाला अरुणोदय सरली निद्रेचीवेळा ॥१॥संत साधु मुनि अवघे झालेती गोळा । सोडा शेजेसुख आतां पाहूंद्या मुखकमळा ॥२॥रंगमंडपीं महाद्वारीं झालीसे दाटी । मन उतावेळ रूप पहावया द्दष्टीं ॥३॥राई रखुमाबाई तुम्हां येऊंद्या दया । शेजें हालउनी जागें करा देवराया ॥४॥गरुड हनुमंत उभे पहाती वाट । स्वर्गींचे सुरवर घेउनी आले बोभाट ॥५॥झालें मुक्तद्वार लाभ झाला रोकडा । विष्णुदास नामा उभा घेऊनि काकडा ॥६॥४. उठा उठा साधुसंत । साधा आपुलें हित । गेला गेला हा नरदेह । मग कैंचा भगवंत ॥ध्रु०॥उठुनी वेगेशीं चला जाऊं राउळाशी । जळती पातकाच्या राशी । काकड आरती देखिलिया ॥१॥उठोनियां पहांटे । बिठ्ठल पहा उभा विटे । चरण तयाचे गोमटे । अमृत द्दष्टि अक्लोका ॥२॥जागें करा रुक्मिणीवरा । देव आहे निदसुरा । वेगें लिंबलोण करा । द्दष्ट होईंल तयासी ॥३॥पुढें वाजंत्रें वाजती । ढोल दमामे मर्जती । होते काकड आरती । पांडुरंगरायाची ॥४॥सिंहनाद शंख भेरी । गजर होतो महाद्वारीं । केशवराज विटेवरी । नामा चरण वंदितो ॥५॥५. राम राजीवलोचना । करुणा निधी भक्तजना । यातायातीनिवारणा । तूं पावना स्वामिया ॥१॥जगद्रुपा जळदगहना । जगद्गुरु सीतापती जगज्जीवना । काय वाणूं तुझीयारे गुणा । आवघ्या जनां आवडसी ॥२॥रामा त्र्यंबकभजना । दशकंठ तूं छेदना । मधुकैठभ निर्दळणा । गरुडवाहना वासुदेवा ॥३॥रामा दशरथनंदना । योगीजन-मनरंजना । अभयवरद वैष्णवजना । बिभिषणा स्थापियलें ॥४॥जयजय श्रीवत्सलांछना । ब्रह्मपदाचिया भूषणा । अहिल्याकष्ट निर्दळना । नारायणा परियेसिं ॥५॥म्हणउ नी तुझें मी पोसणें । हें ऐकें ऐकें रघुनंदनें । येणेंचि कारणें आलों शरण । विष्णुदास म्हणे नामा ॥६॥६. आजिचा दिवस आम्हां सोनियाचा । गोवळू भेटला कान्हो नंदाचा ॥१॥कान्होबा पेंढारी येईल यमुने । तयावीण मज घडी न गमे ॥२॥सोळासहस्र गोपी म्हणती अगा जगज्जीवना । एके वेळीं भेटी देईं नंदनंदना ॥३॥उजळुनी आरती करूं कुरवंडिया । शेष भरूं नाम्या स्वामी वनमाळिया ॥४॥७. लाजलें गे माय आतां कोणा ओवाळूं । जिकडे पाहावें तिकडे चतुर्भुज गोपाळू ॥१॥ओवाळूं मी गेलें माय गेले द्वारके । जिकडे पहावें तिकडे चतुर्भुज सारिखें ॥२॥ओवाळूं मी गेलें माय सखिया माझारी । जिकडे पहावें तिकडे चतुर्भुज नरनारी ॥३॥ओवाळूं मी गेलें माय सारंगधरा । जिकडे पहावें तिकडे चतुर्भुज परिवारा ॥४॥वैजयंती गळां श्रीवत्सलांच्छन । विष्णुदास नामा येणें दाविली खूण ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 19, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP