मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग| शिवस्तुति संत नामदेवांचे अभंग आत्मस्वरूपस्थिति उपदेश आत्मसुख भक्तवत्सलता १ श्रीचांगदेवांची समाधी ध्रुवचरित्र श्रीज्ञानेश्वरांची आदि कुटुंबातील मंडळींच्या अभंग रचना नाममहिमा संत नामदेव रचित गवळण द्रोणपर्व ह्माळसेन कथा करुणा श्रीकृष्णमाहात्म्य श्रीकृष्णलीला मुक्ताबाईची समाधी नामसंकीर्तन माहात्म्य श्रीनामदेव चरित्र श्रीनिवृत्तिनाथांची समाधी पंढरीमाहात्म्य पौराणिक चरित्रें प्रल्हाद चरित्र श्रीराममाहात्म्य रूपके श्रीज्ञानेश्वरांची समाधी श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा संतमहिमा संतचरित्रे शिवरात्रमाहात्म्य शुकाख्यान श्रीसोपानदेवांची समाधी सुदामचरित्र तीर्थावळी उपदेश विठाचे अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य श्रीविठ्ठल व पुंडलिक यांचा संवाद शिवस्तुति तुळसीमाहात्म्य चोवीस नामांचा महिमा गंगामाहात्म्य कलि प्रभाव प्रारब्धगती समाधियोगनिषेध हरिश्चंद्रराजाचें चरित्र श्रीयाळ चरित्र उपमन्यूचें चरित्र भीष्मप्रतिज्ञा रावण मंदोदरी संवाद नक्र उद्धार चोखोबाचे स्त्रीचें बाळंतपण चोखामेळ्याच्या समाधीचे अभंग विरहिणी भूपाळ्या भेट मागणें संतस्तुति जनाबाईचा निश्चय भाट आऊबाईचे अभंग लाडाईचा अभंग शिवस्तुति संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल शिवस्तुति Translation - भाषांतर १.अहो सदाशिवा । देसी भुक्ति मुक्ति भावा ॥१॥क-रावी ते तुझी सेवा । ऐसें धरावें या जीवा ॥२॥नामा ह्मणे महा-देवा । चुकवीं चौर्यांशींचा हेवा ॥३॥२.बरवें गा शंकरा नाम तुझें । हरहर बरवे गा देवा नाम तुझें ॥१॥गाईल्या ऐकिल्या होय वैष्णवा गती । रामनामें तरले नेणों किती ॥२॥ऐसा सदा आनंद राउळीं । विष्णुदास नामा पंढरपुरीं ॥३॥३.साठीसहस्र विघ्नांवरी । शिवनाम पंचाक्षरी ॥१॥तो राजा देखेन । पर्वतु जेथें असे मल्लिकार्जुन ॥२॥भक्तिभावाचें अंजन । साधावया निधान ॥३॥मन मारूनि देईन बळी । साधा-वया चंद्रमौळी ॥४॥भ्रांति पाटा फिटला । शिव मार्ग देखिला ॥५॥विष्णुदास नामा पायाळ भला । तेणें मलयानिळ देखिला ॥६॥४.सदा सोमवारीं विभूति लावूनि शिरीं । तुमच्या मं-दिरीं आलाप करीं ॥१॥शंकर त्रिपुरारी हरि उच्चारी । म्हणती षडाक्षरी पावें मज ॥२॥ॐनम: शिवाय हरहर जय जय । नाहीं भवभय तुझेनि नामें ॥३॥करिती शिवरात्री वाहाती बेलपत्री । प्रगत होऊनि गाती भक्तिभावें ॥४॥बोलती सत्कीर्ति जिंतिलें पवित्रीं । हरहर नाम मंत्रीं तुज पूजिती ॥५॥रुद्राक्षाच्या माळा घालूनियां गळां । तो तुह्मां जवळां सर्व मान्य ॥६॥शिवशंभु भोळा बहुतां पुण्ये जोडला । पावे जाश्वनीळा ह्मणे नामा ॥७॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP